गाण्याला scale चे महत्त्व काय?
नोटेशन कसे काढतात?
Obligato कसे बनवावेत? काही सल्ले?
कुणाला माहित आहे का? काही माहिती, दुवे मिळले तर बरे होईल.
मधुरीता:
१.कुठल्याही गाण्याचे नोटेशन काढताना त्याचा बेस स्वर शोधावा. बेस स्वर म्हणजे गाण्याची सुरुवात होते तो स्वर नाही तर ज्या स्वरावर त्या गाण्याचा ठेहराव आहे तो स्वर.
२. बेस स्वर म्हणजेच त्या गाण्याची ओरीजीनल पट्टी. तो 'सा' समजुन सा-प-सां वाजवावे म्हणजे गाण्यासाठी लागणारे 'सप्तक'(scale) मिळेल.
३. मग त्या सप्तकात गाणे वाजवण्यास सुरुवात करावी. आणि ज्या पट्ट्या गाण्यासाठी वापरल्या जातील त्या बेस स्वरापासुन ('सा' पासुन) किती अंतरावर आहेत त्यानुसार त्यांचे स्थान निश्चीत करावे.(सा-ग, सा-म, सा-गा इत्यादी) आणि तसे लिहुन काढावे.
४.नोटेशन लिहिताना 'शुद्ध, कोमल आणि तीव्र' स्वरांचे भान ठेवावे.(flat स्वर).
मेधावि
कोणत्याही गाण्याचे नोटेशन काढता येते परंतु त्याला मर्यादा असतात. जसे की काही स्वरांच्या आधी किंवा नंतर किंवा मधेसुद्धा काही कणस्वर असतात जे नोटेशन मधे मांडणे अवघड असते. तसेच स्वरांचा लगाव, वजन ह्या गोष्टीसुद्धा नोटेशनमधे मांडता येत नाहीत. त्यामुळे एखाद्या बंदिशीचे कितीही चांगले नोटेशन काढले तरी ती संपूर्ण चाल होत नाही. म्हणूनच भारतीय अभिजात संगीतात गुरुमुखातून मिळणार्या विद्येला अनन्यसाधारण महत्व आहे.
दादः
सुमेधाव्ही ने वर म्हटलय तसं... नोटेशनने आकार, बांधणी, ताल, चौकट कळू शकते पण त्यातली (कला)कुसर भारतीय नोटेशनमधे उतरवणं कठीण आहे... आपल्याकडे नोटेशन सिस्टिम तितकी प्रगत नाही त्यामुळे असेल कदाचित.
उदा. सारे जहांसे अच्छा ह्यात (' दिलेले स्वर कोमल अथवा तीव्र(म) धरावेत)
सारे जहासे अच्छा
ग'ग'रे सारेनि सासा
आता ह्यात आपण म्हणताना जहा हे 'सारे' असं सरळ आणि इतकच नाही म्हणत. जहा नंतर पुढल्या स्वराला किंचित स्पर्श करून येतो. त्यामुळे नोटेशन अधिक समृद्धं करायचं तर..
ग'ग'रे सारे(ग')नि सासा
पास्चिमात्यं नोटेशन पद्धत खूप प्रगत आहे. पियानो सारख्या वाद्याच्या सुरांवरचे आघात आणि व्हॉल्यूम ह्यावरही त्यात बारकावे आहेत.
लेकाने कीबोर्डवर वाजवून त्याचं तय्यार स्क्रिप्ट दाखवलं तेव्हा मज्जा वाटली होती. आता असं वाटतं की, ज्याला उत्तम कीबोर्ड वाजवता येतो अन मिडी सॉप्फ्टवेअर, म्युझिक रायटर तंतरज्ञानाची Happy चांगली कल्पना आहे त्याने मराठी गाणी वाजवून त्याची स्क्रिप्ट्स काढायला हवीत. मात्रं ती वेस्टर्न स्क्रिप्ट बोलीत असतिल... ते एक शिकलं की झालच.
(नाहीतर... गुरुमुखी विद्या घेणं आलं.)
रेडिमेड नोटेशन घेऊन गाण्याची आऊटलाईन वाजवता येईल. पण त्यातल्या बारकाव्यांसठी कान तयार करायला हवा अन हातही
मधुरीता:
नोटेशन काढण्यासाठी उत्तम वाजविण्याबरोबरच वाजविणारा उत्तम कानसेन ही हवा हे दाद यांनी सांगीतलेले १०१% पटणारे.
नोटेशन काढणे हे थोडे जिकिरीचे आणि वेऴकाढु काम असले तरीही ते तितकेच उपयुक्त ठरते. उदा: एखादे गाणे नोटेशन काढले असल्यास कधिही वाजविता येते. तसेच नोटेशन पाहिल्यावर कोणते स्वर वापरले आहेत ते पाहुन गाणे कोणत्या रागावर आधारीत आहे ते समजते.
