swapnanchya palikadale स्वप्नांच्या पलीकडले ४

Submitted by shilpa mahajan on 3 June, 2013 - 23:32

नजरेस पडली. अत्यंत कृश झालेली काया, काळवंडलेला रंग जटा झालेले , मोकळे केस आणि .... आणि संपूर्ण निर्वर्स्त्र !!!
आमच्या घशात हुंदका आला,डोळे पाणावले आणि लाजेने दृष्टी दुसरीकडे वळली. उषाचे आमच्या अवस्थेकडे लक्षच नव्हते. ती स्वतःशी बोलल्यासारखी बोलली," तुम्ही आलात ! आलात तुम्ही मावशी !
मला वाटलं होतं की तुम्ही येणारच नाही," इतकं बोलता बोलता तिला रडू कोसळलं .
"मी काय करू मावशी ?काय करू मी ?" एवढं बोलून तिने पाण्यात डोकं घातलं ते एक दीड मिनिटानंतर बाहेर काढलं .
" मावशी , मी रडू पण शकत नाही. काय करू मी ?"
"रडू नकोस उषा,आता मी आले आहे ना,थांब ,मी आलेच !" असे बोलून ही धावतच तंबूत गेली आणि एक साडी घेऊन परतली. उषाच्या दिशेने पुढे करत म्हणाली, "ही घे . ही लपेटून बाहेर ये,"
उहा खिन्न हसली. " मावशी, मी साडी नेसू शकत नाही आणि पाण्याबाहेरही येउ शकत नाही."
“असं का म्हणतेस ?आता आम्ही आलोय ना तुला न्यायला ! आता तुला बाहेर येण्यात अडचण कसली ?" हिने विचारले,
"नाही मावशी !आता हेच माझं जग आहे,तुझी ,माझी, सर्वांची कितीही इच्छा असली तरी ते आता शक्य नाही. इथेच जगायचं आणि इथेच मरायचं !" पुन्हा तिला हुंदका आला डोळ्याला धार लागली आणि तिने पुन्हा पाण्यात डोकं घातलं .
आम्ही संभ्रमात पडलो. तिच्या म्हणण्याचा अर्थ आमच्या लक्षात येत नव्हता.
" का ग , असं का म्हणतेस पुन्हा पुन्हा ?" हिनं विचारलं .
" सांगेन, सगळं सांगेन, पण मावशी, मी आले तेव्हा तुम्ही काय पीत होतात ?"
हिच्या एकदम लक्षात आलं ." चहा ! अरे खरच की ! थांब तुझ्यासाठी चहा आणते." असे बोलून ही तंबूत गेली आणि चहाचा थर्मास आणि कप घेऊन आली.
हिने उषा ला चहा दिला, उषा खूप वेळ चवी चवी ने चहा प्याली.
" मावशी, आज रात्री मी इथेच जेवीन बरं का !" चहाचा कप परत मावशीजवळ देता देता उषा म्हणाली.
" अगं , हे काय बोलणं झालं का ? " मावशी म्हणाली. " आम्ही आलोय ते काय तुला इथेच सोडून जायला का ? आमच्या बरोबरच घेऊन जाणार तुला ! "
" इतकं कुठलं माझं भाग्य ? " उषाचा गळा पुन्हा दाटून आला.
" आपण असं करूया का ? आपण या पुलाच्या टोकापर्यंत जाउया. तिथे पाणी उथळ असेल. तिथे बसून आपण सविस्तर बोलू शकू." मी म्हणालो.
" दादा, माझी समस्या तुमच्या नीट लक्षात आलेली नाही. मी आता हवेत श्वास घेऊ शकत नाही. पण पाण्यात घेऊ शकते. म्हणूनच मी जिवंत राहू शकले. पण मी पाण्याबाहेर येऊ शकत नाही . तुम्ही पहिलेच असेल कि दर एक दीड मिनिटानंतर मला पाण्यात तोंड बुडवावे लागते , ते श्वास घेण्यासाठीच ! "
तिचे बोलणे ऐकून आम्ही सारेजण काही क्षण अवाक झालो. मग थोड्या वेळाने हिनेच विचारले," तू म्हणतेस कि पाण्याबाहेर येऊ शकत नाहीस तर मग खातेस काय ? "
" तेच, जे बाकी जलचर खातात ! मासे, किडेमाकोडे, बेडूक , जे मिळेल ते !"
"काय ?" माझ्या अंगावर सरसरून काटा आला.
