तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीही दाखवतात! कॉर्पोरेट कल्चर दाखवायचे तर आधी नीट रिसर्च करावा ना!
>>काल तर तो 'क्रिश' मनवाला विचारत होता - आज संध्याकाळी तू कोणता ड्रेस घालणारेस?
क ह र >> +१००

काय डायलॉग होते- मी तुझी जीभ हासडीन.
<<
आणि त्यावर सून म्हणे मी काय आ करून जीभ बाहेर काढून बसणार आहे का , गळा दाबीन तुमचा Biggrin

aBP majha वर शनिवारी वैभव -मनवाची मुलाखत पाहिली का कोणी?
इति मनवा - 'महेश्दादांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की ही realistic serial असणार आहे म्हणून. आपल्या रोजच्या आयुष्यात जे घडतं तेच दाखवायचं. त्यामुळे संवादांवर त्यांनी आणि प्रवीण तरडे यांनी खूप मेहेनत घेतलीये. कुठलाही प्रसंग खोटा वाटू नये, even humour सुद्धा खोटं वाटू नये याची त्यांनी काळजी घेतली. आणि मराठी serial मध्ये पहिल्यांदाच असं outdoor location ला गाणं शूट झालंय. लोकांची इतकी प्रशंसेची पावती मिळतिये. मला तर माझ्या real life मधेही असं सासर मिळावं, अशा सोसायटी मधे घर असावं असं वाटू लागलंय.
Lol
वैभव = hats off to महेशदादा. सगळं क्रेडीट त्यांच्या मेहनतीला. मी आणि मनवाने याआधी ALL The Best madhe एकत्र काम केल्याने आमची chemistry जुळायला वेळ लागला नाही.

मी नेमकं "आम्हाला आधीच सांगितलं होतं की ही realistic serial असणार आहे म्हणून. आपल्या रोजच्या आयुष्यात जे घडतं तेच दाखवायचं. त्यामुळे संवादांवर त्यांनी आणि प्रवीण तरडे यांनी खूप मेहेनत घेतलीये. कुठलाही प्रसंग खोटा वाटू नये, even humour सुद्धा खोटं वाटू नये याची त्यांनी काळजी घेतली. " एवढंच पाहिलं. एवढा वास्तववाद पचनी न पडल्याने रिमोटवर मेहनत घेतली.

एवढा वास्तववाद पचनी न पडल्याने रिमोटवर मेहनत घेतली. Rofl
मेले हसुन हसुन. वरचे संवाद वाचून तर लई करमणूक झाली.

प्रसंगः सोसायटीची मिटींग- कुलकर्णीकाकू- हॅल्लो , कोण बापट का?? तुम्ही येत नाही क मिटींगला.. होका बरबर.. रुकसार्चे अम्मीअब्बु आले आहेत का?? बिर्याणी.... (पुढे अजुन काहीतरी अश्याच अर्थाचे)

कालच्या भागात- बापटांचा मुलगा म्हणतो.. मला सासुसासरे हवे होते... रुकसारचे आईवडील एका अ‍ॅक्सिडेंट्मधे गेले...... Uhoh

आगाउ, काशी अगदी पर्फेक्ट. काल लक्षातच आले नाही. मेरा मन मातीच्या चुली के लिये तरस रहा है. मी काल टीव्ही बंद करून खोली लॉक केली आहे. फक्त आणि फक्त पेपर वाचणार रात्री.

त्या क्रिशचे डिरेस, हेरस्टाईल एकदम ९० मधल्या सुमीत सैगल-अविनाश वाधवान टाईप आहेत!>> आणि आवाज राणी मुखर्जीसारखा!

अमांची आणि वंदना गुप्तेंची गाठ घालून द्या रे कोणीतरी! Biggrin

नहींssssssssssssssssssssssssssssssssssss

माझं अन सिरीअलचं जमेना. मैने रिमोट माताजी के चरण में रख दिया है. असीम शांती. बाजुला दोन्ही कुत्रे झोपती.

आता सईला पण आणल आहे ह्या सेरिअल मधे.

realistic serial << कुलकण्यांच्या घरातील संवाद रियल मधे घडतात???

अरे, ते कतार रिटर्न काका ज्या निर्विकारपणे "मला तुझं थोबाड फोडावंसं वाटतंय " उद्गारतात त्यापेक्शा कितीतरी भावपूर्ण टेप "कृपया प्रतीक्शा करे आप कतार मॆ है" ची होती.

मनवाची आई कोण आहे?

बाकी कुलकर्ण्यांची सुनेचे संवाद फारच अगावू पणाचे वाटत आहेत. सासूचा अगदी सासर्‍यांसमोर पाणउतारा करते अन कतार रिटर्न काका गपगुमान ऐकून घेतात. ही का त्यांची रिअलास्टीकी?

मला तर वाटते की आता मालीकेला नवीन फाटे फुटणार
१) बापट काकांचे लग्न
२) चोमड्याची मुलगी कुठल्यातरी Dance Reality Show मधे भाग घेणार. Proud

अरे, ते कतार रिटर्न काका ज्या निर्विकारपणे "मला तुझं थोबाड फोडावंसं वाटतंय " उद्गारतात त्यापेक्शा कितीतरी भावपूर्ण टेप "कृपया प्रतीक्शा करे आप कतार मॆ है" ची होती. >> +१०००००००००००००००००००००००००

आशू Lol खरंय! आणि हे वास्तववादी संवाद. बर त्या काकूंचं लगेच इन्स्टन्ट मतपरिवर्तन झालं की! म्हणजे मूळ स्वभाव होता तरी कसा?

बोअर झाली मालिका Sad

दुसरे काय ऑप्शन्स आहेत? एक इन-सिन्क म्हणून म्युझिक चॅनेल सापडला आहे. आजपासून तोच लावावा. ९ ला ही मालिका, पाठोपाठ महाग्रू असे खतरे झाले आहेत झी मराठीवर. ईटिव्हीवर मराठी करोडपती असतं, तर तिथे पर्सनल प्रश्न आणि कथा यांमुळे अतिशय कंटाळा येतो. प्रश्नांपेक्षा कहाण्यातच त्यांना जास्त रस Sad

सध्या माझा सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे " वाहवा क्या बात है" पण तो फक्त शनिवार, रवीवार असतो तोही रात्री १० ला... Sad Sad

Pages