कुठं कुठं जायचं "भिजायला".... - २

Submitted by जिप्सी on 25 May, 2013 - 09:39

सुमारे तीन वर्षापूर्वी कुठं कुठं जायचं "भिजायला".... हि थीम सादर केली होती. याच थीमचा पुढचा हा भाग.
सध्या उन्हाची काहिली सुरू आहे. याच उन्हात थोडासा गारवा मिळावा म्हणुन हा चित्रप्रपंच. चला तर पावसाची वाट पहात, भिजायला जाण्याची यादी तयार करत आणि सोबतीला मराठी "पाऊसगाणी" गुणगुणंत या सफरीचा आनंद लुटुया. Happy

प्रचि ०१
आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग
आभाळात आले काळे काळे ढग,धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग....

प्रचि ०२
सुख पावसापरी यावे, आयुष्य अन्‌ हे भिजावे,
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो...घन आज बरसे मनावर हो...

(ठोसेघर धबधबा)

प्रचि ०३
चिंब पावसानं रानं झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी, रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

प्रचि ०४
खुळ्या खुळ्या रे पावसा, किती भिजविसी मला
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला

(विहिगाव धबधबा)

प्रचि ०५
घन ओथंबून येती, बनांत राघू फिरती
पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

प्रचि ०६
आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात
छुम्‌ छुम्‌ पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
आली आली सर ही ओली


(इगतपुरी)

प्रचि ०७
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

प्रचि ०८
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा

प्रचि ०९
ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना गंध गेला रानावना

(माळशेज घाट)

प्रचि १०
आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिरकावुन येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला
मेघुटांच्या पालखीला, डोळे गेले आभाळाला
जाईजुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला

प्रचि ११
बरस रे घना
तूच आज शमवी तृषीत माझिया मना

प्रचि १२
हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा

प्रचि १३
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

प्रचि १४
तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

प्रचि १५
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात

(लवासा)

प्रचि १६
सोसाट्याचा आला वारा सरसर आल्या धारा, भिजुनिया देह चिंब झाला गं
सजणीला भेटायाला साजनाने यावं तसा सांज वेळी पाऊस आला गं

प्रचि १७
पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली

प्रचि १८
पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू

(भंडारदरा)

प्रचि १९
कधी रिमझीम झरणारा आला ऋतू आला
कधी टपोर्‍या थेंबांचा आला ऋतू आला

प्रचि २०
पावसात नाहती लता लता कळ्या फुले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले

प्रचि २१
उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

प्रचि २२
गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

प्रचि २३
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा

प्रचि २४
घन बरसत बरसत आले
वनि मोरांचा षड्ज लागला, झाडांतुन मल्हार जागला
मन चकित, सुगंधित झाले

प्रचि २५
या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे

प्रचि २६
जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता

प्रचि २७
झुंजुर-मुंजुर पाउस मार्‍यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं
टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्या हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये, साजणा...

प्रचि २८
दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....

प्रचि २९
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

(माळशेज घाट)

प्रचि ३०
पावसा ये रे पावसा, दे जिवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा

प्रचि ३१
ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी जातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते ...... माझ्यात


जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात

(काहि प्रचि पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थीम तर अप्रतिम आहेच….पण जिप्सिचे फोटो म्हणजे चितळ्यांच्या बाकरवाड्यांसारखे …. बस नामही काफी है !!!!!

पावसावरील सुंदर गाण्यांचे सुंदर शब्द.. सोबतीला सुंदर प्रकाशचित्र.. आणि जिप्सीची सुंदर थीम ! मस्त मस्त मस्त

आधीच ऊन जळवतंय न् त्यात तुझी असली थेरं...!
एक स्पर्धा घेऊया..
वरील सगळे प्रचि ' कुठला फोटो उत्तम?' या निकषावर चढत्या क्रमाने लावा... !!
.. कुणाचंही एकमत होणार नाही! Happy

सुपर्ब!!!

एक से एक प्रचि.. त्याला साजेश्या सुंदर ओळी.... बेस्ट!!!

मफो _/\_ Happy

गेल्या सहा वर्षात अनुभवलाच नाहिये मी हा पाऊस....<<< +१००० फक्त ते १५ वर्ष करा.... अतिशय मिसते मी आपल्याकडचा हा नजारा आणि ती पावसात भिजण्याची मज्जा Sad

जिप्स्या तो ३१ नम्बर फोटो टाकला नसतास तरी चाललं असतं....

जिप्सी:
अस्सल चैतन्याचा तू खूप मनापासून आस्वाद घेतला आहे, अन् आम्हालाही शब्द-चित्र यांतून पोहोचवलाय... Happy
कुठं कुठं जायचं "भिजायला".... - भाग ३ मध्ये बसराणा-या जलधारांमधल्या राजांच्या लाडक्या दुर्गांची सफर घडवा, अशी खास फर्माईश!!!

श्या! कोणता फोटो काढला ते बघायचंय. पुन्हा टाका ... Wink Proud

जिप्सी, तू परवाच फोटो टाकलेस अन आज सकाळी सकाळी पावसाची सर आली की भिजवायला! Happy

अरे, कशाला काढ्लास तो फोटो???
मी फक्त म्हंटलं नसता टाकलास तरी चाललम असतं... कारण तो फोटो अजुनच जळवत होता..... Sad

Pages