देवदासी प्रथा- दोषी कोण?

Submitted by धडाकेबाज on 14 June, 2013 - 02:54

आज आपल्या देशात स्त्रिया सर्वच क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत एक महिलाही राष्ट्रपती होवून गेली. परंतु आपल्या समाजातील स्त्रियांचा एक वर्ग असाही आहे ज्याला महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता, जागतिक महिला दिन हे शब्द तरी त्यांच्या परिचयाचे आहेत का ? हा प्रश्न पडतो तो वर्ग आहे देवदासी स्त्रियांचा.

प्राचीन काळापासून ते आजतागायत मुलींना देवदासी केले जाते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या प्रथेचे प्राबल्य जास्त दिसते. आजही चौदा पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून परडी घेऊन, भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात.रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळय़ा वाहिल्या जातात. मुला-मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट धरली जाते. मुलां-मुलींना इसब, खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळय़ा बनवतात.

देवदासी प्रथेतील लिंब नेसणे, परडय़ा भरणे, जोगवा मागणे या अनिष्ट प्रथांनी मन विषण्ण होऊन जातं. आजच्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात समाजातील या अंधश्रद्धेने स्त्रियांची अब्रूच वेशीवर टांगली आहे. कारण देवदासीची दीक्षा दिल्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित धनिकांमध्ये चढाओढ लागते. ते तिला भरपूर पैसे देऊन तिचा मनमुरादपणे उपभोग घेतात. इथूनच तिच्या कुजकट आयुष्याची सुरुवात होते आणि कालांतराने गलिच्छ दरीत दूर लोटून देते ती परत कधीही वर न येण्यासाठी !

देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नवर्याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं तिच्या नशिबी येतं.
.
देवदासी प्रथेविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आजपर्यंत अनेकवेळा आवाज उठविला याचे मुख्य कारण म्हणजे या अनिष्ट प्रथेमुळे वेश्या व्यवसायाला खतपाणी मिळते व तो वाढीस लागतो. देवदासी प्रथेमध्ये मुलीला वयात येण्यापूर्वी देवाला सोडून कोवळय़ा वयातच त्यांचे भवितव्य ठरविले जाते. तेही तिच्या जन्मदात्याकडूनच ! विशेष म्हणजे ही प्रथा समाजातील खालच्या वर्गात अजूनही सुरुच आहे. ज्या ठिकाणी अशिक्षितपणा आहे, त्या ठिकाणी त्याचे प्राबल्य जास्त जाणवते.

देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना पण देवधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. दारिद्रय़ात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचणार्या दलित देवदासी कोणतीही तक्रार न करता उत्सवात भाग घेतात. त्याबद्दल त्यांना मिळणारी साडीचोळी, नारळसुपारी यातच त्या समाधान मानतात.

मागासलेल्या समाजात देवदासी प्रथा अस्तित्वात होती आणि आहे. विसाव्या शतकात त्याविरुद्ध अनेक लढे झाले, चळवळी झाल्या तरी तिचे समूळ उच्चाटन झालेले नाही. सुरुवातीच्या काळातील स्वरुप जरी बदललेले असले तरी मूळ प्रथेशी निगडित जे उत्सव अथवा प्रथा आणि परंपरा आहेत त्या तशाच आहेत.

देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या भोवर्यात सापडून जेव्हा भोगदासी बनते तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिला कळतं. स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नाही. या प्रथेस धार्मिक आणि सामाजिक मान्यता दिलेली असल्याने या प्रथेत विकृती शिरल्याचे दिसते. अनेक कायदे करूनही ही प्रथा संपलेली नाही. बहुसंख्य देवदासींना या प्रथेतून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्यावर आलेला प्रसंग आपल्या मुलां-मुलींवर येऊ नये यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे. मात्र त्यांच्या जागृतीच्या प्रमाणात उपाययोजनांचा अभाव कटाक्षाने आढळतो. म्हणूनच देवदासी प्रथा निर्मूलनाच्या व पुनर्वसनाच्या बाबतीत राष्ट्रीय स्वरुपाच्या कायद्याची गरज आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवदासींचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजदेखील या भागात बर्याच देवदासी डोक्यावर रेणुका देवीचा जग व हातात यल्लमाची परडी घेऊन जोगवा मागताना दिसतात. म्हणून त्यांचे पुनर्वसन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या मुलांसाठी ठिकठिकाणी वसतीगृह चालविली जात असली तरी किती मुलं याचा फायदा घेतात हा एक संशोधनाचाच विषय ठरू शकेल.

