स्व्प्नाच्या पलिकड्ले ६

Submitted by shilpa mahajan on 4 June, 2013 - 23:47

आम्ही निघालो खरे पण जायचं कुठे हा एक यक्ष प्रश्नच होता .
राजकोट मध्ये त्याला घेऊन जायचे तर त्याच्याबद्दल काय सांगायचे ? शिवाय गोपाल चे काय झाले यासंबधी प्रश्न देखीलआम्हालाच विचारले गेले असते . त्याचे खरे उत्तर देणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे होते. कदाचित आमच्यावरच आरोप होण्याची शक्यता होती. प्रभात चे आयुष्य सामान्य मुलासारखे जावे अशी आमची इच्छा होती. ते ही राजकोट मध्ये कदाचित शक्य झाले नसते कारण आम्हाला अपत्य नसल्याचे सर्वाना
माहिती होते आणि या वयात आम्ही मूल दत्तक घेतले असे जरी सांगितले तरी त्यावर कित्येक
उप प्रश्न निर्माण झाले असते आणि लोकांनी आम्हाला आणि प्रभातला सामान्य आयुष्य जगू
दिले नसते. गुंत्यातून मार्ग काढायचा आम्हाला सुचलेला मार्ग आम्ही निवडला तो म्हणजे राजकोट मधून मुकाट्याने स्थलांतर !मी माझी सुट्टीपत्राने वाढवून घेतली. इथे हिची मानलेली बहीण रहाते.ती एकटीच आहे. नोकरी करते . तिची आम्हाला आठवण झाली . ती एकटी असल्याने आणि हि जागा राजकोट पासून बरीच दूर असल्याने आमचा गुप्ततेचा हेतू साध्य होईल असे आम्हाला दोघाना वाटले . आम्ही दोघांनी विचार करून तिला अर्धवट विश्वासात घेतले.
" अर्धवट विश्वासात म्हणजे कसे ?" मी विचारले

.
प्रभातच्या जन्माची खरी हकीगत न सांगता आमच्या दूरच्या नातेवाइकाचा तो मुलगा आहे पण त्याची आई त्याच्या जन्माच्या वेळी गेली आणि तिचा पती या मुलाची जबाबदारी घेऊ इच्छित
नसल्याने आम्ही ते मूल स्वतः वाढवण्याचे ठरवले आहे असे सांगून तिच्याकडे काही दिवस पत्नी आणि प्रभात ला ठेवले. तिचाच पत्ता मी काही विचार मनाशी ठरवून उषा ला दिलेल्या पत्रांवरही घातला होता. त्यानंतर इथे हे घर भाड्याने घेतले . काही जुजबी सामान खरेदी करून नव्याने संसार सुरु केला . माझ्या नावाचे काही टपाल आले तर माझ्या नवीन पत्त्यावर आणून देण्याविषयी तिला सांगून ठेवले. फक्त दोन दिवस मी राजकोट ला आलो होतो परंतु घरी न येता हॉटेल मध्ये राहिलो. घर मालकाला वर्षभराचे भाडे पूर्ण देऊन टाकले. देण्या-घेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण केले. घरातल्या सामानासाठी वर्षभरानंतर आलो होतो , तेव्हां तुमची बदली होऊन तुम्ही गेला होतात त्यामुळे तुम्हाला ते कळले नाही , अन्यथा माझी पंचाईत होणारच होति. त्यानंतर राजकोट चा सर्व पसारा आवरला.. आणि ‘कोटद्वारा’ मध्ये विष्णू शर्मा या नवीन नावाने वास्तव्य सुरु केले. कायदेशीर बाबींची अडचण येऊ नये म्हणून पूजा पाठ करण्याचा व्यवसाय सुरु केला. राजकोटच्या माझ्या सहकाऱ्यांना माझा थांग पत्ता लागू नये म्हणून मी नोकरी सोडली . या वयात मला नवी नोकरी कुठून मिळणार ? पण उदर निर्वाहासाठी काहीतरी करायला हवेच होते . कारण नोकरी सोडून मिळालेले पैसे व्याजी लावले तरी ते संसाराला पुरेसे नव्हते . शिवाय प्रभातची जबाबदारी पार पाडायची तर पैसा मिळवायला हवाच होता . लहानपणी माझे वडील उपाध्येपण करत होते तेव्हा मला बऱ्याच गोष्टींची संथा मिळाली होति. मी त्यांना मदत म्हणून कित्येक ठिकाणी पूजेला किंवा सत्यनारायणाच्या पूजेसाठी जात असे . तो अनुभव गाठीशी होता . त्याचा उपयोग करून मी उपाध्येपणाचा व्यवसाय सुरु केला आणि प्रभातच्या सुदैवाने तो उत्तम चालला आहे . आणि प्रभातचे पालन पोषण व्यवस्थित चालू आहे. त्याच्या निमित्ताने आमचे दोघांचे अपत्य नसल्याचे दुःख बरेच कमी झाले. एवढं बोलून पाठकजी गप्प झाले. भाभिजीपण डोळे पुसू लागल्या.
