आधी बीज एकले

Submitted by सई केसकर on 2 June, 2013 - 05:39

गेले काही दिवस मोन्सॅन्टो विरुद्ध चाललेल्या या चळवळीनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच्या मुळाशी बर्‍याच गोष्टी असल्या तरी सध्या प्रसिद्धी मिळालेली एक लक्षवेधी कोर्ट केस आहे. अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील ह्यु बोमन या शेतकर्‍याला मोन्सॅन्टो या मल्टी बिलियन डॉलर बायोटेक साम्राज्यानी कोर्टात नेले. त्याच्यावर पॅटंट व्हॉयलेशनचा दावा लावण्यात आला. ही केस हा शेतकरी हरला आणि त्याला मोन्सॅन्टोला ऐंशी हजार डॉलर चा दंड द्यावा लागला. पण या चळवळीमागचा जो मोठा तात्विक मतभेद आहे तो समजून घेण्यासारखा आहे. बायोटेक जगतातील ६० % बियाण्याचा व्यापार जगातील ५ मोठ्या कंपन्या बळकावून बसल्या आहेत. मोन्सॅन्टो, सिंजेंटा, बेयर, डाऊ आणि डु पॉन्ट या कंपन्या १९९० सालापासून बियाण्यांच्या व्यापारात पद्धतशीरपणे छोट्या बियाणे विक्रेत्यांना आणि शेतकर्‍यांना संपवण्याचे काम करत आहेत. जेनेटिक मॉडीफिकेशन केलेल्या बियांचे मालकी हक्क या कंपन्या पॅटंटच्या स्वरूपात स्वत:कडे ठेवतात. यामुळे शेतकरी आपल्या पिकातून उत्पन्न होणार्‍या बिया पुढच्या पिकासाठी वापरू शकत नाहीत. प्रत्येक पिकासाठी नवीन बियाणं वापरायला ते बांधील होतात. अमेरिकेतील दीडशे शेतकर्‍यांवर मोन्सॅन्टोनी गेल्या काही वर्षांत असे दावे लावले आहेत. भारतातही बी. टी कापूस बियाणे विकून अधिक उत्पादनाचे खोटे दावे करून कित्येक शेतकर्‍यांच्या दिवाळखोर बनवण्यात मोन्सॅन्टोचा काही प्रमाणात नक्कीच हात आहे. (फिल्म बघा)

छोट्या छोट्या बियाणे विक्रेत्यांना खलास करून जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या बियाण्यांनी बाजारपेठ भरून टाकायची. आपणच तयार केलेल्या जहाल कीटकनाशकांचा सामना करू शकणार्‍या बिया जेनेटिकली मॉडीफिकेशन करून बनवायच्या आणि त्या मालकी हक्कानी शेतकर्‍याला विकायच्या. अशी एक दुष्ट साखळी तयार झाली आहे. या मॉडीफिकेशनचे दुष्परिणाम प्रकट होण्याआधीच हे बियाणे अमेरिकन बाजारपेठेत विकले जाते. आणि या मागे अमेरिकन सरकार आणि मोन्सॅन्टोचे मेतकूट हे एकमेव कारण आहे. युरोपियन युनियन, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान अशा कित्येक देशांनी मोन्सॅन्टोच्या जी.एम खाद्य धन्याला बंदी केली आहे. भारतातील शेतकर्‍यांनी काही पिढ्यांपासून तयार केलेल्या वांग्याच्या जातीवर जी. एम. ओ. चा शिक्का लावून विकण्यापासून काही वर्षांपूर्वी मोन्सॅन्टोला रोखण्यात आलं.