मनात खोलवर रुजलेल्या धार्मिक श्रद्धांना बदलत्या परिस्थितीनुसार मूठमाती दिली पाहिजे आणि एकवटून संघर्षही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी अबलांच्या शरीराची नासाडी करणारे नराधम याच समाजात आहेत. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा थोडा जरी डोळसपणे विचार केला तर काही अंशी का होईना पण या जीवघेण्या प्रथेस आळा बसू शकेल. आज ठिकठिकाणी संघर्ष होत आहेत. पण कडक कायद्याचीही तितकीच गरज आहे. एकूणच शासनाची आणि समाजाची उदासिनताही याला कारणीभूत आहे. त्यांचा निवारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आवश्यक असणार्या वैद्यकीय सुविधा, उदरनिर्वाहाच्या किमान गरजा तरी पूर्ण व्हायला हव्यात. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना या जन्मात जरी मिळाला तरी खूप काही त्यांनी मिळवलंय असं म्हणता येईल.
एकूणच देवदासी स्त्रियांच्या उन्नतीची चळवळ आज एकाकी अवस्थेत आहे. राज्यकर्त्यांमधील बदलते धोरण, लहान वयातच घरच्यांनीच लादलेले उपेक्षेचे जीवन, सतत पत्करावी लागणारी लाचारी, इच्छा असो वा नसो सतत देहावर होणारे अत्याचार हे सर्व निमूटपणे सहन करावं लागतं. आजच्या या आधुनिक युगातही स्त्रीला भोगाव्या लागणार्या या यातनांची समाजानं थोडीतरी दखल घ्यायला हवी. त्यांना मिळणार्या सुविधांचा अभाव, अर्थ सहाय्यास होणारा विलंब आणि स्वतःच्या देहाची भूक भागविण्यासाठी सहज उपलब्ध होणारा स्त्रीचा देह, सामाजिक विकृती बळकट करणार्या या प्रथा जशा समाजाला घातक ठरतात तशाच त्या स्त्रियांच्या दुरवस्थेलाही कारणीभूत ठरतात.
मनुष्यास असल्या विकृत जुनी परपंरा व रुढी नको आहेत.. इथला बहुसंख्य वर्ग जातीच्या तळाशी विकलांग होऊन रुतला आहे.. माणसांना देवत्व देऊन धर्माची पद्धत रूढ झाली. बहुसंख्य समाज धर्माच्या नांवाने दारोदार पोटासाठी वणवण भटकणारा भिकारी झाला. तो देवदासी, पोतराज, वाघ्या-मुरळी झाला. बहुसंख्य वर्गाची सामाजिक प्रतिष्ठा लयास जाऊन बहुसंख्यसमूह उद्ध्वस्त झाला. .
देवदासी प्रथेवर कायद्याने बंदी असली तरी भारतात आजही मोठ्या प्रमाणावर ही प्रथा सुरू असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एका अहवालात म्हटले आहे. गुरूच्या सांगण्यावरून अनुसूचित जातीतील गरीब लोक आपल्या मुलींना देवाच्या भीतीपोटी देवदासी प्रथेत ढकलतात , असे या अहवालात म्हटले आहे.

जास्त गाजावाजा न होता , एखाद्या गुरूच्या घरी किंवा लहान देवळात हा विधी उरकण्यात येतो. अत्यंत गरीबी आणि धर्माचे बंधन यामुळे देवदासी ही पैसा कमविण्याची एक संधी या गरीबांना मिळते. देवदासी या ' ईश्वरी ' नावाखाली बहुतेक मुलींना 'शरीरविक्रयाचा धंदा' करावा लागतो.

कोणाच्या सडक्या मेंदूतून हि कल्पना निघाली असेल ते माहित नाही पण हि प्रथा आपल्या समाजात असणे म्हणजे माणूस म्हणून जगायच्या आपण लायकीचे नाही हेच दर्शवते....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धडाकेबाज,
तुमचा हा धागा १००% उचितच आहे.