मी म्हणालो, पाठकजी, प्रभात सुखात आहे, त्याच्यासाठी करू शकता तेवढे तुम्ही करत आहात , मग वाईट का वाटून घेता ?"
"वाईट गोपाल आणि उषा साठी वाटतं . त्यांची संसाराची हौस अपुरी राहिली म्हणूनही आणि जगावेगळे दुःख त्यांच्या वाट्याला आले
म्हणूनही."
" हो, ते ही खरेच आहे, पण आत्ता ही कुठल्या प्रवासाची तयारी चालू आहे ?" भिंतीशी ठेवलेल्या प्रवासी सामानाकडे पहात मी विचारले.
" उषा चे पुन्हा पत्र आले आहे ."
" असं ? काय म्हणते " मी उत्सुकतेने विचारले.
" बिचारी दुःखी आहे. तिला पुन्हा दिवस गेले आहेत." भाभिजीनी उत्तर दिले .
" अरेरे ! अशी रिस्क कशी घेतली तिने ? " माझ्या तोंडातून उद्गार निघाला . पुढच्याच क्षणी माझ्या लक्षात आले कि ज्या प्रकारचे आयुष्य ती जगते आहे, त्यात तिला या गोष्टीबद्दल दोष देता येणार नाही.
आता आम्हाला पुन्हा तिच्या मदतीसाठी जायचे आहे. मेजर खन्ना यांची मदत आता तिथे नाही आणि इथे ही गुप्त गोष्ट सांगावी असे जीवाभावाचे कुणी नाही त्यामुळे कुणाकडे मदत मागावी तेही कळत नाही. शिवाय प्रभातचे काय करायचे तेही समजत नाही. आजवर तो आम्हाला सोडून कधीच कुठे राहिलेला नाही. अचानक तो कुठल्या नवीन ठिकाणी कसा राहू शकेल ? त्याला आपल्या बरोबर नेणे हेही बरोबर वाटत नाही. मागच्या वेळी गोपाल, मेजर खन्ना यांच्या मदतीमुळे जितके जमले तितकेही जमेल की नाही कुणास ठाऊक.
" मी काही मदत करू शकतो का ? " मी एकदम विचारले. गोपाल आणि उषा दोघांना मी ओळखत होतोच ! शिवाय सारी हकीगत ऐकून मलाही त्यांच्या बद्दल सहानुभूती निर्माण झाली होती .
जमेल ती सारी मदत करावी अशी उर्मी आली होती.
" हे काय विचारणं झालं ? तुम्ही विचारलं नसतं तर मीच तुम्हाला विनंती करणार होतो मदतीसाठी." पाठकजी आनंदाने म्हणाले.
" ठरलं तर मग ! मी तुमच्याबरोबर येतो . शिवाय प्रभात ची काळजी करू नका. त्याला दिल्लीला माझ्या घरी ठेवूया. माझी मुलं तिथे आहेत, त्यांच्यासोबत तो सहज रमेल. "
" पण भाभीजी, एक विचारू का ? रागावणार नसलात तरच !"