गाण्याचे नोटेशन काढण्यासाठी step by step जाणे जास्त चांगले. तयार नोटेशन वाजविताना दिलेल्या तालात आणि लयीत वाजविणे अवघड जाते. म्ह्णुन सुरुवातीला आपल्यापुरते सोपे नोटेशन काढणे कधिही चांगले.
त्यासाठी आपल्याला नोटेशन काढताना काय आवश्यक आहे ते आधी पाहु-
१. स्वरांचे ज्ञान (शुद्ध, कोमल, तीव्र)
२. सप्तकाचे ज्ञान( मंद्र, मध्य, तार सप्तक)
३.तालाचे ज्ञान
४.लयीचे भान
५. स्वरलिपी लेखनाचे नियम व चिन्हे
६.कण स्वर, मींड, एकत्र वाजवायचे स्वर इ. च्या खुणा
हे सारे आवश्यक असले तरीही आपण वरती म्हटल्याप्रमाणे सोपे नोटेशन काढता येते. त्यासाठी सुरुवातिला गाण्याच्या प्रत्येक शब्दाचे नोटेशन काढायचे. म्युझिकचे नोटेशन काढताना 'लल ला ला' असे म्हणत स्वर ओळखुन लिहुन काढायचे. हे सारे करताना ताल, लय इ. थोडा वेळ बाजुला ठेवायचे. आणि मग ते नोटेशन शब्दानुसार वाजवीत म्हणायचे, म्हणजे हळुह्ळु लय साधत जाते. मग हातावर ताल देत कुठला शब्द तालाच्या कुठल्या मात्रेवर येतो ते पाहुन तालाच्या खुणा त्या नोटेशन खाली कराव्यात.
ही पद्धत वापरुन हळुहळु नोटेशन काढणे जमत जाते.
संगीतकार एखादी चाल बसवतो तेव्हा ताल आणि लय कशी निवडतो ( निवडते?)
अनेकदा आपल्या वाचनात येते की अमुक एका संगितकाराला ही चाल देताना काय काय अनुभव आले. ते एखाद्या चित्रकाराने रंगविलेल्या पेंटींग सारखेच असते. गाण्याची बांधणी, त्यातील आशय, शब्दरचना, गाण्याचा बाज, गायक, गायीका, गाणे कोणत्या प्रसंगावर चित्रीत होणार आहे या आणि अशा बर्याच गोष्टींचा विचार करुन संगितकार गाण्यावर स्वरसाज चढवतो.
प्रत्येक संगीतकाराची स्वतःची स्वतंत्र शैली असते. उदा: ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या अनवट आणि भरपुर चढउतार असलेल्या सुरावटी किंवा बाबुजींच्या ऐकुन सोप्या वाटणार्या पण हाताळायला अवघड अशा वैशीष्ट्यपुर्ण चाली.
या चाली देताना ताल आणि लयाची कशी निवड करतात असा प्रश्न तुम्ही केला आहे. पण ह्याचे उत्तर 'आधी कोंबडी की आधी अंडे' यासारखे अवघड आहे. कारण काही संगीतकार आधी गीताचा अभ्यास करतात. त्यातील शब्दोच्चार, त्यावरचे आघात, नाद, गाण्याचा बाज, गीताचा अर्थ, भावना,गीताचा प्रकार या बाबींचा विचार करुन मग चाल बांधतात आणि त्याचवेळी त्याचा ताल आणि लय ठरवितात. उदा: भजन असेल तर ताल भजनी/केहरवा लय स्लो, लावणीसाठी दादरा, दिपचंदी इ. आणि लय गीतानुसार, यामध्ये गीत प्रकार आणी शब्द यांनी गाण्याची चाल बांधीव असते.
तर काही संगीतकार आधी चाली बांधतात. त्यावर स्वरसाज चढवितात मग गीत त्यावर लिहुन घेउन गीतानुसार, प्रसंगानुरुप आणि वैशीष्ट्यपुर्ण चालीनुसार ताल व लय ठरवितात. किंवा आधिच ताल व लय ठरवुन त्यावर गीत लिहुन घेतात. या प्रकारात ताल व लय निवडीचे भरपुर स्वातंत्र असते. उदा: ए. आर. रहमान आधी चाली देतो, ताल व लय ठरवितो, वाद्यांची निवडही करतो आणि मग गीताची रचना त्या चालीनुसार बनवतो. यामध्ये गीताचा अर्थ आणि शब्दांची घडण बदलण्याचा धोका असतो. पण लय, ताल आणि स्वरमेळाचे वैविध्य अनुभवता येते.
असे म्हणतात की गाण्याचे नोटेशन काढताना नुसते स्वरज्ञान असुन चालत नाही, तर गाण्यातील बोल, त्याचा आशय, त्याच बरोबर शब्दांची घनता, आघात, गाण्याला रंगत आणणारा लयपुर्ण ठेका इ. अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी गाण्यासाठी वापरलेला ताल आणि लय(गती) यांचाही विचार गाण्याचे नोटेशन काढताना करावा लागतो.
