देवदासी प्रथा- दोषी कोण?

Submitted by धडाकेबाज on 14 June, 2013 - 02:54

आज आपल्या देशात स्त्रिया सर्वच क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत एक महिलाही राष्ट्रपती होवून गेली. परंतु आपल्या समाजातील स्त्रियांचा एक वर्ग असाही आहे ज्याला महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता, जागतिक महिला दिन हे शब्द तरी त्यांच्या परिचयाचे आहेत का ? हा प्रश्न पडतो तो वर्ग आहे देवदासी स्त्रियांचा.

प्राचीन काळापासून ते आजतागायत मुलींना देवदासी केले जाते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या प्रथेचे प्राबल्य जास्त दिसते. आजही चौदा पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून परडी घेऊन, भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात.रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळय़ा वाहिल्या जातात. मुला-मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट धरली जाते. मुलां-मुलींना इसब, खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळय़ा बनवतात.

देवदासी प्रथेतील लिंब नेसणे, परडय़ा भरणे, जोगवा मागणे या अनिष्ट प्रथांनी मन विषण्ण होऊन जातं. आजच्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात समाजातील या अंधश्रद्धेने स्त्रियांची अब्रूच वेशीवर टांगली आहे. कारण देवदासीची दीक्षा दिल्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित धनिकांमध्ये चढाओढ लागते. ते तिला भरपूर पैसे देऊन तिचा मनमुरादपणे उपभोग घेतात. इथूनच तिच्या कुजकट आयुष्याची सुरुवात होते आणि कालांतराने गलिच्छ दरीत दूर लोटून देते ती परत कधीही वर न येण्यासाठी !

देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नवर्याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं तिच्या नशिबी येतं.
.
देवदासी प्रथेविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आजपर्यंत अनेकवेळा आवाज उठविला याचे मुख्य कारण म्हणजे या अनिष्ट प्रथेमुळे वेश्या व्यवसायाला खतपाणी मिळते व तो वाढीस लागतो. देवदासी प्रथेमध्ये मुलीला वयात येण्यापूर्वी देवाला सोडून कोवळय़ा वयातच त्यांचे भवितव्य ठरविले जाते. तेही तिच्या जन्मदात्याकडूनच ! विशेष म्हणजे ही प्रथा समाजातील खालच्या वर्गात अजूनही सुरुच आहे. ज्या ठिकाणी अशिक्षितपणा आहे, त्या ठिकाणी त्याचे प्राबल्य जास्त जाणवते.

देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना पण देवधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. दारिद्रय़ात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचणार्या दलित देवदासी कोणतीही तक्रार न करता उत्सवात भाग घेतात. त्याबद्दल त्यांना मिळणारी साडीचोळी, नारळसुपारी यातच त्या समाधान मानतात.

मागासलेल्या समाजात देवदासी प्रथा अस्तित्वात होती आणि आहे. विसाव्या शतकात त्याविरुद्ध अनेक लढे झाले, चळवळी झाल्या तरी तिचे समूळ उच्चाटन झालेले नाही. सुरुवातीच्या काळातील स्वरुप जरी बदललेले असले तरी मूळ प्रथेशी निगडित जे उत्सव अथवा प्रथा आणि परंपरा आहेत त्या तशाच आहेत.

देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या भोवर्यात सापडून जेव्हा भोगदासी बनते तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिला कळतं. स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नाही. या प्रथेस धार्मिक आणि सामाजिक मान्यता दिलेली असल्याने या प्रथेत विकृती शिरल्याचे दिसते. अनेक कायदे करूनही ही प्रथा संपलेली नाही. बहुसंख्य देवदासींना या प्रथेतून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्यावर आलेला प्रसंग आपल्या मुलां-मुलींवर येऊ नये यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे. मात्र त्यांच्या जागृतीच्या प्रमाणात उपाययोजनांचा अभाव कटाक्षाने आढळतो. म्हणूनच देवदासी प्रथा निर्मूलनाच्या व पुनर्वसनाच्या बाबतीत राष्ट्रीय स्वरुपाच्या कायद्याची गरज आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवदासींचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजदेखील या भागात बर्याच देवदासी डोक्यावर रेणुका देवीचा जग व हातात यल्लमाची परडी घेऊन जोगवा मागताना दिसतात. म्हणून त्यांचे पुनर्वसन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या मुलांसाठी ठिकठिकाणी वसतीगृह चालविली जात असली तरी किती मुलं याचा फायदा घेतात हा एक संशोधनाचाच विषय ठरू शकेल.