अमेरिकेतील ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक मका आणि सोया हा जी. एम आहे. कुठल्याही प्रोसेस्ड खाद्य पदार्थात काही प्रमाणात मका वापरला जातो. सोयाबीन मुख्यत: गुरांना खायला देतात. परंतू, या प्रक्रियेचे दुष्परिणाम दूध आणि मासांहारावाटे फूड चेन मध्ये पसरतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर जी. एम. खाद्य धान्य सर्रास वापरणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. या धान्याच्या दुष्परिणामांवरच्या संशोधनावरदेखील या कंपन्यांनी रोख लावला आहे. (हा लेख जरूर वाचा)

अमेरिकन लेखक मायकल पोलान यांनी या अन्न बाजाराचे फार मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात की आपल्या शरिरात जाणार्‍या अन्नावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर स्वयंपाक करण्यासारखा उपयुक्त मार्ग नाही. पण ज्या धान्यापासून आपण स्वयंपाक करतो, ज्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात येतात, त्यांच्या मूळ
बांधणीतच जर निसर्गाच्या विरुद्ध जाऊन हस्तक्षेप करण्यात येत असेल तर विश्वास कशावर ठेवायचा? त्यामुळे
जी. एम खाद्यावर लेबल लावण्याची नितांत गरज आहे.

बिजातून रोप उगवण्याची क्रिया ही निसर्गानी मानवला दिलेली भेट आहे. त्यावर कुठलेही भांडवलशाही साम्राज्य असा अधिकार सांगू शकत नाही. तसे केल्यानी जगभरात शेतकर्‍यांचे बळी जातील यात वाद नाही. आणि या मूलभूत तात्विक मुद्द्यासाठी सामान्य माणसांनी लढायची गरज आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://enhs.umn.edu/current/5103/gm/character.html

अधिक माहितीसाठी. खास करून शास्त्रीय माहिती साठी वरील लिंक बघा. लेखाच्या शेवटी सगळ्या कॉमेंट्स मधल्या लिंक्सचं संकलन करीन अजून १-२ दिवसात. तोपर्यंत कदाचित अजून महिती मिळेल.

छान लेख सई.

शूम्पी, इथे बरेच जाणकार आहेत तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला. तरिही मला जे माहित आहे ते मी थोडक्यात लिहीते.
-जिएम बियाणं असलं कि पिक आल्यावर त्या पिकातुन पुढच्या पिकाचं बियाणं मिळत नाही. म्हणजे प्रत्येक पिकाचे बियाणे विकतच घ्यावे लागते. म्हणजे शेतकर्‍याचा खर्च वाढतो.
- शिवाय एका प्रकारची बियाणी घेतली कि त्याला सुटेबल तणनाशके, किटकनाशके आणि रासायनिक खतेही लागताच बरोबर
-तसेच या बियाणांमुळे स्थानिक जातींवर परिणाम होतो. कारण पोलिनेशनला जिएम बियाणं पेरलेल्या शेतीतच रोखुन ठेवता येत नाही. त्यामुळे त्या भागातल्या स्थानिक जाती कमी होऊ / संपू शकतात.
-निसर्गात स्थानिक वनस्पती / प्राणी जपण्याला अनन्य साधारण महत्व आहे.
-हि बियाणी किटकनाशक विरोधी ( तणनाशक विरोधी म्हणायला हवे) , आणि काही प्रमाणात किटक विरोधीही ( किड पडु नये वगैरे अशी ) अशी असतात. हि रसायने आपल्या शरिरात गेल्यावर नक्की दूरगामी परिणाम काय होतील याचा अभ्यास तोकडा आहे.
-हि बियाणी वापरुन सुरुवातीला भरघोस उत्पन्न येते ( त्यासाठीच तर बियाणी बनवतात ) पण सतत उत्पादनामुळे जमिनीचा कस खराब होतो / होऊ शकतो.

तणनाशक आणि किटक नाशक यांचा व्यवसाय प्रचंड आहे. किटकनाशकांबद्दलच म्हणायचे तर आमिर खानने केलेल्या कार्यक्रमात एक भाग होता त्याबद्दल.

रच्याकने, जपानमधे असताना मी केलॉग्स कंपनीचे कॉर्नफ्लेक्स घ्यायचे नाही. कारण मका जिएम आहे की नाही याची अत्यंत बारीक टिप त्याच्यावर असायची. काही पॅकेट्स जि एम असायचे काही नाही. ते बघुन घेणे जिकरीचे होते. त्यामुळे त्यांचे कॉर्नफ्लेक्स घ्यायचेच नाहीत असे ठरवले.

