Submitted by UlhasBhide on 2 June, 2013 - 11:08
शुभास्ते पंथान: .....(गीत)
ऐक, आपुले गूज कुजबुजे
झुळझुळणारा वारा
तुझ्या नि माझ्या मनी वर्षती
रिमझिम रेशिमधारा
वाळूवरती रेखियलेल्या
अवघडलेल्या रेषा
मिश्किल हसती, बघून अपुल्या
नजरेतील इशारा
उत्सुकतेने बिंब थबकले
जळात बुडता बुडता
क्षितिजावरती ये उदयाला
नवथर प्रीती-तारा
अंतरातल्या रंगछटा बघ
कशा नभावर खुलल्या
नव-पथिकांना देइ शुभेच्छा
आसमंत हा सारा
.... उल्हास भिडे (२-६-२०१३)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा उल्हासजी, पहिल्या
व्वा उल्हासजी, पहिल्या पावसाची पहिली कविता वाचायला दिलीत !
खूप म्हणजे खूप छान. नव
खूप म्हणजे खूप छान. नव पथिकांना देई शुभेछ्चा---- सृष्टी आणि कवि दोघेही असे वाटते
मस्त गाणे होईल याचे.
मस्त गाणे होईल याचे.
़कविते च नाव वाचून वाटले की
़कविते च नाव वाचून वाटले की ही संस्क्रुत कविता असणार.
असो नाव दुर्बोध अस ले तरी कविता छान सोपी सुटसुटीत झालिये
नावा प्रमाणे कवितेत ही उल्हास जाणवतोय
मस्तच!! काय छान ताल आहे
मस्तच!! काय छान ताल आहे कवितेला!....:स्मित:
सुंदर, सुंदर आणि सुंदर .....
सुंदर, सुंदर आणि सुंदर .....
फार सुंदर काव्यमय गीत.
फार सुंदर काव्यमय गीत.
आवडलीच पण्न मला ही गझलेच्या
आवडलीच
पण्न मला ही गझलेच्या धाग्यावर दिसते आहे उकाका
मस्त गीत काका
मस्त गीत काका
मला ही गझलेच्या धाग्यावर
मला ही गझलेच्या धाग्यावर दिसते आहे उकाका >>> मुळात कविता विभागात पोस्ट केली आहे.
आणि 'वाचकवर्ग' मधे गझल विभाग समाविष्ट केला असल्याने त्याही धाग्यावर दिसणं स्वाभाविक आहे.
म्हणूनच शीर्षकात 'गीत' असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
ओके काका पण हिरमोड झाला ना
ओके काका
पण हिरमोड झाला ना म्हणून म्हणालो मी काका गैरसमज नसावा
बघा जमल्यास गझल विभागातून हलवता आल्यास
आपले लेखन आपण सार्वजनिक करतो तेव्हा ते सर्वाना दिसण्याची सोय तशीही होतेच ना
वैवकु, हिरमोड झाला >>> वाईट
वैवकु,
हिरमोड झाला >>> वाईट वाटले..... असो.....
तुमच्या सूचनेला मान देऊन योग्य तो बदल केला आहे.
ही रचना आता गझल विभागात दिसणार नाही.
खूप सुन्दर.
खूप सुन्दर.
श्यामली +१
श्यामली +१
अह्हा... शब्दनिवड फार
अह्हा... शब्दनिवड फार भावली....
सुंदर कविता ,
सुंदर कविता ,
खरोखरच छान गाणे होईल
खरोखरच छान गाणे होईल याचे....
पहिल्या पावसासारखी अल्हाददायक!
सुर्रेखच!!
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.
-------------------------------------------------------------------------------------------
काही प्रतिसादांच्या संदर्भाने :
या गीताचा आणि पावसाचा काय संबंध आहे ते मला तरी समजलं नाही. असो....
-------------------------------------------------------------------------------------------
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
आवडली
आवडली
सुंदर कविता काका. मी
सुंदर कविता काका.
मी 'अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने' या चालीवर म्हणून बघीतली...छान जमतेय.
छान
छान