मनात खोलवर रुजलेल्या धार्मिक श्रद्धांना बदलत्या परिस्थितीनुसार मूठमाती दिली पाहिजे आणि एकवटून संघर्षही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी अबलांच्या शरीराची नासाडी करणारे नराधम याच समाजात आहेत. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा थोडा जरी डोळसपणे विचार केला तर काही अंशी का होईना पण या जीवघेण्या प्रथेस आळा बसू शकेल. आज ठिकठिकाणी संघर्ष होत आहेत. पण कडक कायद्याचीही तितकीच गरज आहे. एकूणच शासनाची आणि समाजाची उदासिनताही याला कारणीभूत आहे. त्यांचा निवारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आवश्यक असणार्या वैद्यकीय सुविधा, उदरनिर्वाहाच्या किमान गरजा तरी पूर्ण व्हायला हव्यात. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना या जन्मात जरी मिळाला तरी खूप काही त्यांनी मिळवलंय असं म्हणता येईल.
एकूणच देवदासी स्त्रियांच्या उन्नतीची चळवळ आज एकाकी अवस्थेत आहे. राज्यकर्त्यांमधील बदलते धोरण, लहान वयातच घरच्यांनीच लादलेले उपेक्षेचे जीवन, सतत पत्करावी लागणारी लाचारी, इच्छा असो वा नसो सतत देहावर होणारे अत्याचार हे सर्व निमूटपणे सहन करावं लागतं. आजच्या या आधुनिक युगातही स्त्रीला भोगाव्या लागणार्या या यातनांची समाजानं थोडीतरी दखल घ्यायला हवी. त्यांना मिळणार्या सुविधांचा अभाव, अर्थ सहाय्यास होणारा विलंब आणि स्वतःच्या देहाची भूक भागविण्यासाठी सहज उपलब्ध होणारा स्त्रीचा देह, सामाजिक विकृती बळकट करणार्या या प्रथा जशा समाजाला घातक ठरतात तशाच त्या स्त्रियांच्या दुरवस्थेलाही कारणीभूत ठरतात.
मनुष्यास असल्या विकृत जुनी परपंरा व रुढी नको आहेत.. इथला बहुसंख्य वर्ग जातीच्या तळाशी विकलांग होऊन रुतला आहे.. माणसांना देवत्व देऊन धर्माची पद्धत रूढ झाली. बहुसंख्य समाज धर्माच्या नांवाने दारोदार पोटासाठी वणवण भटकणारा भिकारी झाला. तो देवदासी, पोतराज, वाघ्या-मुरळी झाला. बहुसंख्य वर्गाची सामाजिक प्रतिष्ठा लयास जाऊन बहुसंख्यसमूह उद्ध्वस्त झाला. .
देवदासी प्रथेवर कायद्याने बंदी असली तरी भारतात आजही मोठ्या प्रमाणावर ही प्रथा सुरू असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एका अहवालात म्हटले आहे. गुरूच्या सांगण्यावरून अनुसूचित जातीतील गरीब लोक आपल्या मुलींना देवाच्या भीतीपोटी देवदासी प्रथेत ढकलतात , असे या अहवालात म्हटले आहे.