वंदना शिवा यांचे youtube वरचे या विषयावरचे videos बघण्यासरखे आहेत. बाई अतियश हुशार, नावाजलेल्या आणि स्पष्ट्व्यक्त्या आहेत.

धन्यवाद सावली. उत्तम माहिती.

ती अल जझीरा ची लिंक घरी गेल्यावर पाहीन.

मला ग्राहक म्हणून नॉन जीएमओ जिन्नस घ्यायचं स्वातंत्र्य हवच ह्याबद्दल आगाउला अनुमोदन.
जर सध्या तुम्हाला माहित असलेले कोणते ब्रँड्स तसे आहेत यची माहिती इथे दिली तर या धाग्याचा उपयोग होईल का? नुसती चर्चा करून मग कालांतराने ती मागे पडते आणि त्याबाबतीत वैयक्तिक पातळीवर मी काय करु शकते का आणि असेल तर काय याचा विचार हवा. त्यासाठीच मी माझ्या घरी नॉन जीएमो जिनसा वापरणार हा सोडून अजून काही उपाय मला सुचत नाहीये.

South अमेरिकेत अशी सोया लागवड करून सोयाबीन अमेरिकेत आणायचा आणि तिथल्या लोकांना glyphosphate चे दुष्परिणाम भोगायला लावायचे असा सोयीस्कर मार्ग मोन्सॅन्टोनी अवलंबला आहे. >>> मग FDA ह्याच्यावर काहीच करत नाहीये का ? की मुद्दामुन दुर्लक्ष करतयं ? कसं शक्य आहे हे ?

There are 2 studies on the effects of GMO BT corn on mice. One was conducted by FDA which lasted only for 90 days and the corn was cleared. The other was conducted by a university in Spain which fed BT corn to the same breed of mice over their lifetime. In the second study, the mice (especially the males) developed enormous tumors that interfered with their organ function. This is the only published study until now that takes a look at the long term effects of GMO.

Food allergies in children are more prevalent in the US than anywhere else in the world. There have been attempts to link this to GMO crops but I don't know enough about it to comment. That UMN link talks about it.

@Shumpi
When was in the US, I used to buy organic dairy products. Not because of GMO but because of the growth hormones and antibiotics present in non-organic milk. But dedicated organic stores do have non gmo flours. It is only corn that you have to take care with. I don't think wheat is GMO (although I am not so sure). I am still not sure if GMO crops affect humans that badly. But they do damage environment and affect farmers.

सई जिएमो गव्हाबद्दल हे वाच

Though never formally approved for farming in the U.S., Monsanto’s Roundup-resistant wheat was tested in more than 100 fields in 16 states through 2005, when the company abandoned its pursuit of government approval.
Burns said the instant lawsuit was not about whether GMO crops are safe. Instead, he said, the case was about protecting U.S. farmers in the global marketplace that, by and large, doesn’t want genetically engineered wheat.
“At the end of the day, people in various countries have have spoken out and said they don’t want this product,” Burns said. “Yet here we’ve got a multinational corporation attempting to take this matter in their own hands
.”

Read more: http://www.nydailynews.com/news/national/monsanto-sued-farmer-gmo-wheat-...

@ Veka

हो. आत्ता जी एम ओ सेफ आहेत की नाही यापेक्षा त्यांचा शेतकर्‍यांवर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतोय हे जास्त महत्वाचे आहे. आणि ६० हून अधिक देश जी एम ओ पिकांवर का बंदी घालत आहेत हे ही जाणून घेण्यासारखे आहे. भारतासारख्या भ्रष्टाचारानी भरलेलल्या देशात मोन्सॅन्टोला "सरकार" त्यांच्या बाजूने करून घेणे सहज शक्य आहे. पण तरीही त्यांना ते जमलेले नाही. आणि नशिबानी बी टी कॉटन नंतर शेतकर्‍यांमध्ये बराच awareness आला आहे. पण भारतात अजूनही पिकांवर वाट्टेल तशी फवारणी होते. आणि नविन नविन कीट नाशकं पुरवणार्‍या कंपन्या याच आहेत. त्याबद्द्ल पुढचा लेख लिहिणार आहे. तत्पर्य असं की कुठलाही देश असला तरी या गोष्टी घडू नयेत म्हणून सामान्य उपभोगता आणि शेतकरी यांचं एकमत पाहिजे. आणि त्यात सरकारचा नागरिकांच्या बाजूनी सहभाग हवा.