हिंदुस्थानी संगितात, अनेक ताल वाद्यांचा वापर केला जातो जसे की, तबला, घट, ढोलकी, चिपळ्या इ.
हे ताल ठरावीक आणि नियमीत आघातांनी बनलेले असतात. त्यांना मात्रा असे म्हणतात.
हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीतात विविध मात्रांचे ताल प्रचलीत आहेत, ८ मात्रांचे, ६ मात्रांचे, १६ मात्रांचे इ.
या तालांचे ज्ञान असणे आणि त्यातील तालाच्या खुणा माहीत असणे हे नोटेशन लिहिताना जरुरीचे असते.
तालाबरोबरच तालाची गती (लय) विचारात घ्यावी लागते. गाण्यातील ओळीत तालाची गती ही नियमीत आणि एकसारखी ठेवावी लागते. नाहीतर गाणे मध्येच फास्ट्/स्लो असे काहीसे होइल. याचा बॅलन्स ठेवणे यालाच लयीची जाण्/भान असे म्हणता येइल. त्यासाठी ताल आणि लयीविषयी थोडी माहीती खाली देत आहे.
तालः गाण्याचा ठेका (नियमीत) . ताल मोजण्याचे साधन म्हणजे मात्रा(बिट्स). तालातील एकुण मात्रा या खंडांमध्ये विभाजीत केलेल्या असतात.
लयः तालाची गती(स्पीड अथवा टेंपो). तालाच्या प्रत्येक खंडामध्ये एकसमान गती असणे आवश्यक असते. नाहीतर गाण्याचा बॅलन्स कोलमडतो आणि गाणे वरती सांगीतल्याप्रमाणे फास्ट/स्लो असे काहीसे होइल.
उदा:
ताल : केहेरवा
मात्रा: ८....................(एकुण मात्रा)
खंडः ४(२,२,२,२)........(तालाचे विभाजन आणि त्यातील मात्रा)
सम: १ ली मात्रा.......(तालाची सुरुवात)
कालः ५ वी मात्रा.....(तालाचा मध्य किंवा आघात न येणारी महत्वाची मात्रा)
टाळी: १,३,७............(खंडातील पहिली मात्रा ज्यावर आघात येतो)
1--------2--------|3-------4--------|5--------6--------|7--------8-------|
धा------गे--------|न--------ती------|न--------क-------|धी-------न------|
सम(x).....................................काल(o)....................................(१ आवर्तन)
|<-----खंड------>|<-----खंड------>|<-----खंड------>|<-----खंड------>|
|::::::::::::::::::::::::::लय (एकसमान गती)::::::::::::::::::::::::::::::::::::|
मधुरीता:
सर्वांना कळण्यासाठी पेटी विषयी थोडी माहिती-
(हिच माहिती कॅसिओ आणि सिंथेसायझरलाही लागु होते.)
१. पेटीमध्ये(हार्मोनिअम) मध्ये तीन सप्तक पट्ट्यांचा सेट असतो. प्रत्येक सेट मध्ये ५ काळ्या(ब्लॅक) आणि ७ पांढर्या पट्ट्या असतात.
२. कुठलिही पट्टी 'सा' समजुन वाजविता येते. आणि प्रत्येक सेट मध्ये ५ काळ्या(ब्लॅक) आणि ७ पांढर्या पट्ट्या असतात.
३. त्या 'सा' पट्टीपासुन सलग येणार्या १२ काळ्या-पांढर्या पट्ट्या मिळुन एक सप्तक सेट तयार होतो.
४. प्रत्येक सप्तकात एकुण बारा स्वर असतात.
५. त्यामध्ये (७) शुध्द स्वर - सा रे ग म प ध नी
(४) कोमल स्वर- रे`, ग`, ध`, नी` (शुद्ध स्वरापेक्षा कमी उंचीचा)
(१) तिव्र स्वर- म` (शुद्ध स्वरापेक्षा जास्त उंचीचा)
एकुणः [ १२ ] स्वर
६. पेटीवर या स्वरांचा क्रम 'सा' पासुन पुढे दिला आहे. 'सा' नंतर क्रमाने येणार्या काळ्या-पांढर्या पट्ट्यांचा हा स्वर क्रमांक आहे.
पेटीवरती स्वरांचा क्रमः
१------२------३------४-----५-----६-----७-----८-----९-----१०-----११-----१२ | १३
सा---- रे`---- रे ----ग`----ग----म----म`----प----ध`---- ध---- नी` ----नी | सां
पाटील
वेस्टर्न नोटेशन (CDEFGA) हे फिक्स पट्यांवर चालु होतात तर सरगम कुठुनही चालु करता येते हे कशामुळे?