जास्त गाजावाजा न होता , एखाद्या गुरूच्या घरी किंवा लहान देवळात हा विधी उरकण्यात येतो. अत्यंत गरीबी आणि धर्माचे बंधन यामुळे देवदासी ही पैसा कमविण्याची एक संधी या गरीबांना मिळते. देवदासी या ' ईश्वरी ' नावाखाली बहुतेक मुलींना 'शरीरविक्रयाचा धंदा' करावा लागतो.

कोणाच्या सडक्या मेंदूतून हि कल्पना निघाली असेल ते माहित नाही पण हि प्रथा आपल्या समाजात असणे म्हणजे माणूस म्हणून जगायच्या आपण लायकीचे नाही हेच दर्शवते....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठलाही धर्म हा चांगलाच असतो.

काही धर्म अधिकार्‍यांनी रुढ केलेल्या स्वार्थी परंपरा लोकं भोळे, गरीब, लाचार, असहाय्य आहेत हे पाहुन डोके चालवुन देवाच्या नांवाने पैसे अथवा स्व स्वार्थ उकळण्याचा जो मार्ग अवलंब करीतात तो चुकिचा असतो.

सर्वसामान्य पणे पटकन हा धर्मच चुकिचा आहे असं म्हणणं हे चुकिचं आहे.

ही आपल्या धर्माला जी लांछने ह्या अधमांनी लावली आहेत अशी देवदासी सारखे वा तत्सम निव्वळ स्वार्थाचे वा पैसे कमावण्याचे मार्ग अवलंब करुन, एकतर त्यांनी ती तत्काळ बंद करावीत ( आता ईथे बंद करा म्हंटलं कि म्हणजे आपल्या कामविकाराला त्यांना आळा घालावा लागणारच , आणी हे . . . हे लोकं करु शकतील का ? ), अन्यथा ह्या नंतर अश्या संध्या त्यांना मिळु नयेत ( म्हणजेच ईकडे त्या समाजातील मुलींचा उद्धार व्हावा असे तत्काळ काही करावेच, म्हणजे हे अधम आपला शारीरिक स्वार्थ साधू शकणार नाहित ), अश्या काही practicle शक्यतांचा विचार व्हावाच.

मी सुरुवात करु ?

आपण सर्वच मायबोलिकर असे काही प्रयत्न नाही का करु शकणार कि आपण सर्वच मिळुन ह्या आपल्या विचाराला सरकार, संस्थाने, कायदा ह्या सर्व वा कोणत्यातरी एका मार्गाने आळा घालण्यास आरंभ करु शकु ?

काय आपण असे दोन - तीन आपलेच माबो. चे प्रतिनीधी पाठवु शकत नाही का ह्यासाठी कारण पुष्कळांना तर वेळ ही नसणार . . . . हो ना ?

हा एखाद्या ववि चा एक आणखीन उद्देश्य ही होऊ शकतोच ! ववि करा, आणी होम-वर्क ( homework ), ठीकपणी करुन पुढी हे प्रतिनीधी ही पाठवा ! का कोणाचा आक्षेप आहे का ?

आहे कोणी ?

मी भारतात असतो तर ह्यासाठी घेतला असता काही प्रयत्न करायला.

आता झाडे लावुन फांद्या वाढवुन असे म्हणु नये कि साळसूदपणे हे आधीच फुकटाचा सल्ला देऊन बाजुला झाले, आपण काय करु शकतो हे महत्वाचे आहे . . . . rest all is crap if you want to blame.

कृपया धर्माला चुक आणी थोतांड म्हणु न स्वतःची नाचक्की करुन घेऊ नये.

कुठलाही धर्म हा चांगलाच असतो.

