बालपणीच्या मालिका..!!

Submitted by उदयन.. on 26 May, 2013 - 03:39

आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "

माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
Giant_robot_201203.jpg

त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अ‍ॅअ‍ॅअ‍ॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न Happy

नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत Sad ..:)

जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "

firball.jpg

ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... Happy बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होनी अनहोनी सुपरनॅचरल घटनांबद्दल होती ना?

होनी अनहोनी
होनी अनहोनी
सदियोंसे सतयुगमे
बरसोंसे कलियुगमे
होती रही है होके रहेगी
ना कोई समझे ना कोई जाने
आखोंसे जिसने देखी वही माने

नींव नावची मालिका पण खूप छान होती. गुल गुल्शन गुल्फाम पण आठवतेय..
आणि सुरभि ?? बुधवारी रात्री अगदी आवर्जून बघितली जायची.

होनी अनहोनी - मला ही सीरीयल चांगलीच आठवते कारण आमच्याकडे नविन कलर टीव्ही आल्यावर त्याच्यावर पहिली लागलेली हीच सीरीयल होती-

मस्त, nostalgic झाले, श्वेतांबरा आठवतेय का? वरती सर्वांनी लिहिलेली मालिकांची नावे वाचताना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या त्या मालिका, त्या व्यक्तिरेखा.

अगदी पूर्वी १३ भागाच्या सिरीयल होत्या नंतर ५२ भागाच्या होत्या, त्यावेळी खूप enjoy केले.

रशियन लेखाकांच्या गोष्टींवर अधारीत एक मालिका लागाय्ची ती मस्त होती.
तसेच हीन्दीतल्या प्रसिद्ध लेखकांच्या गोष्टींवर अधारीत पण एक मालिका लागायची ती छान होती. त्यात एक फक्त 'टॉवेल' च्या गोष्टीवर एपिसोड होता तो आठवतोय अजुन.

रशियन लेखनावर आधारित काही कथा होत्या असे आठवतंय, तसेच 'एक कहानी' ह्या मालिकेत भारतातील विविध भाषेतील लेखकांच्या कथांचे हिंदी रूपांतर केले होते, तीपण छान होती मालिका.

क्विझ टाईम- सिद्धार्थ बसू करायचा ना? त्यातच पहिल्यांदा राजदीप सरदेसाई यांना स्पर्धक म्हणून पहिले होते तेव्हा राजदीपची ओळख क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा मुलगा म्हणून करून दिली होती, आता राजदीपचे स्वतःचे IBN हे news channel आहे.

हो आदिती दोन्ही आठवतंय. जसपाल भट्टी एकदम दिलखुलासपणे आणि खुसखुशीत विनोदाने विविध समस्या मांडायचा, अगदी वर्मावर बोट ठेवायचा.

हायला! स्वप्ना, काय मेमरी आहे तुझी! मला आठवतात या सगळ्या मालिका.

मॅक्स, किले का रहस्य फेव होति माझी.

ये भय अभिशप्त किला है, सदियों पुराना
भूल करके भी कोई, इसमें मत जाना
मत जाना
मत जाना
(आणि मग एक खच्चून किंकाळी)

समंदर = समीर सोनी नेव्हीत असतो ती मालिका मस्त होती. त्यातल्या हिरॉईनचं नाव माहित नाही.
फर्मान = कंवलजीत सिंह व दिपिका देशपांडेची मालिका. मस्त होती ती सुद्धा.
बाकी शांती आणि स्वाभिमान या आद्य विबासं मालिका यात शंका नाही. Proud

>>ये भय अभिशप्त किला है

ये है अभिशप्त किला

नंदिनी, देख भाई देख आपुनका फेव्हरेट. फरिदा जलाल, नविन निश्चल, शेखर सुमन, भावना बलसावर....धम्माल. त्यात उर्वशी ढोलकिया पण होती.

जुनून मध्ये टॉम ऑल्टरचं नाव केशव कलसी असतं आणि मंगल धिल्लोचं सुमेर राजवंश असतं ह्यापलिकडे मला काही आठवत नाहिये Happy

युग मालिका पण चंगली होती त्याच गान युग बदला बदला हिंदुस्तान आज के युग का हर इन्सान आसाच काही तरी होत

चन्द्रकान्ता पण मस्त होती त्यामधले जबंज, कुरुर्सिंग (याखु पिताजी )शिवदत्त तारा ,कलावती,,तेजसिंग बद्रीनाथ (इरफान खान ) यांची जादू असायची त्यामधल्या लढाया मस्त वाटायच्या प्रत्येक भाग काहीतरी गुपित ठेऊन संपयाचा मग आखा आठवडा पुढे काय होणार याची उकल करण्यात जायचा .रविवार कधी येतोय याची आतुरतेने वाट बघायची ,मस्त वाटायचं तेव्हा .

भक्ती बर्वेंची 'शोधू कुठे किनारा' ही मालिकाही छान होती, अहो ऐकलत का? ही मालिका आठ्वते का? शेखर सुमनची रिपोर्टर, तहकीकात यापण छान होत्या

Pages