" हो दादा ! जगण्यासाठी तेच करावं लागतं !" उषा उदासपणे म्हणाली ,
" सुरुवातीला मला देखील ते आवडत नव्हतं . अगदी प्राण जायची वेळ आली तरी मला ते जमत नव्हतं . पण एक दिवस पोटातल्या जीवाने जिवाच्या आकांताने जगण्यासाठी केलेली तडफड मला जाणवली आणि मग मात्र माझ्यातल्या आईने स्वतःचे सारे विचार दूर सारले आणि पोटातल्या जिवाला जगवण्यासाठी जे जे मला मिळालं ते डोळे मिटून ओकारी दाबत गिळायला सुरुवात केली. हळू हळू मला ते जमलं . आता मला वाटतं की माझ्या बाळाची या जगात येण्याची वेळ जवळ आली आहे.
बोलता बोलता उषा स्वतःच्या पोटावरून हळुवारपणे हात फिरवत होती, जणू काही तिचे बाळ आत्ता तिच्या पोटाच्या आत नसून पोटावर पहुडले होते आणि ती त्यालाच जोजवत होती !
" एक गोष्ट तुला सांगायची राहिली. "
" कोणती मावशी ?"
" अग़ , आमच्याबरोबर गोपाल देखील आला आहे, पण काल रात्रीपासून कोण जाणे कुठे नाहीसा झालाय ! मुद्दाम तुला शोधायला म्हणून आला होता तो ! "
" मला ठाऊक आहे मावशी !"
" काय ? तुला ठाऊक आहे ? कसे काय ?"
" रात्री पाण्यात पडल्याचा आवाज आला होता ना ? तुम्ही सारे बाहेर आला होतात तो ऐकून !"
" हो ! खरय ते, पण हे सर्व तुला कसे ठाऊक ?"
" माझ्या समोरच घडले ना सर्व !"
" काय घडले ? आम्हाला तर काहीच माहिती नाही काय घडले ते !"
" मी त्याला हाक मारली म्हणून तो बाहेर आला. पण विचार न करता तळ्याच्या अगदी जवळ आला. पाण्यात पडल्याचा आवाज आल्याबरोबर मी ओळखलं कि गोपाल पाण्यात पडला.
आता तो स्वतः पाय घसरून पडला कि माझ्या मागे जे तिघे चौघे जण होते त्यांच्यापैकी कोणी त्याला ढकलले हे मात्र मला माहिती नाही .पण त्यांनीच त्याला पाण्याखाली नेलं हे मला ठाऊक आहे. "
" अरेरे ! बिचारा गोपाल ! त्याला बाहेर काढायला हवं होतं ."
" नाही मावशी ! किनाऱ्याजवळ च्या पाण्यात प्राणवायू कमी असतो. गोपाल पाण्यात पडताच भीतीने बेशुद्ध झाला. त्याच्या नाका तोंडात पाणी गेले. त्याने थोडावेळ जरी श्वास रोखून धरला असता, तर मी त्याला पाण्यात जाऊ दिले नसते. पण नाकाने पाणी आत घेतल्यावर माझा देखील नाइलाज झाला. खोल पाण्याच्या आत एक गुहा आहे तिथे आम्ही त्याला घेऊन गेलो. अजून तो शुद्धीवर आलेला नाही, नाहीतर मी त्याला देखील बरोबर घेऊन आले असते.”
“ मावशी, असं काही घडेल याची मला पुसटशी देखील कल्पना आली नाही हो ! नाहीतर मी त्याला हाक मारतानाच सावध केलं असतं ! आता त्यालाही माझ्याप्रमाणे जन्मभर इथे पाण्यातच राहावं लागेल ! तो देखील आता जगेल पण हवेत श्वास घेऊ शकणार नाही. धरतीवर आमचे एक दिवस मीलन होईल आणि आम्ही सुखाने चारचौघांसारखा संसार करू असं साधं सुध स्वप्न मी पाहिलं होतं ! हे असं जलचरासारखं सहजीवन वाट्याला येईल असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत !"
एकून परिस्थिती अशी झाली की काय बोलावं ते कुणालाच सुचेना ! सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे निःशब्दपणे पहात राहिले. अखेर उषाच भानावर आली.
" मावशी, जे व्हायचे ते झाले. ते आपण बदलू शकणार नाही एवढे खरे ! पण हे असले जीवन माझ्या बाळाच्या वाट्याला येऊ नये या एकाच विचाराने मी तुम्हाला इथे बोलावले आहे.
त्याचा जन्म पाण्यात होऊ नये यासाठी तुम्ही मला मदत करा. असे झाले नाही तर माझे बाळ या जगात न राहिलेलेच बरे ! " असे ;बोलून उषा ढसा ढसा रडू लागली
क्रमशहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अस खरच आहे का? म्हनजे जलपरी, पाण्यात ओधून घेतल जाणॅ..
मला माहित नाही म्हणुन विचारत आहे... लेखनाचा स्पीद चान्गला आहे... Happy