सहमत,

त्याचा योग्य अर्थ लावता आला पाहिजे,

म्हणजेच कृष्णा ने अर्जुनाला शस्त्र उचलायला सांगितले याचा अर्थ हिंसा करावी असा काढू नये

ह्या प्रथा फोर्थ क्लास लोकातच आहेत कोणत्याही ध्रर्मात .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.अरे वा! आणि तुम्ही कोण नेताजी फर्स्ट क्लास कि थर्ड क्लास

अगदी बरोबर लाथा घाला गद्दाराना , दुसरा धर्म स्वीकारून सुधारना करा.नाहीतर नवीन धर्मच काडा इतराप्रमाणे हिन्दूचे धर्मग्रन्थ चोरून.>>>>>>

बरोबर आहे आणि तुम्ही दुसरं काय करू शकता फक्त गाढवा सारख्या लाथाच मारू शकता.

पुन्हा एकदा :
देवदासीप्रथा निदान महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. ज्या कोणी जुन्या देवदासी आहेत, त्या सोडल्या तर नवीन मुलींना देवदासी म्हणून सोडून देण्याचे (देवाशी प्रतीकात्मक लग्न लावून इतरांसाठी मोकळे सोडण्याचे) प्रमाण झपाट्याने खाली येते आहे. सोलापूर सोडले तर इतर महाराष्ट्रात समाज कार्यकर्त्यांच्या कामाला यश येऊन आज सिंधुदुर्ग, गोवा या भागात ही प्रथा जवळ जवळ नाहीशी झाली आहे. कर्नाटकात मात्र प्रगती फार धीमी आहे.
पण अजूनही कोल्हाटी आणि तमासगीर समाजाची स्थिती मात्र भीषण आहे. इथे अत्याचार देवाच्या नावावर होत नाहीत तर कुठलाही विधिनिषेध न बाळगता, देवधर्माचा कुठलाच मुखवटा न घेता माणूसच खुलेआम अत्याचार करीत असतो. या समाजाच्या महिला सदैव दहशतीखाली असतात. देवदासी समाजामध्ये प्रबोधन होऊन त्यांनी आपल्या मुली देवासाठी सोडण्याचे थांबवायला सुरुवात केली, पण कोल्हाटी समाजाच्या बाबतीत मात्र केवळ त्यांच्या प्रबोधनाने काम भागण्यासारखे नाही. त्यासाठी इतर समाजाची दृष्टी बदलायला हवी.
अशी कामे करताना या लोकांना शिक्षणाची आणि त्याहीपेक्षा पर्यायी उपजीविकासाधन उपलब्ध करून देण्याची गरज असते. आणि हे काम अधिक बिकट असते.
सुदैवाने महाराष्ट्रात(तरी) कार्यकर्त्यांची कमतरता नाही. हळूहळू का होईना, परिवर्तनाची कामे चालू आहेत. तश्या तर आपल्याकडे समस्या प्रचंड आहेत. पण कोणीतरी त्यांच्याशी टक्कर घेते आहे हे वास्तव खूप दिलासादायक आहे.

वदासी ही प्रथा हिंदू "धर्माची" प्रथा नाही, हे प्रत्येकाला मान्य असायला हरकत नसावी>>>>>>> हे जर मान्य आहे तर हिंदु धर्माला कशाला मध्ये घुसडताय ?

मग जी प्रथा आपल्या धर्माने सांगितलेलीच नाही, त्या प्रथेचं निर्मूलन करण्यात कसला कमीपणा आलाय? त्यासाठी उगाच मुस्लिम आणि इतर धर्मांना कशाला शिव्या घालायच्या?>>>>>>>> Uhoh , म्हणुन हिंदु धर्माला शिव्या घालयच्या ?

त्यांचं ते बघून घेतील काय करायचं ते. चार बायका तर करतील, बुरख्यात तर राहतील. >>>>>>> असे होत नाहि ना काकु. उद्या बंदुका घेउन चर्चगेट वर येतात मारायला आम्हाला त्याचे काय ? तुम्हि याल का तिथे आमच्याएवजी मरायला ?

