स्वप्नांच्या पलीकडले ३

Submitted by shilpa mahajan on 3 June, 2013 - 08:48

स्वप्नांच्या पलीकडले ३
काय ? उषाचं पत्र ? पण ती तर पाण्यात बुडाली होती नं ?" मी चकित होऊन विचा"रलं .
आम्ही अचंब्यात पडलो होतो. ती जर मरण पावली असेल तर तिच्या हस्ताक्षरात असे पत्र पाठवण्यात कुणाचा काय फायदा ? कारण पत्रात पैसे मागवलेले नव्हते तर भाभिजीना

बरोबर घेऊन या असे लिहिले होते. त्यावरून तिची अडचण प्रसूतीसंबंधी असावी असे वाटत होते, कारण भाभीजी उत्तम पैकी नर्सिंग जाणत होत्या.
ती कैदेत असावी असे मानले तर तिला पत्र कसे पाठवता आले असा प्रश्न मनात येत असेच चकित आम्ही पण झालो होतो पत्र पाहून !" भाभीजी म्हणाल्या.
" धक्क्यातून सावरल्यावर पत्र वाचायला सुरुवात केली. हस्ताक्षर उषाचं वाटत होतं . त्यात लिहिलेल्या काही गोष्टी अशा होत्या की ज्या गोपाल किंवा उषालाच माहिती असू शकतील.
काही गोष्टी असंबध्द वाटत होत्या. त्यावरून आत्यंतिक मानसिक तणावाखाली तिने लिहिले असावे असे वाटत होते. त्या पत्रावरून काय निष्कर्ष काढावा तेच समजत नव्हतं" काय ? ."
" म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला ?" मी आश्चर्यात बुडून विचारलं .
“ पत्रात तिने स्वतःला दिवस गेल्याचे लिहिले होते. गोपालला विनंती केली होती की त्याने येउन तिची सुटका करावी. "
"ती कदाचित अडचणीत असेल ! " मी म्हणालो.
" आम्ही अचंब्यात पडलो होतो.
. शेवटी ती अप्रत्यक्ष कैदेत असावी असा आम्ही निष्कर्ष काढला. "
" मग ? पुढे काय झाले ? " मी विचारले.
“पत्र खरं असो किंवा खोटं,आपण पत्राला प्रतिसाद द्यायचा असे ठरवले. उषा ‘च्या’ पत्रामुळेच गोपाळ च्या आशा पल्लवित झाल्या आणि त्याने लग्नाला नकार दिला. अर्थातच आमचा त्याला पाठिंबा होता पण आम्ही इतराना काहीच सांगू शकत नव्हतो. कारण उषा च्या संबंधात पुढे काय होणार ते कुणालाच ठाऊक नव्हते. “
या प्रकरणाबद्दल गुप्तता राखावी अशी गोपालची इच्छा होती म्हणून कुणालाही काही न सांगता एक महिन्याची सुट्टी घेऊन आम्ही निघालो.
" म्हणजे कुठे गेलात तुम्ही ? जिथे ती पाण्यात पडली तिथे ?" मी विचारले.
" आणखी कुठे जाणार ? पत्र कुठून आलं ते कळत नव्हतं कारण शिक्का अस्पष्ट होता . शेवटी जिथून ती नाहीशी झाली तिथेच काही पत्ता लागतो का ते बघायचे ठरवले होते."
" पण त्या जागी रहाण्याची वगैरे काहीच सोय नव्हती ना ?"
" हो, पण मेजर खन्ना यांनी जाताना सर्व सामान नेले नव्हते. काही सामान माना गावात डेपो बनवून तिथे ठेवले होते, त्यांची मदत मिळण्यासारखी होती, आम्हाला पोहोचण्याची घाई होती. उषा च्या प्रसूतीची तारीख आम्हाला माहिती नव्हती . ,तसेच पत्र केव्हा लिहिले होते तेही कळायला काही मार्ग नव्हता.पत्रावर तारीख नव्हती आणि पत्र किती दिवसानंतर आम्हाला मिळाले ते देखील आम्हाला माहिती
नव्हते. म्हणून ज्या प्रसूतीच्या काळजीने तिने पत्र लिहिले असे आम्ही समजत होतो त्या वेळेत पोहोचावे अशी आमची मनोमन तीव्र इच्छा होती. ती जागा अशी होती कि बर्फ पडू लागले कि जाण्या येण्याचा मार्ग बंद होतो आणि सामान्य
माणसे तिथे पोहोचू शकत नाहीत.
