ओटमील दोसा

Submitted by अदिति on 8 June, 2013 - 14:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उडित दाळ १ वाटी
मेथी दाणे १ चमचा
ओट्मील १ वाटी
तेल
मीठ चवी पुरता
कोणत्याही पदार्थात मुठभार पालक टाकण्याच्या माझ्या नियमाप्रमाणे मी तो ह्यात ही टाकते

क्रमवार पाककृती: 

१. उदित दाळ व मेथी दाणे २ तास भिजवत ठेवा.
२. डाळ मिक्सर मधे बारीक करायला घेण्या आधी ओट्मील मधे पाणी घालुन ठेवा
३. डाळ चागंली बारीक(चीमटीत घेउन बोटाना कणी लागत नाही ह्याची खात्री करुन घ्या) वाटुन झाली की ओट्मील बारीक करुन घ्या
४. वाटतानाच मी ह्यात पालक घालते
५. डाळ आणी ओट्मीलचे बॅटर चागंले एकत्र करुन चवीपुरते मीठ घालुन झाकुन ठेवावे
६. हे बॅटर चांगले फरमेन्ट झाले की (साधारण ८ तास हा वेळ धरला नाहीये) दोसे बनवावेत

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. चांगला जाड तवा घेउन तो व्यवस्थित तापवुन दोसे केलेत तर एकदम कमी तेलात ही होतात
२. उलथणे टोकाला एकदम थीन असले की दोसा उलाटताना मोडत नाही.उलटण्याआधी तो हळुवारपणे तव्यापासुन सोडऊन घ्यावा
३. बॅटरची कन्सीसटन्सी बरोबर असेल आणी डाळ्/ओट्मील चांगले बारीक दळ्लेले असेल तर चांगला पातळ कुरकुरीत दोसा बनवता येतो
४. टोमॅटो किंवा खोबर्याच्या चट्णी बरोबर छान लागतो

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण आणी माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूम्पी नाही होत. म्हणजे बॅटर जेव्हडं होत तेव्हडच. चवीत फरक पडत नाही. शर्मिला खुप कॉमन आहे ही पाककृती.
स्वाती तु टाकला होतास का पालक? तुला जाणवला का काही फरक?