तुम्ही तुमच्या मुलीबाळींना शिकवा, असल्या दरिद्री प्रथांमधून बाहेर पडा. >>> ते आम्हि करतोच आहोत आणी करतच राहु पण तुमच्या सारखे सो कोल्ड सेक्युलर लोक त्यांच्या प्रथांना पाठिंबा देतात, त्यांच्या साठी वेगळे कायदे बनवतात, उत्तर प्रदेशातील तुमचे सेक्युलर सरकार अतिरेक्यांना सोडुन देते, न्यायालयाया शेवटी स्टे आणावा लागतो तुमच्या सारख्या सो कोल्ड सेक्युलर लोकांचे प्रताप पाहुन.

उगाच इतरांना नावे ठेवण्यात आपला बहुमूल्य वेळ कशाला घालवायचा?>>>>> आरसा घेता का आरसा ? तुम्हि हा प्रतिसाद लिहुन का उगाचच तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवलात ? Proud

कुठलाही धर्म हा चांगलाच असतो.>>>>>>>> हे जो कोण मान्य करेल तो एक तर मुस्लिम असेल नाहितर वेडा असेल. Proud कारण मुस्लिम इस्लामशिवाय कोणताच धर्म मानत नाहित. आणी वेडे धर्महि मानत नाहि, चांगलाही मानत नाहित, असतो का नसतो हे हि त्यांना समजत नाहि आणी कुठलाहि म्हणजे काय हेहि त्यांना समजत नाहि.

आपण सर्वच असे काही प्रयत्न नाही का करु शकणार कि आपण सर्वच मिळुन ह्या आपल्या विचाराला सरकार, संस्थाने, कायदा ह्या सर्व वा कोणत्यातरी एका मार्गाने आळा घालण्यास आरंभ करु शकु ? >>>>>>>>>>>>>>>>>>>>> आळा घालन्याचा उद्देश कोणाचा आहे .. फक्त या ना त्या निमित्ताने श्रध्दाळू लोकाना अशा घटना सान्गून सात्विक श्रध्दाळू लोकाना झोडपण्याचा अजेन्डा आहे . खरच आळा घालायचा असेल तर काही करा पण पुचाट लोक काही करतिल अस वाटत नाही . माझ्या आयुष्यात मी एकही देव दासी पाहिली नाही. अन्याय दिसला कि ठेसला आमच्या तालमीचे तत्वच आहे .

तुमच्या सारखे सो कोल्ड सेक्युलर लोक त्यांच्या प्रथांना पाठिंबा देतात <<< नक्की काय ते नीट ठरवा, मागे एका बीबीवर मला "हिंदुत्त्ववादी" म्हटले होते. आज सेक्युलर म्हणताय, उद्या कम्युनिस्ट म्हणाला (पण मग लालभाईंना शोक अनावर होइल. लालभाई येतात का अजून माबोवर?)

हे जर मान्य आहे तर हिंदु धर्माला कशाला मध्ये घुसडताय ? >>> मी घुसडलंय का? नीट वाचा माझी पोस्ट.

मुस्लीम धर्मात अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्या दूर होण्यासाठी आवश्यक असं वातावरण नाही. धर्ममार्तंडांच्या सत्तेला आव्हान देणारे एकटे पडतात असा इतिहास आहे. स्त्रियांचं व्यक्तिस्वातंत्र्य या विषयाबद्दल तर प्रचंड उदासीनता आहे. पण इस्लाम धर्माला मानणा-यांमधे उच्चनीच हा प्रकार कुठे दिसत नाही. तसंच ज्यांना हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांचा त्रास झाला आहे त्यांनी इतर धर्माबद्दल तक्रारी का कराव्यात हे काही समजलं नाही. ज्यांना मुस्लीम किंवा इतर धरमातल्या अनिष्ट रूढींचा त्रास झालेला आहे ते करतील ना तक्रार.

