कार्या लयात असताना.... ;)

Submitted by अत्रुप्त आत्मा on 24 May, 2013 - 15:12

कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर ....

कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे,

केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे,

क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या Wink ) ''सुपार्‍या'' वाजविणे...

असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात. अनेक ठिकाणी काहि कार्यालयं ही १ फॉरमॅट आखून काम करवून घेतात...तिथे त्रास नसतो..परंतू जी कार्यालय कस्टमर-पूजक प्रवृत्तीची असतात,तिथे मात्र गुरुजी हा प्राणी कार्यालयातल्या खुर्ची सारखाच यजमानांना त्या दिवसापुरता विकत अथवा भाड्यानी मिळालेला १ वस्तु विशेष असतो... ''कस्टमर-पूजक---मंगल-कार्यालयाचे गुरुजी'' हा टिळा आपण एकदा लाऊन घेतला की त्यापुढचे सर्व-काही सहन करण्याची शक्ति (आणी भक्ति) अंगात बाणवावीच लागते...

आणी अश्या कार्यालयात गेल्यावर मग सुरु होते...

.............................................द ग्रेट गुरुजी-जोकर सर्कस..........................................................

"कार्यालयाचा गुरुजी"म्हणजे
कार्यालयाचा असतो नोकर
त्याहुन खरं सांगायच तर
सर्कशीतला अस्सल जोकर

कधी घोड्यावर कधी रिंगणात
यावा लागतो प्रत्येक खेळ
जोकर नेहेमी तयार असता...
यजमान चुकवतात त्याची "वेळ"

ट्रॅफिकच्या त्या कारणांनिही
त्यांची बाजू लाऊन धरतात
पण उशिरा येऊन कार्या-लयात
नुस्तेच खुर्चीत' येऊन बसतात

तेव्हढ्यात त्यांना अठवण होते.
आपल्या मुलीचं लग्न आहे.
मुलगि खोलित जाऊन पहाता..
मेक-अप मध्ये मग्न आहे.

मग...हा ही येतो, तो हि येतो
जो येतो..गुरुजिंना धरतो
जोकर वेळेवर "तयार"असुन
उशीर का?...म्हणुन रागे भरतो.

तेव्हढ्यात मुलगी कावरी बावरी
धावत/पळत--स्टेजवर येते
आवरा..उरका घाई करत
यजमानस्वारी गुरुजिंना पिडते

मग सर्कस सुरु होते
एकेक कार्यक्रम पुढे जात
एका हतात माइक धरून
एस्कॉर्टिंग करताना दुखतो हात

इकडून टोला तिकडून टोला
चिडलात तरी हरि-नाम बोला
तेव्हढ्यात गर्दी शांत झाली
का???..तर म्हणे...नवरदेव आला

सगळा खेळ संपता येतो
जिवघेणा झोक्यांचा खेळ
गुरुजी खालच्या 'जाळ्यात' पडून
झुलवा/झुलवीचा साधतो मेळ

असल्या सगळ्या सर्कशीत
गुरुजिंचा खरच जोकर होतो.
मला(ही) अठवतं एके-काळी
मी कार्या-लयाचा नोकर होतो.
============================================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्या-लया >> अस मधेच शब्द फोडण्याने काय साधते? कवितेतील फारसे कळत नसल्याने प्रश्न विचारतीये.

खरा शब्द (संधी) कार्य+आलय (घर)
पण इथे अश्या केलेल्या विग्रहा मुळे अर्थ कार्य जेथे लयास जाते असा केलेला वाटतोय Happy

जिथे मंत्रा-लय झाल, त्याला कार्या-लय म्हणव असा कवितेचा आशय होय! जाऊ द्या त्या नादात आमची भोजना-लयाची नोकरी जायची.

@पण इथे अश्या केलेल्या विग्रहा मुळे अर्थ कार्य जेथे लयास जाते असा केलेला वाटतोय >>> बराब्बर...बराब्बर...येकदम बराब्बर Happy