तसेच गाण्याच्या बीट्स ( मात्रा?) कशा मोजायच्या, मला गिटार strumming pattterns साठी ही माहिती हवी होती
तसेच tabs आणि chords चे कोरिलेशन कसे करायचे हे कुणाला माहीट असेल तर प्लिज लिहा
sulu
पाश्चिमात्य संगीतात 'harmony' ला प्राधान्य असल्यामुळे त्यांचा C नेहेमीच 'पांढरी १ - सा' असतो आणि बदलत नाही . हिंदुस्थानी अभिजात संगीतात, कुठलेही वाद्य 'गायकी' अंगाने वाजवत असल्याने 'Melody' महत्त्वाची असते आणि वेगवेगळे गायक आपापल्या कुवती नुसार जसे वेगवेगळ्या पट्टीत गातात तसे वाजवताना कुठलाही सूर 'सा' पकडून वाजवता येते असे मला कळलेले गणित
मधुरीता:
आपले हिंदुस्थानी संगीत सप्तक कल्पनेवर आधारीत आहे. म्हणजे सा ते नी पर्यंत ७ स्वरांचा समुह. आणि शेवटी येणारा 'सां' हा आठवा स्वर न मानता नंतर येणार्या सप्तकातील सुरुवातिचा 'सा' मानला आहे. तो सुरुवातीच्या सा च्या दुप्पट frequency चा असतो म्हणुन तो सप्तकात धरत नाहीत. आणि असे सप्तक कुठल्याही पट्टीपासुन सुरू करता येते ही भारतीय संगीताची लवचीकता सिद्ध करते. म्हणुनच आज जगातले सर्वात शास्त्रशुद्ध संगीत म्हणुन भारतीय संगीताकडे पाहतात. तसेच आपले संगीत कंठ संगीत (classical) म्ह्णुन जास्त ओळखले जाते. त्यामुळे गायक गायीकेच्या पट्टीनुसार गाणे वाजविणे अपेक्षीत असते. म्हणुन एकच 'सा' स्वर निश्चीत नसुन वेगवेगळया पट्ट्या 'सा' म्हणुन वापरतात.
पाश्चात्य संगितात ऑक्टेव्ह(octave) ही संकल्पना आहे. यामध्ये कायमस्वरुपी पांढरी १ हाच 'सा' मानुन वाजविला जातो आणि त्यानुसार इतर पट्ट्यांची नावे निश्चीत केली आहेत. त्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे CDEFG अशी पट्ट्यांना नावे आहेत. आणि ते वाजविणे सोपे जाते. तसेच ते harmony पद्ध्तीवर आधारीत असुन अनेक वाद्यांचा आणि गायकांचा मेळ घालुन वाजविले जाते. त्यामुळे सर्व वाद्यांना एकत्रित वाजविणे सोपे जावे म्हणुन एकच पट्टी (पांढरी १) 'सा' म्हणुन वापरली जाते.
तसेच गाण्याच्या बीट्स ( मात्रा?) कशा मोजायच्या, मला गिटार strumming pattterns साठी ही माहिती हवी होती>>>>>
मला पाश्चात्य संगिताबद्द्ल जास्त माहिती नाही. पण कुठल्याही संगीतात संज्ञा वेगळ्या वापरल्या तरीही मुख्य प्रवाह तसाच राहतो. म्हणुन गिटार बद्द्ल माहिती नसताना मी मात्रा मोजायची माहिती देण्याचे धाडस करीत आहे. चु.भु. दे. घे.
मात्रा/बिट्स हे ताल मोजायचे साधन आहे. कोणतेही गाणे वाजवायचे असल्यास प्रथम त्याचा ताल कुठला आहे हे जाणुन घ्यावे लागते. पाश्चात्य संगीतात ४ बिट्स, ८ बिट्स, १६ बिट्स आणि ३२ बिट्स चे ताल वापरतात. त्यांना ROCK1,ROCK2 आणि POP1,POP2 या किंवा अशासारख्या संज्ञा वापरतात.
एकदा ताल किती बिट्सचा आहे हे समजले की, सिलेक्ट केलेल्या गाण्याच्या एका ओळीत तालाची किती आवर्तने(१ ल्या मात्रेपासुन शेवटच्या मात्रेपर्यंतचा काल) आली आहेत हे शोधायचे. काही वेळा एका ओळीत ताल २ वेळा, तर काही वेळा ३ वेळा रिपिट होतो. त्यावरून गाण्याची गती कळते.
तालाच्या पहिल्या मात्रेला 'सम' असे म्हणतात. बहुतेक गाणी समेपासुन सुरुवात झालेली असतात. मग गाण्यात येणारी आवर्तने मोजली तर तितक्या वेळा त्या ओळीत सम येणार आणि समेवर गाण्यात आघात असतो. अशी सम शोधली कि मग गाण्याच्या मात्रा तिथुन मोजणे सोप्पे होते आणि ठेका सुरू करणेही सोपे जाते.