त्यामुळे आम्ही तातडीने निघालो. माना गावापर्यंत आम्ही निर्विघ्नपणे पोहोचलो. सामानाच्या डेपोची मदतही मिळाली पण ....."
" पण काय ?"
" माना गावातला एकही मजूर आमच्याबरोबर सामान उचलून न्यायला तयार होईना. ते आम्हाला सांगू लागले की काही दिवसापूर्वी एक ग्रुप तिकडे गेला होता, त्यांच्या बरोबर एक बाई होती पण ती काही परत जाऊ शकली नाही . सरोवर शापित असल्यामुळे ती बहुधा ‘शिव गणांच्या’ भक्ष्यस्थानी पडली असणार ! तुमच्या बरोबर देखील एक बाई आहे तेव्हा तुम्हीपण तिकडे जाऊ नका."
त्यांच्या बोलण्यात ज्या बाई चा उल्लेख येत होता ती बहुधा उषाच असावी असा आम्ही अंदाज केला .
" ते बरोबर आहे पण हि शिवगणा ची काय भानगड आहे ? " मी गोंधळून विचारले.
" पुराणातील एका कथेनुसार समुद्र मंथना नंतर अमृत निघाले. ते विष्णूने मोहिनी नामक सुंदर स्त्रीचे रूप घेऊन फक्त देवांना वाटून दिले. त्यानंतर विष्णू श्री शंकरांना भेटायला गेले.
शंकरांनी त्यांना मोहिनी रूप दाखवण्याची विनंती केली. त्यानुसार विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केले. ते रूप पाहून क्षणभरासाठी शंकराचे मनही विचलित झाले, परंतु त्यामुळे
माता पार्वती रुष्ट झाली.. तिने शाप दिला की त्या परिसरात कोणीही स्त्री प्रवेश करू शकणार नाही , जर कोणी प्रवेश केलाच तर ती जलपरी बनेल. तिला पाण्यातच रहावे लागेल. तिथे पार्वतीचे राज्य असल्यामुळे शिव गणांचा अहोरात्र पहारा असतो आणि कोणी त्यांच्या कायद्याचे उल्लंघन केले तर पहारेकरी ' शिव गण' त्याला खाउन टाकतात.
"याचा अर्थ उषा देखील ‘जलपरी’ झाली असा घ्यायचा का ?" मी विचारले,
" विसाव्या शतकात जगणारे आपण यावर विश्वास ठेवू शकत नाही , पण अशिक्षित आणि अडाणी माणसांची समजूत पटवणे सोपे नाही,"
" मग काय केलेत तुम्ही " मी उत्सुकतेने विचारले.
"तुझ्या भाभीची हुशारी आणी नर्सिंगचे ज्ञान उपयोगी पडले. " पाठकजी बोलले.
" ते कसे काय ?"
" हिने त्या लोकाना सांगितले कि ती बाई आमच्या ओळखीची आहे आणि ती सुखरूप असून तिथेच थांबली आहे. आम्ही तिलाच भेटायला जात आहोत. ती तिथे जलपरया ना औषध पाणी करण्याचे काम करत आहे आणि भाभी तिला त्या कामात मदत करण्यासाठी आली आहे."
" या गोष्टीवर त्यांनी विश्वास कसा ठेवला ?"
त्याचे एक कारण म्हणजे त्या ग्रुप बरोबर गेलेला आणि परतलेला गोपाल आमच्या बरोबर होता . त्यांनी त्याला ओळखले. दुसरे म्हणजे त्या गावातील लहान मुलांच्या डोक्याला फोड झाले होते आणि त्यात दोन तीन मुले दगावली होती. हिने आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त आहे असे सांगून एका गरजू मुलाच्या फोडाला चिरा दिला आणि योग्य औषधपाणी करून त्याला वाचवले, शिवाय त्याच सुमाराला एक बाळंतींण अडली होती , तिची सुखरूप सुटका करून सर्वांचा विश्वास जिंकला. या सर्वांचा परिणाम म्हणून गावातले दोन मजूर आमच्याबरोबर त्या ठिकाणी यायला तयार झाले. अशा रीतीने आम्ही ‘शंकर मोहिनी’ सरोवरापाशी पोहोचलो. आमचे सामान तिथे ठेवून आणि तंबू ठोकून देऊन मजूर परत गेले.
