लिंबाची चटणी/लोणचे

Submitted by देवकी on 27 May, 2013 - 14:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

२५ लिंबे, १ किलो साखर, १०० ग्राम मीठ, १०० ग्राम मिरचीपूड.

क्रमवार पाककृती: 

१. लिंबे स्वछ धुवून कोरडी करावीत.

२.लिंबाच्या बारीक बारीक फोडी चिरून घ्याव्या. एकही बी राहू देऊ नये.

३.लिंबाच्या फोडी, मिक्सरमधून सालासकट बारीक वाटून घ्याव्यात.त्यात साखर ,मीठ, मिरचीपूड घालून
ढवळावे.व कोरड्या केलेल्या बरणीत भरावे.

४.चिमूटभर कच्चा हिंग मिसळावा.

५.पाच-सहा दिवसांनी खाण्यास काढावे.

वाढणी/प्रमाण: 
तुम्हाला हवे तसे
अधिक टिपा: 

१.लिंबे कोरडी असावीत.
२.त्यात एकही बी नसावी. नाहीतर चटणी/लोणचे कडू होईल.
३.तिखटाऐवजी केप्र लिंबू मसाला सांगितला होता.पण तिखट चांगले लागते.
४.हिंग वापरल्यास चव येते.पण उपासाला चालत नसल्याने हिंग वगळला तरी चालतो.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिणीची जाऊ
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users