तुझं माझं जमेना

Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07

महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....

Tuza-Maza-Jamena-New-Serial-Zee-Marathi-Serial.jpg

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक गोष्ट लक्षात आलिये का तुमच्या? या मालिकेत प्रमुख पात्रांची नावे त्यांची वर्जिनल नावंच आहेत. उदा. रीमा, वैभव, मन्वा इत्यादी .... Happy

बाकीच्या मालिकांच्या तुलनेत ही मालिका खुपच सुसह्य आहे. मात्र वैभव आणि मन्वा च्या लग्नाला, तसेच रिसेप्शनला नातेवाईक कोणीच नाहीत? हे काही पटलं नाही. नवरानवरीला लग्नानंतर युरोपात पाठवण्याऐवजी सिंगापूरला पाठवायचं आणि उरलेल्या बजेट मध्ये नातेवाईकांची लग्नाला यायची सोय करायची ना .................... Happy

उमेश कामत हवा होता तिथे, बाकी मालिका मस्तच>>> गोंधळलेल्या नवर्‍याच्या भुमिकेसाठी वैभवच योग्य वाटतोय. उमेश कामत गोड गोड क्यूट्क्यूट नवरा वाटला असता.

जिथे तिथे उमेश कामत कशाला हवाय....... आणि किती बुटका आहे तो.

अरूणराव, मांजरेकरांना उपलब्ध कलाकार संचातच लग्न साजरे करायचे असावे बहुतेक.

रच्याकने, दिग्दर्शक कोण आहे या मालिकेचा?

वैभव मनवा छान आहेत.

परवा त्या म्हातारीने उपमा कॉफी करून दिली. तर तिची दयाच आली. मुद्दामून कोण बिघडवेल. त्या घरातल्या सुनेचे बंड डोइजड ठरणार असे दिसते आहे.

सायरस कोण हे कधी कळणार? मनवाच्य आईचा सिक्रेट क्रश आहे का? अश्श्श्श्श्श्श्स्श्शी लाडे लाडे सायरस सायरस करत असते.

रीमा अजून ओव्हर प्ले करत आहेत डोळे मोठे करणे वगैरे. सिनेमातल्यासारखा वावर आहे. वंदनाताईंना आणा हो प्लीज प्रोडूसर.

चोंबड्या जर इकडचे तिकडे करतो तर हे लोक त्याच्यासमोर काहीही वैयक्तिक का बोलतात. चुप रैने का ना.

वंदनाताई नाही येणारेत! ईदर यु हॅव टु अ‍ॅक्सेप्ट रिमा (आणि त्या काही इतकंही वाईट काम करत नाहीयेत) ऑर लीव्ह द सिरियल. किती दिवस वंदना वंदना करत हळहळणार आहात?

मला सासू हवी. Happy

ओके चला लेंगे. ते नाना पाटेकरचं काय झालं? सध्याचा सासरा बरा आहे नो प्रॉब्स.

जिथे तिथे उमेश कामत कशाला हवाय....... आणि किती बुटका आहे तो. >>>>> मनवा कुठे उंच आहे????

गोंधळलेल्या नवर्‍याच्या भुमिकेसाठी वैभवच योग्य वाटतोय. उमेश कामत गोड गोड क्यूट्क्यूट नवरा वाटला असता.>>>>> हे पटलं......

मनवा कशाला उंच हवीये? ती जशी आहे तशी छानच दिसते आहे मालिकेत.
वैभव चांगला उंच आहे (आणि म्हणूनच डॅशिंग दिसतो) हे पुरेसं आहे आमच्यासाठी Lol

मला वैभव नाही आवडत, उमेश कामत हवा होता तिथे, बाकी मालिका मस्तच>>>>+१०००० >>१०००००००
जिथे तिथे उमेश कामत कशाला हवाय....... आणि किती बुटका आहे तो. >> इतकाही काही बुटका नाहीये तो. आणि
नुसता उंच तर दीपक पराशर ही होता. काय करायचं होतं उंचीचं ?
उमेश कामत च्या स्माईल बद्दल काहीच लिहीलं नाही. Sad

मस्त कलंदर, मुंबईत स्वयंपाक असेपण म्हटले जाते आणि काही ठिकाणी जेवण असेपण म्हणतात, आमच्याकडे आम्ही स्वयंपाक केला असेच म्हणतो, आणि जेऊन झाले कि जेवण झाले असे म्हणतो. sorry थोडे विषयांतर झाले, मला हि सिरीयल सध्यातरी आवडतेय.

