खो खो -- एक रंगलेला खेळ (चित्रपट)

Submitted by केदार जाधव on 3 June, 2013 - 05:15

भरत जाधवचा किंवा मकरंद अनासपुरेचा चित्रपट थिएटरला जाऊन बघणे ही प्रचंड मोठी रिस्क असते .
पण आईबरोबर जाव लागल म्हणून हा सिनेमा पाहिला . आणी आश्चर्याचा सुखद धक्का बसला .
त्याच महत्वाच कारण म्हणजे हा टिपीकल मराठी विनोदी सिनेमा नाही . तो तसा होऊ नये याची काळजी केदार शिंदेनी घेतली आहे , नाही म्हणायला थोडा पाचकळपणा आहे , शेवटी भरतच्या अंगात (नेहमीप्रमाणे) येणारी ५-६ पात्रे आहेत , पण ते सगळ अगदी नगण्य .
एका वाड्यात राहायला आलेला भरत , त्याला तेथून हिसकाऊन लावू पहाणारे बिल्डर आणी गुंड . आणी भरतला दिसणारे त्या वाड्यातले त्याचे पराक्रमी पूर्वज याभोवती ही कथा ९०% एका घरात घडते (चित्रपट नाटकावर बेतलेला असल्याने) तरीही चित्रपट पकड कायम ठेवतो हे त्याच यश आहे.
भरत जाधव , विजय कदम सह सगळ्यानीच आपली काम छान केली आहेत . क्रांतीचा खास उल्लेख करावा लागेल , कारण वेगळी असूनही तिच्या भूमिकेत ती सहज वावरलीय . नायिकेचे (प्राजक्ता माळी ?)कामही छान झाले आहे .
पण चित्रपटाचा खरा स्टार आहे सिद्धार्थ जाधव . एकही संवाद नसताना (एचामामा वगळता) त्याने हा चित्रपट अक्षरशः खाल्ला आहे .
गाणी ठिक ठाक आहेत, वेगवेगळ्या बाजाची आहेत , पण रोमँटीक गाण्यातही भरतला पाहून हसूच येते हा दोष कुणाचा ना कळे Happy शेवटच उषा उत्थपच गाण कॅची आहे , पण त्याची प्रसिद्धीच झाली नाही .
संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू . विशेषत : भरतच त्याच्या पूर्वाजाना उद्देशून शेवटी बोलण . काही पंचेसही सही आहेत . इचलकरंजीच्या थिएटरात टाळ्या आणी शिट्याचा पाऊस पाडणारी "मराठी बाण्या"ची वाक्य ही आहेत , काही काही ठिकाणी संदेश ही द्यायचा प्रयत्न केलाय .
एकूण्च अगदी परफेक्ट नसला तरी बर्याच अंशी जमलेला चित्रपट . आश्चर्य याच की त्या मानाने याची प्रसिद्धी काहीच केलेली नाही . वेळ मिळाला तर जरूर थिएटर ला जाऊन बघा .. पैसे अगदी वायाच नक्की जाणार नाहीत .

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परीक्षण.. ट्रेलर बघितल्यावर थोडी कन्फ्युज होते पण आता बघेन Happy
मल्टीप्लेक्सपेक्षा अश्या थिएटरमधे जास्त मज्जा येते

मी टिव्हीवरच पाहिन.
कारण जत्रा बघितल्यावर लैच वाइट वाटलेलं.
पैशे वाया म्हणुन.
पण तोच चित्रपट मधला काही वेळ वगळता टि व्ही वर लागल्यावर चांगला एन्जॉय करु शकलो होतो.

भुक्कड सिनेमा आहे. अचरट चाळे बघुन हसायला आले नाही.

वेळ मिळाला तर जरूर थिएटर ला जाऊन बघा .. पैसे अगदी वायाच नक्की जाणार नाहीत

आता काय करावे बरे??????? आमच्या जवळच्या थेटरात संध्या. ५.३० चा एकमेव शो आहे. तो पुढच्या रविवारपर्यंत टिकला तरच पाहयला मिळेल, नाहीतर ऑफिस संध्याकाळी ६ ला सुटते हे blessing in disguise समजावे काय??????

रिया Happy
तसही समज Happy
अगदी ग्रेट नाही पण टाईमपास नक्कीच आहे.
आपला प्रॉब्लेम आहे की आपल्या मराठी चित्रपटाकडूनच्या अपेक्षा जरा जास्तीच आहेत .
जर तुम्ही गोलमाल सीरीज(नवी ) टाईप चित्रपट एंजॉय करू शकत असाल तर हा नक्कीच कराल .

परीक्षण आवडले. वरच्या संमिश्र प्रतिक्रिया वाचून चित्रपट नक्की कसा आहे याचा अंदाज येत नाही. स्वतःच पाहावा लागेल Happy

स्वतःच पाहावा लागेल>> जत्रा सारखे सिनेमे आवडत असतील तर ह्या सिनेमाही आवडेल कदाचित.
म्हणुनच मी टि व्ही वर आला की पाहिन. (झी वाले दाखवतीलच ४ महिन्यात)

मस्त चित्रपट... ( एक वेळ पाहण्यासारखा)
सिद्धार्थ जाधवसाठी नक्की बघा...

अरे केदार तु सातार्‍याचा का ?... या चित्रपटात माहुलीच शुटींग केलेल आहे.

पण चित्रपटाचा खरा स्टार आहे सिद्धार्थ जाधव . एकही संवाद नसताना (एचामामा वगळता) त्याने हा चित्रपट अक्षरशः खाल्ला आहे >>+१००००
सिद्धार्थ साठी एकदा तरी पाहाच..
माझी पण ईच्छा नसताना गेले होते पहायला, पण आश्चर्याचा सुखद धक्का बसला .