" विचारा की ! “
“आत्तापर्यंत दोन वेळा तिचं प्रसूतीसंबंधी लिहिलेले पत्र तुम्हाला मिळाले आणि तुम्ही जात आहात हे खरे, पण पुन्हा अशीच वेळ आली आणि ती तुम्हाला कळवू शकली नाही किंवा तुम्हाला जाणे जमले
नाही तर ...."
"तुमची शंका अगदी बरोबर आहे,मी देखील त्याचा विचार केला आहे, या वेळी प्रसूतीबरोबरच संतती नियमनाची तयारी मी नेणार आहे."
" पण त्यासाठी तर ऑपरेशन करावे लागते आणि ते तर फक्त डॉक्टरच करू शकतो."
" खरे आहे. मी ते करू शकणार नाही पण तांबी बसवू शकेन. किमान तीन वर्षे तरी काळजी नाही. पुढचे पुढे पाहू."
"बरोबर आहे तुमचं !"
" बरं तर , मी निघतो. प्रवासाची तयारी करतो. बराच लांबचा आणि वेळाचाही प्रवास आहे आपला. "
" हो, पण लवकरच या , कारण तिची प्रसूतीची तारीख आपल्याला माहिती नाही त्यामुळे लवकरच निघावे म्हणतोय."
" हो, कल्पना आहे मला . येतोच मी लवकर !" असे म्हणून मी निघालो.
मनात विचारांचे काहूर माजले. प्रवास कसा होईल , सुट्टी मंजूर होईल की नाही, प्रवासात काय काय न्यायला हवे, , प्रभातला ठेवा असे सांगितले खरे पण पत्नीला काय कारण सांगायचे अशा एक ना दोन , अनेक विचारांनी मला भंडावून सोडले . परतीला जवळ जवळ तीन तास लागले. विचारांच्या नादात असल्याने मला ते जाणवले नाहीत. सुट्टीचा अर्ज लिहिण्यासाठी म्हणून खोलीवर आलो. तिथे एक वेगळेच आश्चर्य माझी वाट
पहात होते. कौलनी च्या दाराशीच वॉचमन ने वर्दी दिली ," एक सहाब आपसे मिलने
आये हैं , दो घंटे से आपका इंतजार कर रहे हैं ."
मलाजराआश्चर्यचवाटले. इतका वेळ माझ्यासाठी ताटकळणारी व्यक्ती कोण असावी याचा विचार करतच मी खोलीवर गेलो. घरासमोरच्या लहानशा पार्क मध्ये एक व्यक्ती पाठमोरी बसलेली दिसली. माझी चाहूल लागताच तिने वळून पाहिले आणि मी आश्चर्याने उडालोच ! माझा बालपणी चा मित्र जयवंत खरे उर्फजयाहोता तो !किती वर्षानंतर आमची अशी भेट होत होती ! फोनवर संपर्क नेहेमीच होता,पण प्रत्यक्ष भेटीचा योग येत नव्हता, तो त्याच्या व्यवसायाच्या व्यापात आणि मी माझ्या संसार आणि नोकरीच्या व्यापात बुडालेलो होतो.पण त्याचा आमच्या मैत्रीवर काही परिणाम झाला नव्हता. फोन वरच्या संपर्काने आम्हाला एकमेकांशी मनाने घट्ट बांधून ठेवले होते. आज तर काय सामोरा समोर भेट घडत होती. काही क्षण मला त्याचे किती आणि कसे स्वागत करू असे झाले पण पुढच्याच क्षणी माझे सध्याचे मिशन कसे पार पडेल याची चिंता लागली.
जया डॉक्टर होता. रिसर्च करण्यात त्याला रस होता . नवी नवी आव्हाने घेऊन त्याने त्यातील बरीचशी यशस्वी केली होती. व्यवसायाला पूर्ण न्याय देण्यासाठी त्याने लग्नही केले नव्हते.