मी तुमच्या वरील मतांशी सहमत आहे.

हे आणी असेच बरेच व्यवसाय देवाच्या नांवाखाली चालवुन अशिक्षित, गरीब लोकांना पैश्यांची भुलावण देऊन जे असे कर्म करीत आहेत त्यांना तर खरंच जबर शिक्षा मिळायला हवी.

आधीच कलियुगात धर्म दुबळा झालेला, त्यात बाप दाखव नाहितर श्राद्ध कर असे आग्रह, आजकालच्या काळातील प्रगतिं मुळे देवाधर्माच्या गोष्टींना वेळ नाही, वेळ नाही तर किंमत नाही, त्यांत भरीस भर म्हणुन अश्या ज्या घाणेरड्या प्रथा आहेत त्या खरोखरीच लज्जास्पद आहेत.
असमर्थ वर्गाच्या लोकांना असे प्रलोभने देऊन, बळाने वा पैश्यांच्या जोरावर जे अधम आपल्याच शारीरिक भुकेच्या समाधानासाठी ह्यांचा गळा घोटुन ठेवतात ( त्यांना बिचार्‍यांना धड मरता पण येत नाही ), त्यांना अशी काही शिक्षा झाली पाहिजे कि एक ईतिहास घडेल पूर्ण जगासाठी जे एक उदाहरण म्हणुनही राहील.

धागा खरंच चांगला आहे, काहितरी चांगले निष्पन्न निघु शकेल ही आशा ( झाडे लावुन फांद्या वाढवणारे नाही आले तर ). . . .

नमस्कार.

परब्रह्म यान्चेशी सहमत.
याच धाग्यातील "देवदासी" नामक वेश्या व्यवसायाच्या जोडिनेच, धर्माधारित "लव्ह जिहादाद्वारे" मुलिन्ना फसवून धर्मान्तर करविणे व नन्तर त्या मुलिन्ना चारातील एक रखेल अशा पद्धतीने वागवणे वा तिन वेळेस तलाक म्हणून वार्‍यावर सोडणे वा केवळ सन्ख्यावाढीकरता प्रजननाकरता उपयोगात आणणे, आणि तरुण षोडषवर्षिय मुलिन्ना फसवुन एका राज्यातुन दुसर्‍या टोकाच्या राज्यात नेऊन विकुन वेश्याव्यवसायाला लावण्याच्या बाबीन्वर देखिल उपाय योजना येऊ दे! Happy
गावोगावच्या वेश्यावस्त्या या अशाच फसवुन पळवुन आणलेल्या मुलिन्नी भरलेल्या अस्तात हे गेली साठ वर्षे डोळ्यावर झापडे लावुन बसलेल्या सत्ताधार्‍यान्ना कळत नाही की त्याबद्दल त्यान्ना काही करायचेच नाही हे उमगत नाही.
आजवर नाही कधी या वेश्यान्च्या पुनर्वसनाबाबत काही ठोस केले गेले, नाही त्या वेश्यावस्तिच्या "गिर्‍हाईकान्वर" काही कारवाई झाली!
अन हे प्रश्न (म्हणजे मी मान्डलेला लव्हजिहाद्/वेश्यान्ची भरती हे प्रश्न), केवळ पश्चिम महाराष्ट्राचा नसून आख्ख्या भारताचा आहे.

धडाकेबाज्,तुमचा हेतू स्तुत्य आहे .
पण ही प्रथा बाळगणार्यांशी माबोवरच्या लोकांचं काही नातं नाही हो.
समजा या प्रथेला वाईट असं माबोवरच्या प्रत्येकाने म्हटलं तरी काय साध्य होणार आहे?
खरी जागृती तर त्या समाजाची झाली पाहिजे ज्या समाजात या प्रथा चालू आहेत.
तुम्ही हिंदू धर्मातल्या काही गोष्टींविषयी जे इतर धागे काढलेत ते इथे रिलेवंट आहेत तरी.

