कुठं कुठं जायचं "भिजायला"....

Submitted by जिप्सी on 21 May, 2010 - 00:05

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !
भरं ऊन्हात पाऊस घेवुन आभाळ मनात दाटतं
तरी पाऊलं चालत रहातात, मनं चालत नाही
घामाशिवाय शरिरामधे कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येतो,
ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो…
वारा ऊनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो…..
पानाफुला, झाडांवरती छपरावरती चढुन पहातो……..
दुपार टळुन संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ…
ऊन्हामागुन चालत येते, गारं गारं कातरवेळ…
चक्क डोळ्यांसमोर ॠतु कुसं बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो………==================================================
कवी सौमित्रांची हि कविता आजहि ऐकली कि भर उन्हात गारव्याची जाणीव होते.
पाऊस - तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणार्‍या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्‍या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात.

आता तुम्ही म्हणत असाले कि, बाहेर एव्हढे कडक ऊन आहे, अंगाची लाही लाही होत आहे आणि याने काय हे पावसाचे लावले आहे. पावसाला तर अजुन अवकाश आहे. अहो, म्हणुनच तर........ डोळ्यांना थोडासा गारवा देण्यासाठीच तर हा फोटोप्रपंच!!!!

पुढच्या महिन्यात पावसाला सुरुवात होईल तो पर्यंत तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात कुठे जायचे ते प्लानिंग करून ठेवा. आयत्यावेळी शोधाशोध करण्यात संपूर्ण पावसाळा निघुन जाईल. Happy

चला तर मग आज मी तुम्हाला मुंबई-पुण्याच्या जवळपास असलेल्या धबधब्यांची सहल घडवून आणतो.
(हो, पण माझी फि माहित आहे ना!!! विसरलात Sad अहो तुमचे प्रतिसाद - ती देण्यात कुठेहि कंजुसपणा करू नका नाहीतर धबधब्याजवळच सोडुन येईन परत :))

फक्त एक काम करायचे ऑफिस/घरामध्ये असाल तर एक कप गरमागरम चहा/कॉफी सोबत घ्यायचा, जर जमलच तर कांदाभजीही आणि गारवाची सीडी ऐकत हि सफर करा.

==================================================
भंडारदरा
==================================================

==================================================
लोणावळा
==================================================

==================================================
माळशेज घाट
==================================================

==================================================
भाजे गाव (लोणावळा)
==================================================

==================================================
कार्ला
==================================================

==================================================
नांगरतास धबधबा (आंबोली-सावंतवाडी)
==================================================

==================================================
ठोसेघर धबधबा (सातारा)
==================================================

==================================================
दाभोसा धबधबा (जव्हार)
==================================================

==================================================
कसारा घाटातुन जाताना
==================================================

==================================================
पवई तलाव - पावसाळ्यात
==================================================

==================================================
शांग्रीला वॉटरपार्क (कृत्रिम धबधबा Happy )
==================================================

==================================================
फिरून फिरुन दमलात??? घ्या मग गरमागरम मक्याचे कणीस, मस्त तिखटमीठ और लिंबू मारके Happy (प्रत्येकाच्या स्क्रीनवर आहे, त्यामुळे इतरांचा विचार करू नका, पटकन संपवा Happy )
==================================================

गुलमोहर: 

अरे तुझे फोटो अन अश्या ठिकाणी भिजण्याची हौस... अंगावर शहारा आणलास रे...

जमल्यास वांगणी अन नेरळ जवळचा पण धबधबा इथे कोसळू देत.

त्रास माणुस आहेस लेका तू ! Happy

भन्नाट आहेत सगळे धबधब्यांचे फोटो !

लाँग एक्स्पोजर वापरून धबधब्यांचे फोटो ट्राय केले नाहीस का कधी ? त्यात एक मस्त ड्रीमी फील येतो.....कधी ट्राय करुन बघ.

प्रकाश ला अनुमोदन. मी ही एक्झॅटली हेच म्हणनार होतो.
हे करताना फक्त tripod बरोबर असुदेत.

गारेगार खाल्यासारख गार वाटलं रे!!
फोटो मस्तच. Happy

लाँग एक्स्पोजर वापरून धबधब्यांचे फोटो ट्राय केले नाहीस का कधी ? >> अनुमोदन.
पण हे करताना कॅमेर्‍यात अपेरेचर वॅल्युची रेंज पण तशीच हवी.
मी ट्राय केलाय पण लाँग एक्स्पोजरसाठी मला तेवढी अपेरेचर वॅल्यु मिळत नाही माझ्या साध्या डीजिटल कॅमेर्‍यात.
(जास्तीत जास्त ८ येते) मग फोटो ओव्हरक्स्पोज होतात.

झकासराव,
लाँग एक्स्पोजर करताना "Aperture / f/stop" बरोबरच एक "Exposure Compensation" option असते ते वापरून तुम्ही overexposure control करू शकता. ते option असेल तर पहा तुमच्या कॅमेर्‍यात.

योग्या$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$अरे काय हे केलंस? का............ का आठवण करुन दिलीस..................अरे पाऊस तरी सुरु होऊ दे

कसले भन्नाट फोटो काढतोस यार !!

अप्रतिम !!

ठोसेघर चा धबधबा , ग्रेट यार !! जुन्या आठवणी जाग्या केल्यास !!
इतकी मस्त जागा आहे ती
स्पेशली गर्लफ्रेन्ड बरोबर जायला !! Wink

>>>ठोसेघर चा धबधबा , इतकी मस्त जागा आहे ती, स्पेशली गर्लफ्रेन्ड बरोबर जायला !! >>>>
प्रसाद तिथे लिहीलेला बोर्ड वाचला का? "पाण्याच वागण विसंगत, पोहणार्‍याला.............". गेलेल्यांची यादीच दिली आहे. तेंव्हा जरा जपुन. नाही म्हंटल गर्लफ्रेन्ड बरोबर नेणार असेल तर Wink

अयाईगं, भिजले मी सार्‍या धबधब्यांत...... भर उन्हाळ्यात थंडगार शिडकावा झाला! मस्तच आहेत फोटो! Happy

योगेश Angry

जा तुला मी शाप देतो... यंदाच्या उन्हाळ्यात तुझ्यावर घामजलेल्या प्रतिसांदाच पाऊस कोसळो... :p

मस्त यार!!!!!!!!!!!
इतक्या उकाड्यात सुध्दा पावसात भिजल्यासाख वाटल!!!!
काय वेडा माणुस आहेस तू.

अहाहा.. मस्त गारेगार फोटो..
कधी येणार पाऊस! अजुन कित्त्त्त्त्त्त्ती दिवस....... Uhoh

काय म्हणु ? शब्दच नाहीत.. एकसे एक फोटो..
त्या भंडारादर्‍याचा होडीचा फोटु सगळ्यात आवडला..

Pages