सई, धन्यवाद! मी ऑलरेडी ऑरगॅनिक दूध वापरते.
इथेच कोणीतरी वरती दिलेल्या एका साइटवर सगळे ब्रँड्स लिस्टेड आहेत ते सापडले.
गव्हामध्ये सापडलेल्या (?) जीएमो गुणांबद्दल परवाच एन पी आर रेडिओवर स्टोरी होती. पण त्यात मॉन्सेंटोचा काही हात नव्हता.

भारतासारख्या भ्रष्टाचारानी भरलेलल्या देशात मोन्सॅन्टोला "सरकार" त्यांच्या बाजूने करून घेणे सहज शक्य आहे. पण तरीही त्यांना ते जमलेले नाही.>> अ‍ॅक्चुअली, मी जेंव्हा मोन्सॅन्टो आणि अमेरिकन सरकारमधल्या संगीत खुर्चीच्या खेळाबद्दल वाचले तेंव्हा आपली अडाण्यांनी चालवलेली आणि अशिक्षितांनी निवडून दिलेली सिस्टीम बरी वाटू लागली!

आगावा, त्यापेक्षा आपले बहुतांशी नेते हे शेतकरी वर्गातूनच आले असल्याने त्यांना त्याचे दुष्परीणाम थेट जाणवले असतील, असे नाही वाटत ?

>>इथेच कोणीतरी वरती दिलेल्या एका साइटवर सगळे ब्रँड्स लिस्टेड आहेत ते सापडले.>. हे कुठे आहे शूम्पी? परत देऊ शकशील का?

बापरे!!! ह्यातले बरेच नेहमीच्या वापरातले ब्रँडस आहेत. केलॉग्जशिवाय सिरियलमध्ये वेगळे ब्रँड्स दिसतात कुठे फार.. कठीण आहे.
धन्यवाद अकु

चांगला लेख आहे. बरीच माहिती कळली.

वरती अकुने दिलेली लिस्ट पाहिली. तिथे खुप लोकांचे कमेंट्स आहेत, I am going to starve, म्हणून.
ते बर्‍याच अंशी खरे आहे असे म्हणावे लागेल. यापैकी बरेच प्रॉडक्ट नेहेमीच आपल्या घरात असतात.
आपण ह्या गोष्टीवर किती चेक ठेवू शकतो? अवघड आहे!

Whole Grains Cereal म्हणून कालच Post Cereal आणले. तर तेही नाव ह्या लिस्ट मधे आहे!!

खरंय माधवी. शूम्पी, तू दिलेली लिस्ट बघतेय.
डाळी, पीठं इंडियन ग्रोसरीतूनच घेतली जातात. ती सेफ आहेत म्हणावं का? तसंच कर्कलँड हा ब्रँड ह्यातून सुटला असावा अशीही आशा आहे.

पण होल ग्रेन म्हणजे non GMO असेलच असं नाही. दोन्हीत फरक आहे.
फोझन लंचेस मध्ये मी Amy's वापरते. ते नक्की आहे non GMO आणि चवीला पण छान आहे.

पण होल ग्रेन म्हणजे non GMO असेलच असं नाही. दोन्हीत फरक आहे >> हो गं.

होल ग्रेन जास्त चांगले असे वाचले होते म्हणून आणले 'पोस्ट'चे! पण पोस्ट्चे नाव मोन्सॅन्टोच्या लिस्ट मधे आहे असे.
आणि तु दिलेले लिंक पाहिली तर सिरियलचा एकही ब्रँड ओळखीचा वाटत नाहिये. Sad
फक्त 'न्यु इंग्लंड' ओळखीचा वाटला. पण तो सुद्धा अजून वेरिफाईड नाही आहे.

आता तुम्ही सगळ्या जी नावं लिहिता आहात त्यामधूनच मी माझी लिस्ट बनवावी म्हणते.

फारच माहितीत भर घालणारा लेख. धन्यवाद सई आणि अकु.