ही प्रथा वाईट होती हे अगदी खरे आहे. (मुद्दामच होती असा भूतकाळ वापरला आहे कारण) आजमात्र या समाजात निदान महाराष्ट्रात तरी पुष्कळ जागृती झाली आहे. अंनिस वाले तर आहेतच, पण इतरही काही संस्था धडाक्याने काम करीत आहेत. या कामाची सुरुवात तीस- चाळीस वर्षांपूर्वीच झाली आहे. गोव्यात या प्रथेचे जवळपास उच्चाटन झाले आहे. कर्नाटकात मात्र अजूनही आणखी कामास वाव आहे. सौंदत्तीच्या यल्लम्मादेवीच्या जत्रेत देवदासीपणाची दीक्षा दिली जाते म्हणून या यात्रेच्या दिवसांत कार्यकर्ते तिथे जाऊन लोकांची मने वळवतात. त्यांच्या संमतीने जटा कातरणे, शारीरिक स्वच्छता करणे, प्रसंगी (डोक्यात जखमा आणि किडे झाल्याने) इस्पितळात भरती करणे अशी कामे या कार्यकर्त्यांना करावी लागतात. शिवाय मुक्त झालेल्या देवदासींच्या शिक्षणाचा आणि पुनर्वसनाचा प्रश्नही जटिल असतो. उपजीविकेचे साधन मिळाले नाही तर या स्त्रिया पुन्हा त्याच मार्गाला लागण्याचा धोक असतो. पण समाधानाची गोष्ट अशी की या समाजातील माजी देवदासींनीच हे कार्य मनावर घेतले आहे आणि त्याच आता कार्यकर्त्या बनल्या आहेत. आणखी वीस-पंचवीस वर्षांनंतर महाराष्ट्रात देवदासी कदाचित दिसणार नाहीत इतका वेग या कार्याने घेतला आहे.
देवदासीप्रथानिर्मूलनाबरोबरच कोल्हाटी आणि तमासगीर समाजामध्येही जागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. देवदासीप्रथेत देवाच्या कोपाची भीती किंवा दहशत असे; कोल्हाटी बाया 'ठेवणे' या प्रकारात मानवी दहशत गावपातळीवर पुष्कळच आहे आणि तिचा सामना करणे पीडितांना कठिण जाते. पण तरीही काही नेत्रदीपक सक्सेस-स्टोरीझ आहेतच. असेच कार्य तृतीयपंथी समाजातही चालू आहे. हळूहळू का होईना, परिस्थिती बदलेलच.

मध्यंतरी 'लाईफ ओके' अश्या वाहिनीवरील 'सावधान इंडिया' या कार्यक्रमात या प्रथेसंदर्भात नुकत्याच घडलेल्या एका करुण कथेचा वृत्तांत दाखवण्यात आला. प्रथा दुर्दैवाने सुरू आहे असे दिसते. विशेषतः विजापूर, सोलापूर व कर्नाटक, आंध्रमधील काही प्रदेशांत ती सुरू असावी.

लेखाशी सहमत आहे.

धार्मिकता या नावाखाली शोषण करणे यापलीकडे यात काहीही नाही. प्रश्न नेहमीचाच आहे. कायदा कठोर असला तरीही अंमलबजावणी कठोरपणे होत नाही.

बाकी गावाचं माहित नाही. पण सिंधुदुर्ग जील्ह्यात हि प्रथा थोड्या वेगळ्या प्रकारे होती. इकडे देवदासिना 'भावीण' म्हणायचे. माझ्या आठवणी प्रमाणे मी त्यांना भिक मागून जगताना कधीच पाहिलं नव्हत. त्यांच्या मुलांना स्वताचे वडील कोण ते सुद्धा माहित नसायचं. त्यांना आडनाव सुद्धा नसयचि. गावचेच नाव आडनाव म्हणून वापरतात. जसे कणकवलीकर , कुडाळकर इत्यादी.

पण एक मात्र नक्की होत, गावातील 'प्रतिष्टित' वतनदार लोक त्यांचा उपभोग घ्ययचे.

एक चांगली गोष्ट सध्या हि प्रथा पूर्णपणे बंद झाली आहे.