गर्भ श्रीमंत असल्याने पैशाची त्याला फिकीर नव्हती , स्वतःच्या बंगल्यात त्याने लहानसे पण अत्याधुनिक उपकरणे आणि सोयी यांनी सुसज्ज असे हॉस्पिटल उघडले होते. मात्र साधे सुधे पेशंट तो तिथे कधीच घेत नव्हता . इतर डॉक्टरांकडे जाउन निराश होऊन त्याच्याकडे आलेले आणि त्याच्या ज्ञानाला आव्हानात्मक वाटणारे असे पेशंट तो तिथे ठेवायचा आणि मग आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांना समस्यामुक्त करण्यासाठी जीवाचे रान करायचा. त्यातच त्याला आनंद मिळत असे. एखाद्या रात्री चार पाच तास झोपायला मिळाले तर ती त्याला चंगळ वाटे. एरवी तीन तास झोप त्याला पुरेशी वाटे. दिवसाचे उरलेले तास तो आपल्या पेशंट लोकांची सेवा करण्यात खर्च करत असे. खऱ्या अर्थाने तो गरीबांचा डॉक्टर होता, आणि त्याचे पेशंट त्याचे कायमचे ऋणी रहात असत. त्याच्यासाठी काहीही करायला मिळाले तरी स्वतःला धन्य समजत असत.
असा हा माझा जिवाभावाचा मित्र समोर उभा असलेला पाहून मला आनंद झाला होताच पण तो ज्या वेळी आला होता त्या वेळी माझे मन नव्या मिशनच्या विचारांनी व्याप्त होते.
कसेबसे मनातले विचार मागे सारत मी त्याचे स्वागत केले.
" अरे डॉक, आज सूर्य इकडे कुणीकडे उगवला ?" माझ्या घराचा पत्ता कुठून मिळाला तुला ? म्हणजे मी इथे अजून नवीनच आहे म्हणून विचारतो."
" अरे हो हो ! एकदम किती प्रश्न विचारशील? पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्याकडे यायचे म्हणून आलेलो नाही."
" म्हणजे काय ?"
" अरे मी वर्षभरातून पंधरा दिवस सुट्टीवर जातो आणि त्या दिवसात कुठे न कुठे भटकून येतो हे तुला ठाऊकच आहे ."
" हो, पण त्याचा इथे काय संबंध ? "
" संबंध असा कि इथे माझा एक पेशंट रहातो . त्याने मला खूप वेळा इथे येण्याचे आमंत्रण दिले होते. इथले सृष्टी सौंदर्य , निरामय शांतता , स्वच्छ वातावरण तुम्हाला खूप आवडेल आणि विश्रांती सह ताजेतवानेपणा देईल असे तो मला कित्येक वेळा म्हणाला होता. या वर्षी मला वाटले कि त्याच्या सांगण्याचा प्रत्यय एकदा घेऊनच पहावा ! म्हणून मी इथे आलो. फक्त एक चूक केली . ती म्हणजे त्याला आधी कळवायला विसरलो. त्यामुळे झाले काय की ...."
" त्याच्या घराला कुलूप भेटले. असेच ना ?" मी हसून विचारले .
" बरोब्बर ओळखलेस तू !"
" पण माझा पत्ता कसा मिळाला ते तू सांगितलेच नाहीस "
" अरे मी कुलूप पाहून परतच निघालो होतो. सहजच तुझ्या दाराकडे नजर गेली. तुझी वर्षानुवर्ष ओळखीचे असलेली नेमप्लेट पाहून एकदम डोक्यात विचार चमकला
कि या घरात तूच रहात असला पाहिजेस.
त्याच वेळी तुझ्या दाराचे कुलूप दिसले.सहज चौकीदाराजवळ चौकशी केली तर कळले कि तू इथेच रहातोस . . म्हटलं दारापर्यंत आलो आहोत तरभेटीचा चान्स घेऊन पहावा .आणि मी वाट पहात बसलो.आणि अखेर आपली भेट झाली !"
“ ही तुझी नेम प्लेट खासच आहे , दिल्लीला मी तुझ्याकडे आलो होतो तेव्हाही हीच होती ना ?"
