भाजूक तुकड्या

Submitted by अवल on 27 May, 2013 - 00:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पापलेट/ सुरमयी(छोटी)/ बांगडा/ जीताड/ रावस, अशा कोणत्याही माशाच्या ७-८ तुकड्या , लसून ८-१२ पाकळ्या- वाटून, हळद १/४ चमचा, तिखट १/२ चमचा , चिंचेचा कोळ-घट्ट २ चमचे, मीठ चवी नुसार, वरून लावायला बारीक रवा, २ चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

प्रथम मासे स्वच्छ धुवून निथळावेत. त्याला रवा आणि तेल सोडता सर्व मसाला लावून ठेवावा. किमान अर्धा तास तरी मॅरीनेट करावे.
आता नॉनस्टिक पॅन मंद आचेवर तापवावे . गरम झाला की त्यावर २ चमचे तेल सगळीकडे पसरावे. आता माशाची प्रत्येक तुकडी बारीक रव्यात घोळवून तव्यावर टाकावी. त्यावर झाकण ठेवावे. आच मंदच ठेवा. ३-४ मिनिटे झाली की हळुवार पणे तुकड्या उलटवा. पुन्हा झाकण ठेऊन ३-४ मिनिटे ठेवा. आता झाकण काढून ३-४ मिनिटे तसेच थवा. नंतर हलक्या हाताने तुकड्या उलट्या करा. आच बंद करा. ५ मिनिटे तुकड्या पॅन वरच राहू देत. पाच मिनिटांनी लगेच खायला घ्या. तयार आहेत भाजूक तुकड्या !

वाढणी/प्रमाण: 
दोघांनी पुरवून पुरवून खाव्यात.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users