हे सर्व होईपर्यंत संध्याकाळ होत आली होती. आता उषा किंवा तिचा निरोप्या केव्हा येतो त्याची वाट पहात बसणे एवढेच आमच्या हातात होते. आमचा तंबू आम्ही अशा ठिकाणी ठोकला होता कि तळ्याच्या कुठल्याही बाजूने स्पष्ट दिसावा. उषा बद्दलच्या चिंतेने काही सुचत नव्हते, केव्हाही काहीही घडू शकेल या कल्पनेनेच धडधडत होते. नावाला थोडेसे खाउन आम्ही बराच वेळ वाट पहात बसलो . काहीच घडले नाही तेव्हा शेवटी एक पेट्रोमाक्स बत्ती तंबूच्या बाहेर लावून ठेवून आम्ही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. काही घडण्याची वाट पहात असल्याने जरा खुट्ट वाजले कि असे वाटत होते की उषा किंवा तिचा जासूद आला असावा. अखेर केव्हातरी डोळा लागला . अचानक दचकून जाग आली, कशामुळे झोप उडाली ते शोधत असता कुणीतरी हाक मारत असल्याचा भास झाला. तुझी भाभी लगेच उठली. आम्ही देखील कानोसा घेऊ लागलो. इतक्यात पुन्हा दबक्या आवाजातल्या हाका ऐकू आल्या , “गोपाल ....गोपाल ...”
आम्ही आवाजाच्या रोखाने बाहेर निघालो .
.इतक्यात पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. बाहेर जाउन पहातो तर
काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. बत्ती बहुधा विझून गेली होती.
मी टोर्च घेतला आणि बाहेर निघालो. गोपालच्या तंबूत वाकून पाहिलं तर त्याचं पांघरूण कोपरयात गोळा होऊन पडलं होतं .गोपालचा कुठेच पत्ता नव्हता. घाई घाईने उठून गेल्यासारखे दृश्य दिसत होते.आम्ही त्याला खूप हाका मारल्या, पण प्रत्युत्तर आलं नाही.बत्ती पेटविण्याचा प्रयत्न केला पण ती काही पेटली नाही. बहुधा खराब झाली होती. शेवटी आम्ही निराश झालो . उदास होऊन तंबूत परत आलो. तळ्याकाठी जाण्याचा माझा विचार होता. पण तुझ्या भाभीने जाऊ दिलं नाही. निक्षून मना केलं .रात्री झोप आली नाही. गोपालचं काय झालं असावं या विचारानं भांबावून गेलो होतो. सकाळ होताच सर्वजण तळ्याकाठी गेलो.तिथे काहीच दिसलं नाही. रात्रीच्या हाका जर उषाच्या असतील तर ती पुन्हा येईल असं वाटलं पण तसं
काहीच झालं नाही.दिवसभर आम्ही वाट पाहिली. संध्याकाळी एकत्र बसून चहा घेत घेत परत जावं कि आणखी वाट पहावी यावर चर्चा करत होतो, इतक्यात दबक्या आवाजातल्या हाका ऐकू आल्या.
" मावशी ....मावशी ..."
तुझी भाभी एकदम उभी राहिली आणि चालू लागली, मी पुढे होऊन एकदम तिचा हात धरला आणि तिला थांबवलं . मग आम्ही दोघे मिळून तळ्यापाशी गेलो. पहातो तर काय , तळ्यात पडलेल्या
मोठ मोठ्या दगडांपैकी एका दगडावर दोन्ही हात ठेवून अर्धवट उठून बसलेली उषा आमच्या
नजरेस पडली. अत्यंत कृश झालेली काया, काळवंडलेला रंग जटा झालेले , मोकळे केस आणि .... आणि संपूर्ण निर्वर्स्त्र !!!
क्रमष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users