उदा:
हॅपी बर्थ डे टु,यु ~~~~~
१--------------| १
सम-----------|सम
या गाण्यात ४ बिट्स(किंवा ८ बिट्सचा डबल स्पीड) चा ताल असल्याने हॅपी आणि यु या शब्दांवर १ली मात्रा म्हणजे सम येते. आणि गाण्याच्या एका ओळीत तालाची २ आवर्तने (१ ते ४ मात्रा, १ ते ४ मात्रा) येतात. तसेच हॅपी आणि यु या शब्दांवर समेचा आघात जाणवतो.
sulu
ऑब्लिगाटोज बद्दल मला कळलेले थोडेसे -
Wiki नुसार, classical concert मध्ये कुठलाही बदल ( थोडक्यात शून्य improvisation) न करता वाजवलेला स्वर-समुह म्हणजे ऑब्लिगाटो.
साधारण भावगीते किंवा चित्रपट संगीताचा विचार केल्यास आपल्या सारख्यांच्या भाषेत 'गाण्याच्या दोन लायनींमधलं म्युजिक' म्हणजे हे ऑब्लिगाटोज.
ऑब्लिगाटोज म्हणजे counter symphony नाही. थोडक्यात गायक-गायिका गाणं म्हणत असताना मागे जी supporting व्हायोलिन किंवा सतार ऐकू येते ते नव्हे तर गाण्याची ओळ किंवा कडवे म्हणून झाले की दुसरे कडवे ( अंतरा) सुरु व्हायच्या आधी जे म्युजिक असते ते. बर्याच जणांच्या मते 'Music arrangement किंवा score' म्हणून जो प्रकार म्हटला जातो तो हाच.
मला ऑब्लिगाटोज बद्धल प्रचंड आकर्षण निर्माण झालेय ते थोडे संगीत समजायला लागल्यावर. अनिल मोहिले, रेहमान, एस. डी, आर डी मला या प्रकारात महानतम वाटतात. पण हे कसे निवडावेत, कुठल्या स्वर्-समुहाला कुठले वाद्य निवडावे, ताल बदलावा किंवा नाही याबद्दल नीट माहिती नाही. म्हणून हा धागा काढला आहे.
तेव्हा जाणकारानी जरून माहिती द्या. कदाचित हे musical score writing किंवा arrangement पेक्षा वेगळे असेलही, तर जरूर तसा खुलासा करावा ही विनंती.
मधुरीता:
यामध्ये जे लिहिले आहे ते वाचुन मला कळलेला obligato चा अर्थ म्हणजे फक्त कडव्यांच्या मधला म्युझीक पार्ट नाही तर त्याचे अनेक अर्थ अभिप्रेत आहेत. त्यातले खाली काही दिले आहेत.
१) म्युझिक अरेंजरने बनविलेला ठराविक पार्ट तसाच वाजविला पाहिजे आणि त्यात बदल चालणार नाही असा compulsory part of music.
२)काही वेळा अवघड रचना सोपी करुन वाजवितात, तेव्हा obligato ने दर्शविलेला पार्ट मात्र बदलला जात नाही. तो संगितकाराचा signing note असलेला आणि संगितकार ज्यामधुन सहज व्यक्त होतो असा पार्ट असतो आणि तो तसाच वाजविला जातो.
३)obligato चा असाही अर्थ होतो की, म्युझिक मधला तो ठराविक पार्ट तेथे दर्शविलेल्या ठराविक वाद्यानेच अथवा वाद्यांनीच वाजवावा असा निर्देश.
४)गाण्यामध्ये एखादा म्युझिक पिस ओरिजिनल गाण्यात ज्या वाद्याने वाजविला गेला आहे तो तसाच त्याच वाद्याने solo रितीने वाजविणे. त्यावेळी इतर वाद्यांनी वाजविणे थांबवावे लागते.
हे सगळे वाचुन मला काही obligato आठवितात, जसे 'हिरो' चित्रपटातला बासरीचा सोलो पिस. शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांमधले वाद्यांचे(पियानो) साईनींग नोट्स दाखविणारे पिस, अजय-अतुल यांचा नटरंग मधला ढोलकीचा, घुंगरु आणि तबला आणि इतर वाद्यांचा अप्रतीम पिस इ..
नोटेशनवरून आठवलं. एकाने मला
नोटेशनवरून आठवलं.

एकाने मला मी वाजवलेल्या लग्गीचे बोल लिहून द्यायला सांगितले. मी दिले. अन म्हटलं हे बोल आहेत. तुला लग्गी कशी ऐकू आली त्यानुसार हे तू वाचू शकशील. म्हणजे तुला 'भडकम्कर' ऐकू आलं की, 'भडक मकर' त्यावर आहे... तू काय वाजवशील ते
तबल्याच्या भाषेत तीनतालाच(च) ठेका प्रत्येक वाजवणार्याचा वेगळा का वाजतो... त्याचं उत्तर त्यांचा कान, हात किती तयार आहेत त्यावर आहे... ठेक्याचे बोल एकाच वेबसाईट वरून लिहून घेतले असले तरी
(इथे चालणारे सगळे संवाद... त्यांना आवाज हवा, बुवा... मैफिल असावी)
>>> म्हणजे तुला 'भडकम्कर' ऐकू
>>> म्हणजे तुला 'भडकम्कर' ऐकू आलं की, 'भडक मकर' त्यावर आहे..<<< कस्ल अचुक उदाहरण
साईट वरती संगीत प्रेमींची
साईट वरती संगीत प्रेमींची मस्त मैफील जमली आहे. गोळे जी,
दिलेल्या लिंक्स पण खुप छान आणि उपयुक्त आहेत.