समजा या प्रथेला वाईट असं माबोवरच्या प्रत्येकाने म्हटलं तरी काय साध्य होणार आहे?
खरी जागृती तर त्या समाजाची झाली पाहिजे ज्या समाजात या प्रथा चालू आहेत.
तुम्ही हिंदू धर्मातल्या काही गोष्टींविषयी जे इतर धागे काढलेत ते इथे रिलेवंट आहेत तरी.>>>>>>>
असहमत.
हिंदु धर्मावर कितीहि इथे चर्चा केली तरी so called secular मंडळी बदलु शकणार आहेत का ? माबोवरची अशी मंडळी देखील बदलु शकत नाहित बाहेरच्यांचे सोडाच. तुमचे परममित्र इब्लिस यांचेच उदाहरण आहे की.
इथे चर्चा करुन तसे म्हणले तर कशाचाच काहि उपयोग नसतो, मग काय फक्त लोणची आणी मुरंबे कसे करावे हे धागे काढायचे का ?

A +

असल्या प्रथांवर सिनेमे काढणार्‍यांचा निषेध, हिंदू धर्मातील वाईट गोष्टीच मुद्दाम दाखवतात, पावसासाठी यज्ञ केला आणि पाउस आला असा सिनेमा का काढत नाहीत? ढोंगी सेक्युलर सिनेमावाले आणि इब्लिस.

हिम्मत असेल तर बुरखा प्रथेविरुद्ध , ४ बायका करण्याविरुद्ध सिनेमा काढुन दाखवावा सो कोल्ड सेकुयलर वाल्यांनी आणी मगच इथे आगाउपणा करायला यावे.

आगाऊ, गाईड पिच्चरात दाखवलंय की. लगान पिच्च्रात पण. फक्त पावसाची प्रार्थना केली तरी येतो पाऊस. Happy

आमच्या येडीयुरप्पानी त्यांच्या काळात सगळ्या कर्नाटकवासियाना एकाच दिवशी पावसाची प्रार्थना करायला लावली होती.
पाऊस पडला नाहीच पण येडीबाबाची खुर्चीपण गेली नंतर.

आगाऊ, गाईड पिच्चरात दाखवलंय की. लगान पिच्च्रात पण. फक्त पावसाची प्रार्थना केली तरी येतो पाऊस.>>> अहो पिच्चरात काहिहि दाखवतात. येडिबाबांनी फक्त प्रार्थना करायला सांगीतली, राजीव बाबाने तर मुस्लिम स्त्रीयांचे हक्कच काढुन घेतले. असे आपले सेक्युलर नेते आहेत सातीताई!

हिंदु समाजातील वाईट चालीरीती नष्ट झाल्या तर काय बिघडले बुवा ?? वाईट ते वाईटच. ईतर समाजात वाईट रुढी/ परंपरा/वर्तणुक आहे मग हिंदु समाजातील वाईट रुढी-परंपरावरच का हल्लाबोल करायचा हा ईथल्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचा दृष्टीकोन अगदीच संकुचित म्हणावा लागेल.

वर लिंबुटिंबुने 'लव्ह-जिहाद' चा उल्लेख केलाय. हिंदु समाजातील मुलींची अक्कल तेव्हा शेण खायला जाते काय?? ईथे लेख्ण्या झिजवणारे भोंदु हिंदुत्ववादी का नाही अशा मुलींना पुन्हा धर्मात घेण्यासाठी काही करीत??? हिंदु समाजातील वाईट चालीरितींबाबत काही बोलले की लगेच ब्रिगेडी-नक्षली-सुडोसेक्युलर हे शब्द फेकत उतारे लिहुन काढायचे यापुरताच यांचा हिंदुत्वाबद्दलचा पुळका!

हिंदु समाजातील वाईट चालीरितींबाबत काही बोलले की लगेच ब्रिगेडी-नक्षली-सुडोसेक्युलर हे शब्द फेकत उतारे लिहुन काढायचे यापुरताच यांचा हिंदुत्वाबद्दलचा पुळका!>>>>>>> सो कोल्ड सेक्युलर वाल्यानी मुस्लिम समाजातील वाइट रुढिंवर टिका करायची हिम्मत दाखवावी आधी.

सेक्युलर, सेक्युलर करणारे वेळ आली ती टीका करायला फक्त हिंदु समाजातील वाइट प्रथाच कशा शोधुन काढतात ? सेक्युलर आहात ना ? सर्व धर्म समभाव मानता ना ? मग एकाच वेळेस करा कि टिका सर्व धर्मातील वाइट गोष्टिंबद्दल!