बरं झालं साबा इथे नसतात नाहीतर फारच ऑड झालं असतं त्यांच्याबरोबर ही सिरिअल बघायला लागली असती तर.
काही प्रसंग अगदी आमच्या घरातलेच वाटले Proud

मातीच्या चुलीची डिक्टो कॉपी आहे. संवाद तर अगदी जसेच्या तसे उचल्येत. Sad काहीतरी जरा नवीन करायला पाहिजे होतं.
पण इतर मालिकांच्या तुलनेत बरी आहे. आणि ते हाउसिंग भारी चकाचक आहे. भारत वाटत नाही. Happy

मनवाची आई पौर्णिमा गानू आहे ना? खरंतर वयाने खूप लहान आहे ती. आईचा रोल कसा काय दिला तिला. माझ्याबरोबर एका संस्कार शिबीराला होती ती पुण्यात. Happy

बाकी कलाकार सगळे चांगलेच आहेत. सुहास जोशींची दया यावी इतका त्यांचं पात्र गंडलंय. रीमा ओव्हरअ‍ॅक्टिंग करत्येय. वैभव चांगला वाटला.

धनश्री,
ती अर्चना , पवित्रं रिश्ताची, ती अजुन ३० पण नाहीये , तिला आज्जीचा रोल आहे ( ते पण पंचवीशीच्याच गेट अप मधे. तिच्या मुली तिच्या पेक्षा मोठ्या दिसतात.)

बाकी तो चोंबडा फार डोक्यात जातोय, चोंबड्याला हसतात काय हे बिल्डिंग चे लोक !
परवा तर सगळ्या सुनबायां मधे कोण सर्वात सुंदर, कोण ट्रॅक्स टी शर्ट घालते इ. चर्चा करत होता सुहास जोशी बरोबर.. सभ्य लोक झापणार नाहीत का नोकराला असा आजुबाजुच्या बायकांवर चीप कॉमेंट्स करताना पाहून , कै च्या कै Uhoh
मला रिमा चांगली वाटतेय , तिच्या परफॉरमन्स साठीच पहाते मी ऑनलाइन एपिसोड्स!
मन्वा चांगलीये , मधुरा वेलणकर पेक्षा कमी अगाउ दिसते!

ऑनलाइन कुठे बघातेस दीपांजली? मी झी मराठी वर बघत होते पण आता २४ एपीसोड पासुन अमेरीकेत दिसत नाहीये.

मला आवडते ही सिरिअल.

जिथे तिथे उमेश कामत कशाला हवाय....... आणि किती बुटका आहे तो. >> इतकाही काही बुटका नाहीये तो. आणि
नुसता उंच तर दीपक पराशर ही होता. काय करायचं होतं उंचीचं ?>>>>>>>>>>>>>>>+१०००००

जिथे तिथे उमेश कामत कशाला हवाय....... आणि किती बुटका आहे तो. >> इतकाही काही बुटका नाहीये तो. आणि
नुसता उंच तर दीपक पराशर ही होता. काय करायचं होतं उंचीचं ?>>>>>>>>>>>>>>>+१०००००>>>>>>>>>>>>

जर उंची, दिसणे, व्यक्तिमत्व महत्वाचे नाहि त्या त्या भुमिकेसाठी तर मग उमेश कामतलाच सगळ्याच भुमिका द्या. तोच नवरा, तोच सासरा, तोच वडिल, तोच गडि.

आजचा मन्वाने स्वयंपाक करण्याचा, डिनर सेट चा प्रसंग सेम माचु मधला.
वेगळं काही घडलं नाही. मन्वाचा उगीच अ‍ॅक्सेंट मारणं डोक्यात जातं.

सिरीयल पाहिली नाही ही, पण इतके श्रीमंत कुटुम्ब असेल तर एकत्र का रहातयेत ?? मुलानी स्वतःचा फ्लॅट घेतलेला नाही का?

Pages