ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र

Submitted by इदं न मम on 24 May, 2013 - 00:08

नमस्कार,

खुप दिवसांपासुन मला ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र या धरतीवर काही तरी सुरु करायची इच्छा आहे. त्यात, हास्यक्लब,ज्येष्ठांना सोसवतील असे छोटे व्यायामप्रकार,योगासनं,प्राणायाम तसेच लायब्ररी, कधीतरी एखादी छोटीसी पिकनिक अशा गोष्टींचा अंतर्भाव असेल.

त्याबद्दल मला गाईडन्स हवा आहे.
सर्वात प्रथम या साठी काय काय गोष्टींची प्रामुख्याने गरज आहे. अगदी जागेपासुन सुरवात करावी लागेल्, हे समजतय. योगा प्रशिक्षकाची नियुक्ती कशी करावी? प्रवेशासंबंधी पात्रता साधारणपणे कशी असावी? प्रवेशअर्जात काय काय टाकावे? वय, पत्ता, इमर्जन्सी फोन नंबर हे तर असतातच पण मुख्य म्हणजे त्यांचे आजार, पथ्य यांची माहिती असावी असं मला वाटतं.

प्लीज, कुणाला यासंदर्भात अजुन माहिती असेल तर शेअर करा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे स्वयंसेवक म्हणून काम करून तुम्हाला माहिती+अनुभव मिळू शकेल
http://www.dignityfoundation.com/community-care/chai-masti-centres.html

Dignity Foundation Office
Savio Villa, 78/4 Divya Nagar, Wanawadi, Pune 411045
Contact Number: 30439190
Centre Timings: Mon-Wed-Fri 4.30pm-6pm
Aundh Enrichment Centre
# 8, 'Ashirvad',
Baner Park Society, Opp. Clarion Park,Near Telephone Exchange, Aundh, Pune 411 007
Coordinator: Payal: 93710 25500
Centre Timings: 4.30 P.M to 6.00 P.M (Mon-Wed-Fri)

http://www.dignityfoundation.com/volunteer-with-us.html

खुप दिवसांपासुन मला ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र या धरतीवर काही तरी सुरु करायची इच्छा आहे. त्यात, हास्यक्लब,ज्येष्ठांना सोसवतील असे छोटे व्यायामप्रकार,योगासनं,प्राणायाम तसेच लायब्ररी, कधीतरी एखादी छोटीसी पिकनिक अशा गोष्टींचा अंतर्भाव असेल.>.>>>>>>>>व्वा! छान कल्पना आहे. खूप खूप खूप शुभेच्छा! Happy

नेरुळ सिवुड्स स्टेशन (पुर्व) समोरच्या बागेत एक जेविके आहे. तिथे भेट देऊन या म्हणजे काय असावे आणि काय नसावे दोन्हीचा बोध होईल Happy

तुम्ही कोणत्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद सदस्य आहात का? किंवा तुमच्या परिचयात असे कोणी सदस्य किंवा ज्येना संघाचे पदाधिकारी आहेत का? त्यांना याबद्दल काही माहिती आहे का? ज्या भागात तुम्हाला असे विरंगुळा केंद्र सुरु करायचे मनात आहे त्या भागातील किंवा वॉर्डातील नगरसेवक तुमच्या परिचयात आहेत का? नसतील तर त्यांच्याशी जरूर ओळख करून घ्या. शहरात जिथे विरंगुळा केंद्रे चालतात तिथे त्या ठिकाणचे कामकाज कसे चालते, ते कोण बघते, त्यासाठी मनुष्यबळ व अर्थबळ कसे लागते, कोणते अनुदान मिळते का, याबद्दलची माहितीही जरूर घ्या. जनरली पालिकेच्या उद्यानांमधून अशी विरंगुळा केंद्रे उभारलेली दिसतात. त्यांसाठी अर्थसाहाय्य कोण करते, नंतर त्यांचे कामकाज कोण बघते ही माहितीही उपयुक्त ठरेल. क्लब हाऊसेस असलेल्या मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांच्या जागाही सोसायटीच्या परवानगीने यासाठी वापरता येऊ शकतात का, हे बघा.

