पावसाची देशी कविता (अमेरिकन चष्म्यातून)

Submitted by उद्दाम हसेन on 9 June, 2013 - 12:40

साल : ३०१३. जून ०७
स्थळ : पुंबई ईस्ट, प्राचीन विद्या संशोधन केंद्र
२०१३ सालच्या आंतरजालाचा शोध लागल्यानंतर मराठी आणि तत्सम भाषा डिकोड झाल्याने पाऊस असा सर्च दिल्यावर सापडलेली एक कविता. ब-याच कविता सापडल्या. त्यावरून पाऊस आल्यानंतर आनंदी होणा-यास कवी म्हणत असावेत असा निष्कर्ष निघालेला आहे. या निष्कर्षाला छेद देणारी कविता सापडल्याने संशोधक बुचकळ्यात पडलेले आहेत. सदर कवीने हा माझा पहिला प्रयत्न आहे असं नमूद केल्याने गोंधळ आणखी वाढला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
दि. ९ जून २०१३, अमेरिका
(कविता लिहीण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. तसा मी कधीच कविता, गझला यांच्या वाटेला जात नाही. पण पाऊस आल्यानंतर कविता का लिहीतात हे जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न आहे. )

नेमेचि येतो पावसाळा
रेनकोट, छत्री आणि तळी
मला यांचा फार फार कंटाळा
इथल्या रस्त्यात साचत नाही
गुडघाभर पाणी
भारता मधले लोक गातात
पावसात ओली गाणी

मी हा असा, सांगू कसा कुणास काही
अमेरिकेत बसून देतो सल्ले भारी भारी
ऐकत नाही माझे कुणी सवय झाली आता
पोस्टी टाकत भांडत खातो बिस्कीटे खारी

आमच्याकडे बरे आहे, मजेत आहे मी
पाऊसच बरसतो फक्त व्यापून दिशा चारी
तिथल्या पावसात असं कधी होत मात्र नाही
ढग येताच कवी निघतात घेउन गळक्या झारी

मी तर म्हणेन बंदी घाला गळक्या झारींवरती
पण उगाच बोलून तोंडची, वाफ दवडू किती
मला काही कळत नाही तुमचा देश म्हणतो
पाऊस तुमचा, कवी तमचे, उगवू द्या सगळीकडे काव्यभूछत्री !!

कवी - (कोण) नक्की)?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud
धन्यवाद मधुरीता.
धन्य त्या गायनी कळा मधे ग्रुपपुरती मर्यादीत करूनही वाचल्याबद्दल आणि आवड कळवल्याबद्दल आभारी आहे.

मी संबंधित आहे.
अमेरिकेतल्या मुंबईतल्या पार्ल्यात चहा पार्टीत माझी पोस्ट वाचून तुम्ही ही कविता पाडलीत.
तरिही तुमच्या विश्वासाचे पानिपत होऊ न देता तुम्हाला क्षमा केली आहे.
Wink

नाही ब्वॉ !!
तू नक्की संबंधित नाहिस.

( चहापार्टिचा संदर्भ आत्ता कळाला. बरेच दिवस, महीने लक्षातच नाही ना Proud )