देवदासींची प्रथा धर्माशी निगडीत नसून ती माणूसकीशी आहे,
धागा उत्तम, याविरोधी आपण काय करु शकतो याबाबत चर्चा व्हावी

माणुस, मुस्लिम समाजातील अनिष्ट रूढींविरोधात मी शंभर पाने किमान लिहू शकते पण ते इथे वाचायला कितीसे मुस्लिम येणारेत.
माझे निम्मे पेशंट मुस्लिम आहेत . त्यांना त्यांच्यातल्याच अनिष्ट प्रथांमुळे काय आरोग्याचे त्रास भोगावे लागतात हे मी वेळोवेळि त्यांच्या प्रत्येक विजिटला सांगतेच पण आमच्या इथल्या मुस्लिम अल्पबचत मंडाळातर्फे जेव्हा फ्री कँप असतात तेव्हाही समजावून सांगते. (असे असूनही) आयडियल वुमेन पुरस्कार त्यांच्या संघटनेने मला देऊ केला तेव्हा मी तो सरळ नाकारला. कारण या पुरस्काराच्या आमंत्रण पत्रिकेबरोबर त्या बायका एक संघटना पत्रिका घेऊन आल्या होत्या ज्यात त्यांच्या धर्माच्या मते प्रत्येक रोलमध्ये आयडियल कसे असावे हे लिहिले होते. यात त्यांच्या आयडियल वर्किंग वूमेनच्या क्रायटेरिया वाचून हसावे की रडावे ते कळत नव्हते. ती पत्रिका आहे माझ्याकडे देईन कधीतरी त्यातले उतारे इथे गंमत म्हणुन.
मग मी त्याना सांगितले बायांनो ,हे तुमचे मला मंजुर नाहि तेव्हा तुमचा पुरस्कारपण मला नको.
त्या येवून नंतर ट्रॉफी माझ्या नकळत इस्पितळात ठेऊन गेल्या. Happy

तर माझे म्हणणे असेय की रिलेवंट ऑडियन्ससमोर रिलेवंट गोष्टी बोलाव्या.उगाच माबोवर मुस्लिम प्रथांबद्दल लोकजागरण करण्यात काय अर्थ?
मायबोलीवर इन मिन तीन जन्माने/ कन्वर्टेड मुस्लिम मला ठाऊक आहेत फक्त!

माणुस, मुस्लिम समाजातील अनिष्ट रूढींविरोधात मी शंभर पाने किमान लिहू शकते पण ते इथे वाचायला कितीसे मुस्लिम येणारेत.
तर माझे म्हणणे असेय की रिलेवंट ऑडियन्ससमोर रिलेवंट गोष्टी बोलाव्या.उगाच माबोवर मुस्लिम प्रथांबद्दल लोकजागरण करण्यात काय अर्थ?
मायबोलीवर इन मिन तीन जन्माने/ कन्वर्टेड मुस्लिम मला ठाऊक आहेत फक्त!>>>>>>>>>

खरे सेक्युलर असेल तर त्याने सर्व धर्मावर टिका करण्याची हिम्मत आणी मानसिकता दाखवावी. उगाचच धार्मिकतेला मध्ये आणुन एकांगी टिका करु नये. मुस्लिम कम्मुनिटिवर जाउन लिहा ना मग. दाखवा हिम्म्त. सर्व धर्म समभाव मानता ना! भारतीय मानता ना सर्व धर्मातील लो़कांना!

माझे निम्मे पेशंट मुस्लिम आहेत . त्यांना त्यांच्यातल्याच अनिष्ट प्रथांमुळे काय आरोग्याचे त्रास भोगावे लागतात हे मी वेळोवेळि त्यांच्या प्रत्येक विजिटला सांगतेच>>> Proud तुम्हि खरोखर सांगितले असतेत ना, तर तुम्हि आज फतव्यावर असता. इथे लिहिणे आणी प्रत्यक्षात ते त्या लोकांना सांगणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. असो.

ज्यांना हिंदु धर्मात वाईट गोष्टि आहेत असे वाटते त्यांनी सरळ हिंदु धर्म सोडावा आणी जो दुसरा धर्म आवडतो त्यात जावे!