योग प्रशिक्षकाची निवड : मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पूर्ण केलेले, पुरेसा अनुभव गाठीशी असलेले आणि मुख्य म्हणजे वृद्धांसंदर्भातील अनुभव असलेले योग प्रशिक्षक कधीही उत्तमच! कोणाची निवड करण्याअगोदर ते क्लास कसा कंडक्ट करतात हे बघणे, त्यांच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांकडून व ते ज्या ठिकाणी कामाला होते त्यांचेकडून त्यांच्या शिकवण्या विषयी फीडबॅक घेणे हेही श्रेयस्कर ठरते.

तुम्हाला खूप शुभेच्छा!

नेरुळ सिवुड्स स्टेशन (पुर्व) समोरच्या बागेत एक जेविके आहे. तिथे भेट देऊन या म्हणजे काय असावे आणि काय नसावे दोन्हीचा बोध होईल>>क्रुपया > अधिक माहिती लिहा

अगं प्रिती, मला अधिक माहिती नाहीय. मी फक्त बाहेरुनच बघितलंय हे केंद्र. बाहेरुन तरी चांगले वाटले .

ज्याला असे केंद्र चालु करण्यात रस आहे त्याने तिथे भेट दिल्यावर त्याला कळेल काय सोयी लागतात, त्याला त्यापैकी कुठल्या सोयी ठेवता येतील.

आणि तिथल्या जेनांना बोलते केल्यास अजुन कुठल्या सोयी हव्यात, उपलब्ध सोयीपैकी कुठल्या गैरसोयी आहेत, कुठल्या वापरल्याच जात नाहीत त्यामुळे नसल्या तरी चालतील, इत्यादी माहिती मिळेल.

खुप छान कल्पना आहे. मी अशाच एका संस्थेमधे काम करते. याची वेबसाईट http://www.opcseniorcenter.com
थोडक्यात सांगायचे तर या संस्थेत विरंगुळा म्हणुन... वेगवेगळे क्लासेस आहेत्...शिवणकाम, विणकाम, चित्रकला, लाकुडकाम, योगा, दागिणे बनवणे, सिरॅमिक ....... वेगवेगळे ग्रुप्स आहेत इंडियन, चायनिज, स्पॅनीश्, इटालियन.....तसेच Indoor चालण्यासाठी ट्रेक, स्विमींग पुल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, व्हॉली बॉल खेळायला कोर्ट आहे .... लहान मुलांचे डे-केअर असते तसे वॄध्दांचे डे-केअर आहे.....छोटे गिफ्ट शॉप आहे त्यात विवीध क्लासेस मधे केलेल्या वस्तु विकल्या जातात.... छोटी लायब्ररी आहे... पिकनीक तर असतातच पण मोठ मोठ्या टुर ही असतात. तसेच ईकडच्या मोठ्या हॉस्पिटलअची छोटी शाखाही आहे.... पण हे सर्व ईथे आहे...इकडच्या लोकांसाठी.
तुम्हाला इतके सर्व नाही पण यातील काही गोष्टी नक्कीच करता येतील. तुमची कल्पना खरच खुप छान आहे.
वर अकु ने छान सुचवले आहे.
लोकांच्या गरजा लक्षात घेउन त्याप्रमाणे तुम्हाला ठरवता येईल कि नक्कि तुमच्या विरंगुळा केंद्रात तुम्हाला काय काय ठेवता येईल.
बैठे खेळ खेळता येतील अशी ३-४ टेबल, खुर्च्या...पत्ते, कॅरम्,बुद्धीबळ..
योगा शिकवण्यासाठी शिक्षक लागेलच. पण प्रथमोपचारासाठी एखादी नर्स पण असावी...कारण अचानक कुणाला गरज पडु शकते.
प्रवेशपत्रात आजाराच्या माहिती बरोबर ते काय काय औषधे घेतात हे पण असेल तर उत्तमच!
खेळ, लायब्ररी बरोबरच... चर्चासत्रे ,मन मोकळे करता येतील असे ग्रुप्स, बुद्धीला चालना मिळेल असे खेळ असेही आयोजीत करावेत.
लोकांच्या कलेला चालना देण्यासाठी स्पर्धा, प्रदर्शन,भजनीमंडळ, असे अनेक गोष्टी करता येतील.
यासाठी जागा, व्हॉलेंन्टीअर्,भरपुर पैसा मात्र हवा.
तुमच्या ह्या उपक्रमासाठी खुप शुभेच्छा!

