१४ जूनला प्रदर्शित होणार्‍या 'अनुमती'ची खास झलक...

Submitted by माध्यम_प्रायोजक on 31 May, 2013 - 01:18

'सहजीवन' म्हणजे नक्की काय?
एकत्र जगलेली अनेक वर्षं, अनेक सुखदु:खं सहीच्या एका फटकार्‍यानिशी संपवता येतात?
आपल्या माणसाच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून आपलं आयुष्य वेदनामय करता येतं?

देशविदेशात अनेक पुरस्कार मिळवलेला 'अनुमती' १४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय..

या चित्रपटाची एक खास झलक...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झलक तर भारी आहे...... आम्हाला असे युट्युब व्हिडिओ एंबेड करता येतील का?

डॉ. कैलास गायकवाड, लंपन,

'अनुमती' हा उत्कृष्ट चित्रपट आहे. जरूर बघा. Happy

चिनूक्स नक्कीच बघणार Happy मागे एका (बहुदा बी पी) च्या आधी चिन्मयी सुर्वेच्या एका पिच्चरच ट्रेलर होत.. नाव आठवत नाहीये. तो पण मस्त वाटला होता. तो कधी रीलीज होत आहे?

हापीसातल्या कॉम्प्यूला ऑडीओ नाही Sad म्हणून नुसतच बघितले. त्यामुळे संवाद समजले नाहीत. कलाकार तर मस्तच आहेत. नक्की पहाणार Happy

विक्रम गोखले !!!
त्यांच्या ट्रेलरमधल्या काही फ्रेम्स तर अगदी पॉझ करून बघितल्या. मस्त ट्रेलर.

अप्रतिम! विक्रम गोखलेंचा अभिनय अतिशय सुरेख. नक्की पहाणार.
त्यांच्या ट्रेलरमधल्या काही फ्रेम्स तर अगदी पॉझ करून बघितल्या. >>> +१.