पण अस्पृश्यतेच्या रानटी प्रथेमुळे मानसिक, बौद्धीक, आर्थिक आणि सामाजिक -हास झालेल्या समूहगटाला त्याविरुद्ध ब्र काढता येऊ नये म्हणून बोला ना या धर्माविरुद्ध, बोला ना त्या धर्माविरुद्ध अशी निर्बुद्ध आव्हानं देण्यात निलाजरेपण आणि ढोंगीपणा आहे हे उघड आहे. असे बाफ इथे वर्षानुवर्षे चालत राहीलेले असणार आणि चालत राहणार आहेत. त्यातून आउटपुट काही निघणार आहे का हा मुख्य प्रश्न आहे.

या अशा चर्चांमधे तार्किकतेला वाव नसतो. इतर धर्मांमधे अमूक तमूक आहे म्हणून तुम्ही अमूक तमूक प्रथांबद्दल बोलू नका हा अजब युक्तीवाद करणा-यांनी एक लक्षात ठेवावं कि आपण धर्मांधतेच्या मार्गाने जावं असं ते अप्रत्यक्षरित्या सुचवत आहेत. जगाचा इतिहास सांगतो कि ज्या ज्या ठिकाणी धर्मांध सत्तेला आव्हान देण्यात आलेलं आहे तिथेच ख-या अर्थाने मानवविकासाची सुरुवात झालेली आहे. पोप आणि रोमन कॅथॉलिकांच्या चर्चेसची सत्ता संपुष्टात आल्यावरच औद्योगिक क्रांती आणि इतर ठळक बदल झाले.

इतर धर्मातल्या या घडामोडींबद्दल पण बोला असा आग्रह का धरला जात नाही ? प्रत्येक वेळी बाहेरून मूठभरांनी येऊन या देशात सत्ता स्थापन का केली त्याबद्दल पण बोला असाही आग्रह का धरला जात नाही ? इथेच इतक्या वाईट आणि आंअनवी प्रथांचे गुलाम असणा-यांना परकीय काय आणि स्वकीय काय यात फरक वाटणारच नसेल तर एकसंध समाजाकडून परकीय आक्रमणाला प्रतिकार कसा होईल ?

असो. त्याबद्दल नसेल बोलायचे तर नकाच बोलू. पण एकीकडे ख्रिश्चन धर्माबद्दल बोलायचे आणि अमेरिकन वकिलातीकडे व्हिसाचे काम झाले का यासाठी फे-या मारायच्या यातलं एक काही तरी केलं तरी पुरे...

नक्की काय ते नीट ठरवा, मागे एका बीबीवर मला "हिंदुत्त्ववादी" म्हटले होते. आज सेक्युलर म्हणताय, उद्या कम्युनिस्ट म्हणाला (पण मग लालभाईंना शोक अनावर होइल. लालभाई येतात का अजून माबोवर?) >>>>>>>> सो कोल्ड सेक्युलर लोकांचा तो गुणधर्मच आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलायचा आणी लांगुलचालन करायचे

हे जर मान्य आहे तर हिंदु धर्माला कशाला मध्ये घुसडताय ? >>> मी घुसडलंय का? नीट वाचा माझी पोस्ट.>>>> ज्यानी घुसडलय त्यांना पाठींबा देण हे यापेक्षा काय वेगळे आहे.

सो कोल्ड सेक्युलर लोकांचा तो गुणधर्मच आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलायचा आणी लांगुलचालन करायचे
<<
असल्या धादांत खोट्या वदंता तुमच्यासारखे धर्मांधच निर्माण करतात अन पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगत, ते खरेच आहे असे ठरवायचा प्रयत्न करीत रहातात.

सर्व धर्मांनाच नव्हे, तर सगळ्याच माणसांना एकसारखी वागणूक मिळायला लागली, तर तुमचे दुकान बंद पडेल ना. म्हणून ती कल्पनाच चुकीची असे ठासून सांगत रहायचे. स्वत:ची बुरसटलेली धर्मांध विचारसरणी आहे, हे लोकांच्या ध्यानी येऊ नये म्हणून इतरांना 'सुडो सेक्युलर' 'सो कॉल्ड सेक्युलर' म्हणत रहायचे, म्हणजे जणू तुम्ही स्वतः खरे सेक्युलर. हसू पण येईनासे झाले आहे तुमच्या या प्रकरणाचे.