" हो, जिथे जिथे मी जाईन तिथे ही घेऊनच जातो. माझ्या एका मित्राने खास स्वतः बनवून भेट दिलेली आहे म्हणून माझी आवडती आहे ती. शिवाय माझ्या ‘गौरीशंकर’ या काहीशा वेगळ्या नावामुळे सर्वांच्या लक्षात देखील रहाते. "
" आणि म्हणूनच ती तुझी विशेष ओळख देखील आहे. बघ ना , ही नसती तर मला कळले नसते आणि आपली भेटही झाली नसती.
आम्ही दोघे आत आलो. मी त्याला माझ्याकडे रहाण्याचा आग्रह केला आणि त्याने तो मान्य ही केला. रात्री उशिरापर्यंत आम्ही बोलत बसलो. बोलता बोलता अचानक तो मला म्हणाला ,"अरे , गौरी, काय तुझ्या मनात घोळतय ते एकदा बोलून का टाकत नाहीस ? आल्यापासून मी पाहातो आहे, तुझं कशातच धड लक्ष नाही.”
त्याचं म्हणणं खरंच होतं . त्याच्याशी बोलता बोलता मी आमच्या मिशनसाठी काय काय तयारी करावी लागेल याचा विचार सतत करत होतो. जयवन्ताने माझ्या मनातली चलबिचल अचूक ओळखली होती. काय करावं ,काय न करावं अशा द्विधा मनःस्थितीत मी सापडलो. शेवटी माझ्या मनाने निर्णय दिला कि जयवंत ला सारं काही खरं सांगावं . त्याची झाली तर मदतच होईल. आणि न झाली तरी तो आमचे रहस्य स्वतःच्या मनात बंद ठेवेल याची मला खात्री होती. अखेर मी पाठकजी भेटल्यापासून सारी हकीगत सविस्तर सांगितली. माझी हकीगत सांगून संपली तेव्हा पहाट झाली होती. त्याने जराही मध्ये न बोलता संपूर्ण हकीगत ऐकून घेतली. त्यानंतर म्हणाला ," तू सांगितलेल्या हकीगतीवर विश्वास ठेवणे कठीणच आहे खरं तर ! पण सांगणारा तू आहेस म्हणूनच मी विश्वास ठेवतोय. आता मी झोपतो थोडा वेळ . मग बोलू आपण पुन्हा .असे म्हणून त्याने डोळे मिटले आणि पहाता पहाता तो घोरायला ही लागला.
तासाभराने तो उठला. मी चहा केला. रात्रीचा विषय काढावा की नाही याचा मी विचारच करत होतो ,तेवढ्यात त्याने विचारले, " कारे गौरी, मी तुमच्या या मोहिमेत सामील झालो तर चालेल काय ?"
मला आनंदही झाला पण थोडी शंकाही वाटली. ही मोहीम माझी नव्हती तर पाठकजींची होती. मीच त्यात नवा होतो . त्यांना न विचारता नवीन मेंबर घेतलेला त्यांना आवडेल की नाही कुणास ठाउक ! माझी परिस्थिती जयाने ओळखली. तो म्हणाला ," अरे काळजी करू नकोस. आपण पाठकजींना विचारू. बहुतेक त्यांची काही हरकत असणार नाही, आणि त्यातूनही त्यांची इच्छा नसेल तर मी मुकाट्याने दूर होईन. तुला दोष देणार नाही. मग तर झाले ?"
मी पाठकजींना भेटलो. त्यांना जयवंत विषयी सगळी कल्पना दिली आणि त्याची इच्छा सांगितली. त्याने सांगितल्यासारखेच झाले. तो डॉक्टर असल्याने पाठकजी सहर्ष राजी झाले. पाठकजीना भेटून आलो तर जयाने सामानाची मोठीच लिस्ट तयार केली होती एवढेच नव्हे तर सर्व सामान आणून त्याचा मोठ्ठा ढीग रचून ठेवला होता.. ते सर्व पाहून मी चकितच झालो. काही विचारायला तोंड उघडणार तोच त्याने तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला.