खुप छान उपक्रम. मनापासून शुभेच्छा.
सभासद नोंदणी करताना, त्यांनी आयूष्यात काय काम केले ? काय छंद जोपासले ? ते अवश्य नोंदवा.
त्या विषयावर त्यांना बोलायची / इतरांना मार्गदर्शन करायची ईच्छा आहे का, तेही नोंदवून ठेवा.

आणि मग त्यांची नियमित व्याख्याने ठेवा. सभासद नसलेल्या लोकांना आमंत्रण द्या. त्यांच्या अनुभवाचा / मार्गदर्शनाचा फायदा समाजाला मिळेल व त्यांनाही छान वाटेल.

सर्वांचे मनःपुर्वक आभार!! Happy
अकु, नाही हो मी कुठल्याही ज्येनासं ची सभासद नाही. पण रोज संध्या. घरी जातांना दिसणारे एकाकी लाचार वृद्धांना बघुन त्यांच्यासाठी काही तरी करावे अशी इच्छा होत होती.

विद्याक, तुमचं काम ग्रेट आहे!! Happy पण हे खुप मोठ्या प्रमाणावर झालं. एकंदरीत या गोष्टींसाठी अजुन स्वयंसेवकांची गरज लागेल. खरं सांगायचं तर, मला अगदी कॉलनी लेव्हलपासुन छोटीशी सुरवात करायचीये.

इदं न मम,

तुमची ही नवीन पोस्ट वाचुन मनात खूप काही आलं, फार चांगले विचार आहेत . . . .

पण वेळ घालवु नका . . . . संध्या घरी जातांना ह्या सर्वांशी हळु-हळु संवाद साधा, ओळखी करुन घ्या, त्यांना आवडेल अश्याच विषयांवर बोला, गप्पा मारा, हळु- हळु हे सर्व तुम ची वाट पहायला लागतील, जवळ पासचा एखादा पार्क वगैरे असेल तर तिथे एकत्र बसुन बोला, मधे-मधे घरुन काही त्यांना आवडणारे पदार्थ बनवुन घेऊन जात जा, बाकिचे सर्व काही सुरळित होऊन जाईल . . . .

सुरुवात करा ! इदं न मम , शुभस्य शिघ्रम || सुरु करुन पहाच . . . .

@इदं न मम : पटवर्धनबाग, एरंडवणे येथे असलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा पत्ता, फोन नंबर मिळाला आहे. त्यांच्याकडे प्रत्यक्ष चौकशी करून, त्यांना भेट देऊन तुम्हाला बरीच माहिती मिळू शकेल.

हा त्यांचा पत्ता :

एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था,
'विरंगुळा केंद्र', डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी उद्यान, पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे ४११००४.
कार्यालयीन वेळ : सोम ते शुक्र सायं ५ ते ७.
फोन क्रमांक : ०२० २५४५१८६५.

अध्यक्ष : श्री दिगंबर दैठणकर : ९४२१००६६२५.

कार्याध्यक्ष : श्री मधुकर शिधये : ९८५०९५८६१५.

कार्यवाह : श्री श्रीकांत पुराणिक : ९७६३७०१४९४.

अरुंधतीने दिलेल्या ठिकाणी नक्की चौकशी करा. मी तिथे कायम आनंदी आजी आजोबांना बघितले आहे. Happy ती बागही मस्तय! बेस्ट लक.