लांगुलचालन करायचे नाही तर बीजेपी मधे वेगळा मायनॉरिटी सेल का आहे? लांगुलचालन म्हणजे काय ते तिथून शिका आधी. मग नंतर सेक्युलर बद्दल शिकवणीसाठी मजकडे नांव नोंदवा.

इतर लोक सेक्युलर की कसे ते नंतर पाहू, तुम्ही कसे? ते सांगा पाहू जरा परत?

लांगुलचालन करायचे नाही तर बीजेपी मधे वेगळा मायनॉरिटी सेल का आहे? लांगुलचालन म्हणजे काय ते तिथून शिका आधी. मग नंतर सेक्युलर बद्दल शिकवणीसाठी मजकडे नांव नोंदवा. >>>>>> अहो तात्या, आम्हाला सेक्युलर शिकवणी नकोच आहे. तुमची नावनोंदणी तुमच्यापाशीच ठेवा. बर पण ते शाहबानो प्रकरणाचे काय ?

असल्या धादांत खोट्या वदंता >>> मराठी शिका जरा. महाराष्ट्रात रहाता ना! का आता उर्दुच ? वंदता आणी खोट्या .... Proud

सर्व धर्मांनाच नव्हे, तर सगळ्याच माणसांना एकसारखी वागणूक मिळायला लागली, तर तुमचे दुकान बंद पडेल ना. >>>>> आमचे नव्हे तात्या, तुम्हि कसे येणार सत्तेवर जर एकसारखी मिळाली तर, बर पण ते शाहबानो प्रकरणाचे काय ? Wink त्यालाहि एकसारखीच वागणुक म्हणतात का ? Wink
इतर लोक सेक्युलर की कसे ते नंतर पाहू, तुम्ही कसे? ते सांगा पाहू जरा परत?>>>> तुम्हाला सेक्युलर कोणी म्हणले हो? तुम्ही सो कोल्ड सेक्युलर. सेक्युलर म्हणजे काय हे शिकायला या शिकवणीला! Proud

आम्हि कोण ते नंतर पाहु, तुम्हि कसे ? ते सांगा पाहु जरा परत! मात्र शहाबानो प्रकरणाचे काय हेहि सांगा तात्या ! Proud

आमच्या गल्लीतल्या डुकराचे नाव इब्लिस ठेवायच आहे कस आहे ?

तुम्ही खरच मूर्ख आहात आधी त्या डुकराची कुंडली काढा त्याच्या जेवणाची थोड्यादिवस तुमच्या घरीच सोय करा . त्याच्या नावाचे आद्याक्षर आले कि मग इब्लीसांना विचारा आणि हो डुक्कर तुमच्या गल्लीतले आहे तुम्ही त्याचे नाव काहीही ठेवू शकता उद्या तुम्ही तुमचे किवा तुमच्या पोराबाळांचे नावही इब्लीस ठेवले तरी ते थोडीच त्याला विरोध करू शकणार आहेत.

तुम्हाला इशरत जहाँ प्रकरण म्हणायचं आहे का?>> > नाहि, मला अतिरेक्यांचा कळवळा नाहिये. शहाबानो प्रकरण काय आहे ते तुम्हाला माहित असेल अशी शक्यता कमीच आहे कारण त्यात तुमच्यासारखे सो कोल्ड सेक्युलर उघडे नागडे पडले.

अरेच्या! तुम्हाला मोदी यांचा कळवळा नाही?? >>>>>>> माझे सोडा. तुम्ह्लाला इशरत जहा आणी अजमल कसाबचा किती कळवळा आहे ते दिसत आहे.

देवदासी प्रथा मोदी नी सुरू केली का . दैत्य मोदीचा इथ काय सबध आहे .

सरकार कोणाचे आले तरी फरक काय पडणार आहे . हे सगळे भाऊ भाऊच आहेत.

Pages