शुभास्ते पंथान: .....(गीत)

Submitted by UlhasBhide on 2 June, 2013 - 11:08

शुभास्ते पंथान: .....(गीत)

ऐक, आपुले गूज कुजबुजे
झुळझुळणारा वारा
तुझ्या नि माझ्या मनी वर्षती
रिमझिम रेशिमधारा

वाळूवरती रेखियलेल्या
अवघडलेल्या रेषा
मिश्किल हसती, बघून अपुल्या
नजरेतील इशारा

उत्सुकतेने बिंब थबकले
जळात बुडता बुडता
क्षितिजावरती ये उदयाला
नवथर प्रीती-तारा

अंतरातल्या रंगछटा बघ
कशा नभावर खुलल्या
नव-पथिकांना देइ शुभेच्छा
आसमंत हा सारा

.... उल्हास भिडे (२-६-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

़कविते च नाव वाचून वाटले की ही संस्क्रुत कविता असणार.
असो नाव दुर्बोध अस ले तरी कविता छान सोपी सुटसुटीत झालिये
नावा प्रमाणे कवितेत ही उल्हास जाणवतोय

मला ही गझलेच्या धाग्यावर दिसते आहे उकाका >>> मुळात कविता विभागात पोस्ट केली आहे.
आणि 'वाचकवर्ग' मधे गझल विभाग समाविष्ट केला असल्याने त्याही धाग्यावर दिसणं स्वाभाविक आहे.
म्हणूनच शीर्षकात 'गीत' असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

ओके काका

पण हिरमोड झाला ना म्हणून म्हणालो मी काका गैरसमज नसावा Happy

बघा जमल्यास गझल विभागातून हलवता आल्यास
आपले लेखन आपण सार्वजनिक करतो तेव्हा ते सर्वाना दिसण्याची सोय तशीही होतेच ना Happy

वैवकु,
हिरमोड झाला >>> वाईट वाटले..... असो.....
तुमच्या सूचनेला मान देऊन योग्य तो बदल केला आहे.
ही रचना आता गझल विभागात दिसणार नाही.

खरोखरच छान गाणे होईल याचे....
पहिल्या पावसासारखी अल्हाददायक!
सुर्रेखच!!

सर्वांना धन्यवाद.
-------------------------------------------------------------------------------------------
काही प्रतिसादांच्या संदर्भाने :
या गीताचा आणि पावसाचा काय संबंध आहे ते मला तरी समजलं नाही. असो....
-------------------------------------------------------------------------------------------
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

सुंदर कविता काका.
मी 'अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने' या चालीवर म्हणून बघीतली...छान जमतेय.