सुलु, तुम्ही विचारलेल्या obligato विषयी माहिती देणार्या काही लिंक्स गुगल वरती पाहिल्या आणि त्याविषयी जे लिहिले होते त्यावरुन मी मला कळलेले खाली दिलेले आहे. चु.भु.दे.घे.
यामध्ये जे लिहिले आहे ते वाचुन मला कळलेला obligato चा अर्थ म्हणजे फक्त कडव्यांच्या मधला म्युझीक पार्ट नाही तर त्याचे अनेक अर्थ अभिप्रेत आहेत. त्यातले खाली काही दिले आहेत.
१) म्युझिक अरेंजरने बनविलेला ठराविक पार्ट तसाच वाजविला पाहिजे आणि त्यात बदल चालणार नाही असा compulsory part of music.
२)काही वेळा अवघड रचना सोपी करुन वाजवितात, तेव्हा obligato ने दर्शविलेला पार्ट मात्र बदलला जात नाही. तो संगितकाराचा signing note असलेला आणि संगितकार ज्यामधुन सहज व्यक्त होतो असा पार्ट असतो आणि तो तसाच वाजविला जातो.
३)obligato चा असाही अर्थ होतो की, म्युझिक मधला तो ठराविक पार्ट तेथे दर्शविलेल्या ठराविक वाद्यानेच अथवा वाद्यांनीच वाजवावा असा निर्देश.
४)गाण्यामध्ये एखादा म्युझिक पिस ओरिजिनल गाण्यात ज्या वाद्याने वाजविला गेला आहे तो तसाच त्याच वाद्याने solo रितीने वाजविणे. त्यावेळी इतर वाद्यांनी वाजविणे थांबवावे लागते.
हे सगळे वाचुन मला काही obligato आठवितात, जसे 'हिरो' चित्रपटातला बासरीचा सोलो पिस. शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांमधले वाद्यांचे(पियानो) साईनींग नोट्स दाखविणारे पिस, अजय-अतुल यांचा नटरंग मधला ढोलकीचा, घुंगरु आणि तबला आणि इतर वाद्यांचा अप्रतीम पिस इ..
जाणकारांनी अजुन चांगली उदाहरणे द्यावीत.
संगीत या विषयावर (विथ सीडी)
संगीत या विषयावर (विथ सीडी) अशी पुस्तके आहेत का? >>>>
manasmi,
मागच्या वर्षी पुण्यामधल्या सवाई गंधर्व कार्यक्रमामध्ये एका स्टॉल वरती संगीत विषयावर आधारीत पुस्तक विथ सीडी असे दिसले होते. पण नेहमिच्या दुकानांमध्ये मिळणे तसे अवघडच.
पण काही सिडींमध्ये गाण्यांची/रागांची आधी माहिती सांगितली असते आणि मग गाणी असतात. उदा:गोविंदराव टेंबे रचीत 'लक्षण गीते' ही सीडी.
नोटेशन काढण्यासाठी उत्तम
नोटेशन काढण्यासाठी उत्तम वाजविण्याबरोबरच वाजविणारा उत्तम कानसेन ही हवा हे दाद यांनी सांगीतलेले १०१% पटणारे.
नोटेशन काढणे हे थोडे जिकिरीचे आणि वेऴकाढु काम असले तरीही ते तितकेच उपयुक्त ठरते. उदा: एखादे गाणे नोटेशन काढले असल्यास कधिही वाजविता येते. तसेच नोटेशन पाहिल्यावर कोणते स्वर वापरले आहेत ते पाहुन गाणे कोणत्या रागावर आधारीत आहे ते समजते.
गाण्याचे नोटेशन काढण्यासाठी step by step जाणे जास्त चांगले. तयार नोटेशन वाजविताना दिलेल्या तालात आणि लयीत वाजविणे अवघड जाते. म्ह्णुन सुरुवातीला आपल्यापुरते सोपे नोटेशन काढणे कधिही चांगले.
