टाकाऊतून टिकाऊ. (रीसायकलिंग रीसायकलिंग म्हणतात ते हेच ना!)

Submitted by मानुषी on 5 June, 2013 - 01:10

आधीची हस्तकला............
http://www.maayboli.com/node/36599
http://www.maayboli.com/node/35912

ड्रेसच्या बाह्या बर्‍याच वेळेला आतून नुसत्याच अ‍ॅटॅच असतात. आपल्याला पाहिजे तर आपण त्या ड्रेसला लावू शकतो. पण जर त्या ड्रेसला लावल्या नाहीत तर त्या तश्याच रहातात.

या पिशवीच्या खालच्या भागात अश्याच एका ड्रेसच्या बाह्या वापरल्या आहेत. आरसेकाम(मिररवर्क) आणि थोडं भरतकाम आयतंच मिळालं. वरचं पिवळं कापड एका आलेल्या ब्लाउझपीसमधून वापरलं. त्यावरचं "भरतकाम(!)"
माझंच! हो ....माझी भरतकामातली धाव तिथपर्यंतच!

या पिशवीत उरलेल्या कापडांचे चौकोन कापून वापरले आहेत. आतून स्पंज वापरला आहे. सगळ्याच पिशव्यात.
तूनळीवर सहजच पिशव्या शिवण्याचे व्हिडिओ पहात होते तेव्हा असं लक्षात आलं की तिकडे उसगावात असे चौकोनी कापडी तुकड्यांचे सेटच मिळतात आयते कापलेले. पिशव्या शिवण्यासाठी! आहे ना गंमत?
आपण ....खरं म्हणजे आमच्या पिढीतल्या बायका अजूनही उरलेल्या कापडातून चौकोन कापून त्याचे सुंदर डिझाइन करून लहान मुलांची दुपटी शिवतात. हेतू हा की कापडाचा पुरेपूर वापर व्हावा. काही वाया जाऊ नये. रिसायकलिंग अजून ते काय वेगळं असतं?

दुपटी शिवून बरंच कापड उरलं होतं....त्यात या खालच्या दोन पिशव्या झाल्या. त्यावरची कलाकारी(!) माझी.......!विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच मानुषी.
पहिली बॅग सुरेख, अगदी लग्न कार्यात किंवा मुंजित वगैरे साडीवर घेतली तर अगदी शोभून दिसेल.

काळजीवाहू, आर्या धन्यवाद!
दक्स.............ही वरची पहिली बॅग मैत्रिणीने बुक केली आहे. तिच्या प्युअर सिल्कच्या सेम कॉम्बो च्या साडीसाठी!

सर्वांना धन्यवाद! हो लाजो आज जागतिक पर्यावरण दिन........म्हणून शीर्षकात नंतर बदल केला. एक एक्स्टेन्शन चिकटवलं!

मानुषी,बॅगा खूप्प्पच सफाईदारपणे शिवल्या आहेत.तुझ्या शिवणकामाला तर १०० % गुण आहेतच !!!! आवडल्या.

छान आहेत पर्शी! शिवणातली सफाई मस्त आहे अगदी.

पण दुपटी शिवायची कशाला? माझ्या पिढीतल्या मुली तर जुन्या कॉटनच्या ओढण्यांचा दुपटी म्हणून वापर करतात. मस्त लांबलचक, रंगीबेरंगी आणि वापरून धुवून मऊ झालेल्या ओढण्या असतात. लांबलचक बाळं पण छान गुंडाळली जातात. हेतू हा की काही वाया जाऊ नये. Proud

सर्वांना धन्यवाद!
मंजूडी ओढण्यांबद्दल १००+!
पण काय होतं.....कधी कधी शिवणाची सुरसुरी येते मग अशी टाइमपासची कामं होत असावीत! Wink आणि दिवेही!

मस्तच मानुषीताई!

माझ्या कॉटनच्या लांबलचक ओढण्या मुलींना गुंडाळण्यासाठी वापरल्या. त्यानंतर तशाच पडून होत्या.
मागच्या आठवड्यात बाहेर जाताना थंडीपासून बचाव करण्यासाठी गळ्याशी घ्यायला त्यातल्या २ ओढण्या वापरायला काढल्या. नेहमीचे स्कार्फ वापरुन कंटाळा आला म्हणून ओढणी स्कार्फसारखी गळ्याशी बांधली. लेकीच्या शाळेत गेल्यावर बर्‍याच आयांनी विचारलं, एव्हढा छान कॉटनचा स्कार्फ कुठे मिळाला? ' 'मेरा भारत महान' ची लापि लगेच वाजवली हे सांगणे न लगे!

सर्वांना धन्यवाद!
'मेरा भारत महान' ची लापि लगेच वाजवली हे सांगणे न लगे!>>>>>>>>> वत्सला तुम्ही कोणतीही साधी गोष्ट कशी कॅरी करता त्यावर आहे सगळं!

शप्पथ ! कसलं भारी केलय्स ग. रंगसंगती, काँबिनेशन्स एकदम सुरेख !
आता बाजूला॑ ठेवलेल्या बाह्या घेऊन यावच तुझ्याकडे Proud

सुंदर झाल्यात बॅगा.

पहिल्याची रंगसंगती आणि दुसर्‍या बॅगेसाठी एकत्र जोडलेल्या बाह्यांचं कॉम्बिनेशन आवडलं. (विंटर्-फॉल्-स्प्रिंग्-समर स्पेशल वाटतंय. Happy )

Pages