केलॉग्जचं नाव बघितल्यावर आधी माझं सिरीयल बघितलं. बॉक्सवर असं काही लिहीलं नाहीये की त्या यादीत केलॉग्ज आहे म्हणजे वापरला जाणारा गहू हा जी. एमच असणार असं समजूनच जायचं?

जीएमो लिहिणे बंधनकारक नाही. म्हणुनच नॉन-जीएमो असे स्पश्ट लिहिलेले अन्न विकत घ्या. ह्या ठिकाणी फक्त जीएमो संदर्भातच चर्चा आहे. पण जीएमो नसलेल्या पिकांसाठी जी रासायनिक खते वापरली जातात त्यांचे दुष्परिणा तेव्हडेच धोकादायक असतात.

जैव शृंखला, अन्न सुरक्षा, वाढती जनसंख्या, वैयक्तीक व त्यामुळे सामाजीक स्वस्थ्य, अन्न उत्पादनाचे व्यावसायीक गणित, व इंटलेक्तुअल प्रोपर्टी अशा अनेक कंगोर्‍यांचा हा प्रष्ण आहे.

जीएमो हे तंत्रद्यान वरील पैकी अनेक समस्या हलक्या करण्यास महत्वाचे ठरू शकते. जीन्स मोडिफाय करून बनवलेल्य नव्या प्रजाती निसर्गात इंट्रोद्युस करून त्या प्रजातीशी सल्ग्न इकोसिस्टेमलाच मोडिफाय करण्या सारखे असते. त्या इकोसिस्टेमचा रिस्पोन्स अतीशय अन्प्रेडिक्टेबल असु शकतो. ती कधी पुर्ण कोसळु शकते तर कधी एक नव्या इक्वीलीब्रिअमला पोहोचते.

माझा मुळ आक्शेप हा ह्या तंत्रद्यानाचे परिणाम पुर्ण जाणुन न घेता लार्ज स्केल वर वापरण्यावर आहे.

अरे अरे.. एवढे पॅनिक होऊ नका. जी एम ओ गहू अजून कुठेच वापरला जात नाहीये. अर्थात त्या लीक झालेल्या प्रयोगामुळे झाला असेल तर माहित नाही. पण इथे शंका व्यक्त करणार्‍या सगळ्या मुली सुग्रण आहेत. त्यामुळे त्या शक्यतो घरीच जेवण बनवत असतील. प्रोसेस्ड फूड सोडून काहीच न खाणार्‍या लोकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे.

@ पेशवा
जी एम ओ पीक जास्त उत्पादन देऊ शकतं या क्लेमवर सुद्धा आता शंका व्यक्त केली जात आहे. तसं कनव्हेन्शल ब्रीडींग करून भारतातच भाताचे कित्येक दुष्काळाचा प्रतिकार करणारे प्रकार विकसित झालेत. पण जी एम ओ ला जशी प्रेस मिळते तशी त्यांना कधीच मिळत नाही. त्या जाती खूप स्वस्त आहेत. वाढत्या लोकसंखेचा सामना करण्यासाठी आधी प्रत्येकानी कंसंप्शन कमी केले पाहिजे. आणि यात परत अमेरिकेचाच नंबर पहिला आहे.
http://chartsbin.com/view/12730
हा मॅप बघा. अमेरिकन लोक सरासरी वर्षाला १२० किलो पर कॅपिटा मीट खातात. ही संख्या युरोप च्या आणि कॅनडाच्या दुप्पट आहे. त्या तुलनेत भारत ४.४ किलो आहे. ओव्हर कंझंप्शन हादेखिल फास्ट फूड कंपन्यांचा अजेंडा आहे. आणि अमेरिकेलील बीफ इंड्स्ट्रीलाच जास्त मका जातो. गाईंना गवताऐवेजी मका द्यावा का? हा ही पुन्हा पुन्हा प्रस्तुत होणारा प्रश्न आहे.
बियाणं मॉडिफाय करण्याच्या आधी हे कंझंप्शन कमी केलं, आणि परिणामी पेट्रोल, कोळसा यांची बचत केली तर तो जास्त सस्टेनेबल मार्ग ठरणार नाही का?

Pages