त्यासाठी आपल्याला नोटेशन काढताना काय आवश्यक आहे ते आधी पाहु-
१. स्वरांचे ज्ञान (शुद्ध, कोमल, तीव्र)
२. सप्तकाचे ज्ञान( मंद्र, मध्य, तार सप्तक)
३.तालाचे ज्ञान
४.लयीचे भान
५. स्वरलिपी लेखनाचे नियम व चिन्हे
६.कण स्वर, मींड, एकत्र वाजवायचे स्वर इ. च्या खुणा
हे सारे आवश्यक असले तरीही आपण वरती म्हटल्याप्रमाणे सोपे नोटेशन काढता येते. त्यासाठी सुरुवातिला गाण्याच्या प्रत्येक शब्दाचे नोटेशन काढायचे. म्युझिकचे नोटेशन काढताना 'लल ला ला' असे म्हणत स्वर ओळखुन लिहुन काढायचे. हे सारे करताना ताल, लय इ. थोडा वेळ बाजुला ठेवायचे. आणि मग ते नोटेशन शब्दानुसार वाजवीत म्हणायचे, म्हणजे हळुह्ळु लय साधत जाते. मग हातावर ताल देत कुठला शब्द तालाच्या कुठल्या मात्रेवर येतो ते पाहुन तालाच्या खुणा त्या नोटेशन खाली कराव्यात.
ही पद्धत वापरुन हळुहळु नोटेशन काढणे जमत जाते.
मधुरीता, << ३.तालाचे
मधुरीता,
<<
३.तालाचे ज्ञान
४.लयीचे भान
>>
थोडे समजावाल का? संगीतकार एखादी चाल बसवतो तेव्हा ताल आणि लय कशी निवडतो ( निवडते?)
ऑब्लिगाटोज बद्दल तुम्ही सांगितलेले पटले. Makes Sense!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/16504 या दुव्यावरही की बोर्ड (सिंन्थेसायझर) निमित्ताने बरीच चर्चा झालेली आहे.
सुलु, असे म्हणतात की
सुलु,
असे म्हणतात की गाण्याचे नोटेशन काढताना नुसते स्वरज्ञान असुन चालत नाही, तर गाण्यातील बोल, त्याचा आशय, त्याच बरोबर शब्दांची घनता, आघात, गाण्याला रंगत आणणारा लयपुर्ण ठेका इ. अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी गाण्यासाठी वापरलेला ताल आणि लय(गती) यांचाही विचार गाण्याचे नोटेशन काढताना करावा लागतो.
हिंदुस्थानी संगितात, अनेक ताल वाद्यांचा वापर केला जातो जसे की, तबला, घट, ढोलकी, चिपळ्या इ.
हे ताल ठरावीक आणि नियमीत आघातांनी बनलेले असतात. त्यांना मात्रा असे म्हणतात.
हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीतात विविध मात्रांचे ताल प्रचलीत आहेत, ८ मात्रांचे, ६ मात्रांचे, १६ मात्रांचे इ.
या तालांचे ज्ञान असणे आणि त्यातील तालाच्या खुणा माहीत असणे हे नोटेशन लिहिताना जरुरीचे असते.
तालाबरोबरच तालाची गती (लय) विचारात घ्यावी लागते. गाण्यातील ओळीत तालाची गती ही नियमीत आणि एकसारखी ठेवावी लागते. नाहीतर गाणे मध्येच फास्ट्/स्लो असे काहीसे होइल. याचा बॅलन्स ठेवणे यालाच लयीची जाण्/भान असे म्हणता येइल. त्यासाठी ताल आणि लयीविषयी थोडी माहीती खाली देत आहे.
तालः गाण्याचा ठेका (नियमीत) . ताल मोजण्याचे साधन म्हणजे मात्रा(बिट्स). तालातील एकुण मात्रा या खंडांमध्ये विभाजीत केलेल्या असतात.
लयः तालाची गती(स्पीड अथवा टेंपो). तालाच्या प्रत्येक खंडामध्ये एकसमान गती असणे आवश्यक असते. नाहीतर गाण्याचा बॅलन्स कोलमडतो आणि गाणे वरती सांगीतल्याप्रमाणे फास्ट/स्लो असे काहीसे होइल.
उदा:
ताल : केहेरवा
मात्रा: ८....................(एकुण मात्रा)
खंडः ४(२,२,२,२)........(तालाचे विभाजन आणि त्यातील मात्रा)
सम: १ ली मात्रा.......(तालाची सुरुवात)
कालः ५ वी मात्रा.....(तालाचा मध्य किंवा आघात न येणारी महत्वाची मात्रा)
टाळी: १,३,७............(खंडातील पहिली मात्रा ज्यावर आघात येतो)
1--------2--------|3-------4--------|5--------6--------|7--------8-------|
धा------गे--------|न--------ती------|न--------क-------|धी-------न------|
सम(x).....................................काल(o)....................................(१ आवर्तन)
|<-----खंड------>|<-----खंड------>|<-----खंड------>|<-----खंड------>|
|::::::::::::::::::::::::::लय (एकसमान गती)::::::::::::::::::::::::::::::::::::|
थोडे समजावाल का? संगीतकार
थोडे समजावाल का? संगीतकार एखादी चाल बसवतो तेव्हा ताल आणि लय कशी निवडतो ( निवडते?)>>>>
अनेकदा आपल्या वाचनात येते की अमुक एका संगितकाराला ही चाल देताना काय काय अनुभव आले. ते एखाद्या चित्रकाराने रंगविलेल्या पेंटींग सारखेच असते. गाण्याची बांधणी, त्यातील आशय, शब्दरचना, गाण्याचा बाज, गायक, गायीका, गाणे कोणत्या प्रसंगावर चित्रीत होणार आहे या आणि अशा बर्याच गोष्टींचा विचार करुन संगितकार गाण्यावर स्वरसाज चढवतो.
