टाकाऊतून टिकाऊ. (रीसायकलिंग रीसायकलिंग म्हणतात ते हेच ना!)

Submitted by मानुषी on 5 June, 2013 - 01:10

आधीची हस्तकला............
http://www.maayboli.com/node/36599
http://www.maayboli.com/node/35912

ड्रेसच्या बाह्या बर्‍याच वेळेला आतून नुसत्याच अ‍ॅटॅच असतात. आपल्याला पाहिजे तर आपण त्या ड्रेसला लावू शकतो. पण जर त्या ड्रेसला लावल्या नाहीत तर त्या तश्याच रहातात.

या पिशवीच्या खालच्या भागात अश्याच एका ड्रेसच्या बाह्या वापरल्या आहेत. आरसेकाम(मिररवर्क) आणि थोडं भरतकाम आयतंच मिळालं. वरचं पिवळं कापड एका आलेल्या ब्लाउझपीसमधून वापरलं. त्यावरचं "भरतकाम(!)"
माझंच! हो ....माझी भरतकामातली धाव तिथपर्यंतच!

या पिशवीत उरलेल्या कापडांचे चौकोन कापून वापरले आहेत. आतून स्पंज वापरला आहे. सगळ्याच पिशव्यात.
तूनळीवर सहजच पिशव्या शिवण्याचे व्हिडिओ पहात होते तेव्हा असं लक्षात आलं की तिकडे उसगावात असे चौकोनी कापडी तुकड्यांचे सेटच मिळतात आयते कापलेले. पिशव्या शिवण्यासाठी! आहे ना गंमत?
आपण ....खरं म्हणजे आमच्या पिढीतल्या बायका अजूनही उरलेल्या कापडातून चौकोन कापून त्याचे सुंदर डिझाइन करून लहान मुलांची दुपटी शिवतात. हेतू हा की कापडाचा पुरेपूर वापर व्हावा. काही वाया जाऊ नये. रिसायकलिंग अजून ते काय वेगळं असतं?

दुपटी शिवून बरंच कापड उरलं होतं....त्यात या खालच्या दोन पिशव्या झाल्या. त्यावरची कलाकारी(!) माझी.......!विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Manushi wonderful job. beautiful stitching.

Just a little correction. This is 'upcycling'. not recycling. Happy

दुसर्‍या बॅगेसाठी एकत्र जोडलेल्या बाह्यांचं कॉम्बिनेशन >>>>>>>> मृण्मयी. धन्यवाद..........दुसरी बॅग उरलेल्या कापडाचे चौकोन कापून शिवली. त्या सगळ्या बाह्या नाहीत. छंद म्हणून मी काहीबाही सतत शिवत आलीये त्यामुळे नेहेमीच खूप तुकडे उरलेले असतात.
सीमा.......धन्यवाद. करेकशनसाठीही. पण री आणि अपमधे काय फरक आहे....उत्सुकता म्हणून विचारते.
धनश्री.........हो......मी अमेरिकेतलेच व्हिडिओ जमेल तेव्हा बघत असते. खूप छान पटकन समजतं ....कसं शिवायचं ते. आणि खरंच तिकडे शिवणकला खूपच विकसित आहे आणि बर्‍याच स्त्रीया हा छंद जोपासतात.
तिकडच्या शिलाईमशीनपासून ते छोट्या पिनांपर्यंत सगळ्या शिवण सोपं करणार्‍या आणि यूजरफ्रेन्डली वस्तू.
धन्यवाद सर्वांना.

Pages