. त्या सामानातत ऑक्सिजन चे लहान सिलिंडर ,ग्लुकोज सलाइन च्या बाटल्या , पाण्यात बसायला असतो तसा टब ,काही मला न समजणारी मेडिकल ची साधने, यांचा सामावेश होता. आम्ही निघणार तोच माझा कलीग प्रकाश वर्मा हजर झाला. मला समजेना की या वेळी हा कसा काय आला ? तेव्हा जयाने मला सांगितले की ज्या पेशंट कडे तो मुळात आला होता तो म्हणजे हा प्रकाश वर्मा च ! चौकीदाराकडून त्याला जयवंतच्या येण्याची आणि माझा पत्ता त्याने विचारल्याची खबर लागली होती. तो आता जयवंतलासोडेचना. जयाने त्याला मग सांगितले की मी एका खास मोहिमेसाठी इथे आलो आहे. तुझी जर मला मदत करण्याची इच्छा असेल तर दोन दणकट मजूर आठ दहा दिवसांसाठी पडेल ते काम करण्याच्या बोलीने मिळवून दे.प्रकाश तयार झाला. खरोखरीच तासाभरात तो दोन मजूर घेऊन आला. एक कपड्याचा जोड असलेली पिशवी एवढेच काय ते त्यांचे सामान होते. या खेरीज त्याने आणखी एक मदत केली . आम्हाला एक जीप जया च्या सांगण्या वरून मिळवून दिली. जीपमध्ये सामान भरून आम्ही पाठकजींच्या घरी निघालो तेव्हा माझ्या लक्षात येउन चुकले होते की जया ने मोहिमेचा खोलवर विचार केला होता . गोपाल उषाची कहाणी त्याने अगदी लक्षपूर्वक ऐकली होती , आणि पहिल्या मोहिमेत आलेल्या समस्या त्याने नीट लक्षात घेतल्या होत्या. जीपमधून आम्हाला आलेले पाहून पाठकजी चकित झाले, मग त्यानाही हुरूप आला. जयवंत मोहिमेत आल्याने मोहीम थोडी सुकर होईल अशी आशा सर्वांनाच वाटू लागली.
" पाठकजी, प्रभातला न्यायचे ना ?" मी विचारले
" नाही कारण तिथली थंडी त्याला बाधू शकेल. शिवाय तिथे तो जे काही बघेल त्याचा त्याच्या बाल मनावर विपरीत परिणाम होऊ शकेल. मला तो धोका पत्करावा असे वाटत नाही.” पाठकजी म्हणाले .
मी प्रभातला बोलावून त्याचे काही क्लोजप फोटो काढले . "गोपाल आणि उषाला दाखवण्यासाठी प्रिंट काढून आणतो ." मी भाभीजीना म्हणालो. यावर भाभिजींनी मला सांगितले की त्यांनी प्रभातचे लहानपणापासून प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचे फोटो काढून त्याचा अल्बम तयार करून बरोबर घेतला आहे. मला त्यांच्या समजूतदारपणाचे व समयसूचकतेचे कौतुक वाटले.
प्रथम आम्ही दिल्लीला माझ्या घरी आलो.माझ्या दोन मुलांमध्ये तो दोनच दिवसात छान रमला . माझ्या घरातला झोपाळा त्यालाखूपच आवडला.त्याला हवा तेव्हा आणि हवा तितका वेळ तो झोके घेऊ शकतो असेसांगताच तो भाभिजीनाआणि पाठकजीना सोडून एकटा रहायला आनंदाने तयार झाला. जयवन्ताने माझ्या पत्नीला काय सांगितले कोण जाणे पण ती ही वाद न घालता आम्हाला जाऊ द्यायला आणि प्रभातला सांभाळायला आनंदाने तयार झाली.
आम्ही मोहीमेवर निघालो.पाठकजीन्चामागच्या वेळेचा अनुभव गाठीशी होता. शिवाय या वेळी मजूर आम्ही बरोबर घेऊन आलो होतो त्यामुळे फारशा अडचणी न येता आमच्या गंतव्य ठिकाणी पोहोचलो.