प्रत्येक संगीतकाराची स्वतःची स्वतंत्र शैली असते. उदा: ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या अनवट आणि भरपुर चढउतार असलेल्या सुरावटी किंवा बाबुजींच्या ऐकुन सोप्या वाटणार्या पण हाताळायला अवघड अशा वैशीष्ट्यपुर्ण चाली.
या चाली देताना ताल आणि लयाची कशी निवड करतात असा प्रश्न तुम्ही केला आहे. पण ह्याचे उत्तर 'आधी कोंबडी की आधी अंडे' यासारखे अवघड आहे. कारण काही संगीतकार आधी गीताचा अभ्यास करतात. त्यातील शब्दोच्चार, त्यावरचे आघात, नाद, गाण्याचा बाज, गीताचा अर्थ, भावना,गीताचा प्रकार या बाबींचा विचार करुन मग चाल बांधतात आणि त्याचवेळी त्याचा ताल आणि लय ठरवितात. उदा: भजन असेल तर ताल भजनी/केहरवा लय स्लो, लावणीसाठी दादरा, दिपचंदी इ. आणि लय गीतानुसार, यामध्ये गीत प्रकार आणी शब्द यांनी गाण्याची चाल बांधीव असते.
तर काही संगीतकार आधी चाली बांधतात. त्यावर स्वरसाज चढवितात मग गीत त्यावर लिहुन घेउन गीतानुसार, प्रसंगानुरुप आणि वैशीष्ट्यपुर्ण चालीनुसार ताल व लय ठरवितात. किंवा आधिच ताल व लय ठरवुन त्यावर गीत लिहुन घेतात. या प्रकारात ताल व लय निवडीचे भरपुर स्वातंत्र असते. उदा: ए. आर. रहमान आधी चाली देतो, ताल व लय ठरवितो, वाद्यांची निवडही करतो आणि मग गीताची रचना त्या चालीनुसार बनवतो. यामध्ये गीताचा अर्थ आणि शब्दांची घडण बदलण्याचा धोका असतो. पण लय, ताल आणि स्वरमेळाचे वैविध्य अनुभवता येते.
मी संगीतातला औरंगझेब
मी संगीतातला औरंगझेब /लिँबुटिंबू पण कधीकधी कोणाचं गाणं किंवा वाजवणं ऐकल्यावर वाटतं की हा कलाकार कोण हे विचारावं .यालाच संगीत म्हणत असावेत .अगदी शुध्द(=?)गायकी बद्दल नावाजलेल्यांचेही गायन(खासकरून भजन ,भक्तिगीते) कंटाळवाणे होते फार तांत्रिक सादरीकरण नको हा मुद्दा पटला .मधुरीता १०+
मधुरिता, किती सुंदर अन
मधुरिता, किती सुंदर अन तांत्रिक असूनही रोचक अन नेमकं विवेचन करता आहात. तुमचं कौतुक वाटतं. अशीच चालूदे मैफिल.
मधुरिता, किती सुंदर अन
मधुरिता, किती सुंदर अन तांत्रिक असूनही रोचक अन नेमकं विवेचन करता आहात. तुमचं कौतुक वाटतं. अशीच चालूदे मैफिल.>>>>>>
धन्यवाद दाद. तुमच्यासारख्या संगीत जाणकारांकडुन झालेले कौतुक मला आणखी प्रेरणा देईल. काही तांत्रीक बाबींमधील त्रुटी असतील तर मला जरुर दुरूस्ती सांगा. त्यातुन नवीन काही शिकायलाही मिळेल.
srd, धन्यवाद
srd,
धन्यवाद
पुरंदरे, तुम्ही दिलेली लिंक
पुरंदरे,
तुम्ही दिलेली लिंक पाहिली. श्रुतींबद्द्लची चर्चा छान वाटली. मस्त आहे धागा!
मधुरिता, किती सुंदर अन
मधुरिता, किती सुंदर अन तांत्रिक असूनही रोचक अन नेमकं विवेचन करता आहात. तुमचं कौतुक वाटतं. अशीच चालूदे मैफिल.>>>>>>
+१००
खुपच सुंदर चर्चा
मधुरिता, किति सुरेख माहिती
मधुरिता, किति सुरेख माहिती देताय तुम्ही.
Pages