ज्यांना हिंदु धर्मात वाईट गोष्टि आहेत असे वाटते त्यांनी सरळ हिंदु धर्म सोडावा आणि जो दुसरा धर्म आवडतो त्यात जावे! >. अत्यंत हास्यास्पद. ईथे कोणिही स्वतला सेक्युलर म्हणवुन पाठ थोपटुन घेत नाही. ज्या गोष्टी मला माझ्या समाजात चु़कीच्या आणि अनिष्ट वाटतात, त्याबद्दल माझी मते व्यक्त करणे म्हणजे दुसर्‍या धर्माची भलामण करणे हा तुमचा समजच मुळी कीव येण्याजोगाच आहे.

ज्यांना हिंदु धर्मात वाईट गोष्टि आहेत असे वाटते त्यांनी सरळ हिंदु धर्म सोडावा आणी जो दुसरा धर्म आवडतो त्यात जावे!>>>>>>>>>>>>>>> अगदी बरोबर लाथा घाला गद्दाराना , दुसरा धर्म स्वीकारून सुधारना करा.नाहीतर नवीन धर्मच काडा इतराप्रमाणे हिन्दूचे धर्मग्रन्थ चोरून..

हिन्दू धर्मातिल चागल्या बाबी लिहा ना . माहित नसल्या तर समजून घ्या . रस्ता झाडणारेची कचरावरच नजर असते. दोन चार चागल्या गोष्टी साग .

शी!!! लेखकाने किती कळकळीने देवदासी आणि त्यांच्या हलाखीच्या जीवनाबद्दल लिहिलेय इथे. आणि वर कोणीतरी गरीबी या अश्या प्रथांसाठी जबाबदार आहे हेही लिहिले आहे.

हा विषय इथे चर्चा करुन सुटणारा आहे की नाही हा वेगळा मुद्दा.. पण उगाचच विषयाला वेगळे वळण देऊन इथे भांडण करत बसलेत सगळे.

ज्यांना हिंदु धर्मात वाईट गोष्टि आहेत असे वाटते ....>> याला तुम्ही अनुमोदन दिलेत म्हणुन मी म्हटले. चांगल्या गोष्टी आहेतच की आणि त्याचा सर्वांनाच अभिमान आहे,मलाही आहेच. पण ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्याबद्दल काही लिहीले तर त्याला लगेच ब्रिगेडी/नक्षल्या/स्युडो सेक्युलर म्हणुन झोडपणे कितपत योग्य??? मी माझ्या घरातला कचरा न काढता शेजार्‍याचे घर किती अस्वच्छ म्हणुन त्यावर टीका करणे योग्य नाहीच. माझ्या घरातल्या कचर्‍यावर माझी नजर असलीच पाहिजे.

मायबोलीवर इन मिन तीन जन्माने/ कन्वर्टेड मुस्लिम मला ठाऊक आहेत फक्त>>>> मी मायबोलीवर किमान पंधरा मुसलमानांना ओळखते. फक्त ते लोक इथे येऊन मी मुस्लिम आहे हे सांगत नाहीत. त्यांचे एरवीचे वागणे बघितले तर कुनी त्यांना मुस्लिम म्हणणार पण नाही. Happy

देवदासी ही प्रथा हिंदू "धर्माची" प्रथा नाही, हे प्रत्येकाला मान्य असायला हरकत नसावी. मग जी प्रथा आपल्या धर्माने सांगितलेलीच नाही, त्या प्रथेचं निर्मूलन करण्यात कसला कमीपणा आलाय? त्यासाठी उगाच मुस्लिम आणि इतर धर्मांना कशाला शिव्या घालायच्या? त्यांचं ते बघून घेतील काय करायचं ते. चार बायका तर करतील, बुरख्यात तर राहतील. तुम्ही तुमच्या मुलीबाळींना शिकवा, असल्या दरिद्री प्रथांमधून बाहेर पडा. आपल्या धर्माचा विकास तुम्ही स्वत: करा. स्वतःची व्होट बँक बनवा, राजकारण्-समाजकारणातील ताकद वाढवा.... उगाच इतरांना नावे ठेवण्यात आपला बहुमूल्य वेळ कशाला घालवायचा?

Pages