क्र्म्शहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अशा सांकेतिक प्रतिक्रियांचे अर्थ समजत नाहित. त्या बाबतीत मी जरा मागासलेली आहे कदाचित कृपया शब्दात व्यक्त केलेत तर बरे होईल .

त्यांचं म्हणणं आहे की पुढील भाग लवकर टाका. Happy
मोरपिसे नावाची फार औत्सुक्यपुर्ण कादंबरी आहे, पण त्याचे भाग पटापट येत नाहीयेत.

शिल्पा ताई, माझ्या सांकेतिक कॉमेंट बद्दल क्षमस्व!

कथा आहे खूपच मस्त, पण भारी वाट बघायला लावतेय. इतक्यात माबो वर अशा अनेक कथा येउन गेल्या ज्यांनी क्रमशः च्या पलिकडचं जग बघितलंच नाही. तुमच्या ह्या कथेचं असं होऊ नये आणि आमच्यासारखे वाचक भुकेले राहु नयेत इतुकीच प्रार्थना!!

पु. ले. शु!

--
भानुप्रिया!

वाचकहो ,
तुम्हा सर्वांची उत्सुकता ताणली जाते आहे याची मला कल्पना आहे . पण मी जरा अडचणीत सापडले आहे . हि कथा आधी लवकर लवकर टाकता आली कारण ती लिहून तयार होती . फक्त काही लहान साहान बदल करायचे बाकी होते . परंतु झालय काय कि माझ्या पी सी मध्ये आधी "एम एस वर्डस "२ ० ० ३ " होते . गुगल ने "मेघ " सुरु करण्या आधी जे भाषांतराची साईट होती त्यातील शब्द वर्डस मध्ये कोपी होत होते पण मेघ आल्यानंतर त्यात टाइप केलेले वर्डस मध्ये कॉपी होत नाही . म्हणून मग मी वर्डस २ ० ० ७ हे व्हर्शन पी सी त टाकवले. आता होते काय आहे कि मेघ मध्ये टाइप करून वर्डस मध्ये सेव केल्यानंतर त्यात काहीही बदल करायला गेले कि मला नको असलेले भलतेच काहीतरी त्यात होते आहे . उदा . जो शब्द खोडायचा आहे, त्याच्या पुढे कर्सर नेला आणि बंक स्पेस दाबले कि तो शब्द खोडला न जाता दुसराच कुठला तरी शब्द खोडला जातो आहे, त्यावर उपाय म्हणून मी एखादा शब्द किंवा वाक्य सिलेक्ट करायचा प्रयत्न केला तर मला हवा असलेला मजकूर काही केल्या सिलेक्ट होत नाही . झाले तरीडिलीट चे बटण दाबल्यावर भलताच कुठला तरी मजकूर दिलीत होतोय . याशिवाय डिलीट झालेला मजकूर त्याच्या मर्जीने कुठे तरी जोडला जातो आहे . यामुळे मी लिहिते काहीतरी एक आणि उमटते दुसरेच काहीतरी असा प्रकार चालला आहे, त्यामुळे मी त्रासून गेले आहे . या पूर्वीच्या ;भागात देखील असे झाले होते . त्या मजकुराला ठीक करण्याच्या प्रयत्नात हारून मी खूप ठिकाणी वाक्ये बदलली किंवा गाळून टाकली . परंतू मोठा मजकूर अशा अडचणीना तोंड देऊन लिहिता लिहिता कंटाळा आला . मागच्या काही भागान मध्ये अशा खूप चुका मला दिसतात कि ज्या माझ्या मनाला बोचतात पण मी त्या वाचकांच्या समजूत दार पानावर सोडून दिल्या आहेत , असे का होते आणि यावर उपाय काय हे मला कोणी सांगेल का ?
आमच्या कडे वीज कितीही वेळा जाते त्यामुळे मी वर्डस मध्ये सेव केल्याशिवाय सोडू शकत नाही