बालपणीच्या मालिका..!!

Submitted by उदयन.. on 26 May, 2013 - 03:39

आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "

माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
Giant_robot_201203.jpg

त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अ‍ॅअ‍ॅअ‍ॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न Happy

नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत Sad ..:)

जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "

firball.jpg

ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... Happy बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो खास तुमच्यासाठी हे काही लोकप्रिय मालिकांचे फोटो
देख भाई देख
Dekh Bhai Dekh.png
रामायण
Ramayan.jpg
श्री कृष्ण
Shree Krishna.jpg
रेणुका शहाणे इम्तिहान
Renuka Shahane imtihan.jpg
तू तू मै मै
tv-shows-we-love-tu-tu-main-main.jpg

>>उदयन, ह्या धाग्यासाठी धन्यवाद. 'पैलतीर' आठवतेय का कोणाला

मला ही नीटशी आठवत नाही पण थोडं टायटल सॉन्ग आठवतंय.

पैलतीर पैलतीर पैलतीर पैलतीर
पक्षी उडून जाई दिगंतरा दृष्टी लागे पैलतीरा

वा मस्त. सगळ्यांनी छान फोटो टाकलेत. सकाळच्या वेळेला (बहूतेक शनिवारी) उल्टा-पुल्टा लागायची तीपण मस्त होती.

कथांवर आधारीत मालिकेत एकदा नीलकांती पाटेकर असलेल्या गोष्टीत एक गाणे होते.
'गाईचे दूध, दुधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकावरचं लोणी, लोण्याचे तूप आणि तुपात आमची बोटं.'
हे आजही गुणगुणते मी.

एक कहानी ही सिरियल मला वाटतं ओ हेन्रीच्या कथांवर आधारित होती. पण त्यावर भारतीय बाज खूप छान चढवला होता. एका गोष्टीत भाग्यश्री होती, तो भागही मस्त होता.

एक कहानी आणि कथासागर ह्या सिरीयल वेगवेगळ्या भारतीय आणि परदेशी भाषांतील कथांचे हिंदीत रूपांतर केलेले होते असे मला वाटते फक्त ओ हेन्री ह्यांच्याच होत्या असे नाही. (बहुतेक, फक्त ओ हेन्री यांच्या असतील तर माझे विधान चुकीचे आहे.)

माझ्या आठवणीनुसार कथासागर ही मालिका वेगवेगळ्या कथांवर आधारित होती तर एक कहानी फक्त ओ हेन्रीच्या कथांवर होती. किंवा मी जे भाग बघितल्याचे आठवतात त्या ओ हेन्रीच्याच कथा होत्या. त्याच्या The gift of Magi, The Cactus, Lost on Dress Parade, Ransome of Red Chief या कथांवर आधारित भाग बघितल्याचे आठवतात.

ओके चिकू, ती एक कथा होती परीक्षित सहानी होता आणि तो खूप जमिन मिळवण्यासाठी जंग जंग पछाडतो आणि मरतो मग असे दाखवलेय कि मेल्यानंतर माणसाला दोन गज जमिन लागते, तेपण एक कहानीत होते का? अजून एक कथा एका झोपडीवर वीज पडणार असते आणि ज्यांनी पाप केले नाही ते वाचणार असतात, शेवटी एक छोटा मुलगा आणि त्याची आई वाचते बाकी सर्व मरतात, अशा काहीशा कथा आठवतात पण नक्की एक कहानी का कथासागर आठवत नाही.
तुम्हाला खूप नावासकट आठवतंय म्हणून विचारते.

मला वाटतं त्या कथासागर मधे होत्या. निदान ओ हेन्रीच्या तरी अशा कुठल्या कथा मला आठवत नाहीत. मला वाटतं पहिली कथा लिओ टॉलस्टोयच्या How much land does a man need? वर आहे. ती बघितल्याचं आठवतंय.

Hmm

dane anaar ke hee pan chhaan hti tyaach Title song pan mast hota.
Kissa hai kahaani hai paheli hai Zindagi ye ....

आमच्या बालपणी बाबाजीका बायस्कोप अशी एक मालिका होती. >>> आता सगळीकडे बाबाजीका ठुल्लू ... Proud

Pages