शुगरफ्री टॅब्लेटस..........

Submitted by मानुषी on 23 May, 2013 - 01:09

माझे एक खूप जवळचे नातेवाईक वय ५६.......डायबेटिस आहे. पथ्य बर्‍यापैकी सांभाळतात. थोडाफार व्यायामही करतात. हे स्वता: खूपच ओव्हरवेट होते. पण आता डायबेटिसमुळे आणि पथ्यामुळे थोडे बारीक झालेत.
पण दिवसात शुगरफ्री टॅब्लेट्स जवळजवळ १० तरी घेतात. कधी चहातून कधी दुधातून.
तर या टेब्लेट्स किती घ्याव्यात याचे काही प्रमाण आहे का? याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का? कारण त्यांच्याबरोबर त्यांची बायकोही याच गोळ्या चहातून घेते.........साखरेऐवजी. ही खूपच ओव्हरवेट आहे पण हिला डायबेटिस नाही.
सर्वांची आणि तज्ञांची मते जाणून घ्यायला आवडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त चहा मधुन घ्यावी. पण दिवसाला ३/४ पेक्षा जास्त नको. बंद करता आल्यास उत्तम. बाकी doctor सांगतील तसे. इतर लोकांच्या सल्यापेक्षा त्यांचा सल्ला चांगला मानावा.:-)

डॉ. साती यांनी त्या घेऊ नयेत असे मत दिले होते. ( सविस्तर पोस्ट येईलच ) मी काही दिवस त्या वापरल्या. नंतर
साखरेशिवायच ( म्हणजे शुगर फ्री शिवाय ) प्यायची सवय केली. आता अजिबात फरक जाणवत नाही.
मला वाटतं, जिभेपेक्षा मनावर ताबा ठेवणे कठीण जात असावे.

जिभेपेक्षा मनावर ताबा ठेवणे कठीण जात असावे. + १.
त्या टॅब्लेटसने कॅन्सर होतो असं वाचलंय मी कुठेतरी खखोडॉजा.

या टॅबलेटस अजिबात घेऊ नयेत असे बर्‍याच जणांनी सांगितले आहे. या गोळ्या कशापासून बनतात. बेस कांय आहे हे तपासून घ्यायला हवे.

http://www.medimanage.com/my-weight/articles/artificial-sweeteners-sugar...

सगळे डॉक्टर्स या गोळ्यांच्या कंटेंट्सची माहिती घेतात की नाही देव जाणे.. माझ्या आईला डायबेटीस तज्ञांनी (modern medicine prctnr) शुगर फ्री गोळ्या आहार नेमून देतांना रिकमेंड केल्या होत्या. आईला गोड 'हवंच' असं नसल्याने आम्ही त्या घेतल्या नाहीत. Happy

दिनेशदा,अगदी बरोबर.
मनावर ताबा उत्तम!

शुगर फ्री हा एक ब्रँड आहे . मूळात हे शुगर सबस्टीट्यूट्स आहेत . ज्याना आर्टिफिशीयल स्वीटनर म्हणतात. यात अनेक प्रकार आहेत. भारतात शुगर फ्री ब्रँडने मिळणार्या सबस्टिट्यूट्मध्ये निग्लिजीबल कॅलरीज आहेत.
अद्याप अशा सबस्टीट्यूट्सने कँसर होतोच असा डेफिनाईट पुरावा नाही.
फार पूर्वी सॅकॅरीनमुळे प्रयोगशाळेतील उंदरांना ब्लॅडर कँसर होतो असा एक स्टडी झाला होता. त्यावेळेस काही दिवस सेकॅरिनच्या पाकिटावर कार्सिनोजेनिक असे लिहिणे बंधनकारक होते. पण नंतर तो स्टडी तेवढा वॅलीड नसल्याचे दिसल्यावर सॅकॅरीनवरचे ते लेबलही गेले.
तरिही माझ्यामते शुगर सबस्टिट्यूट घेऊ नयेच . कारण आपण साखर खात नाही आहोत असा विचार करत लोक जे गोड पदार्थ खातात त्यातील इतर घटकांमुळे कार्ब्ज आणि फॅटस वाढतात. संजीव कपूर वैगेरे खाना खजाना वैगेरेंच्या डायट एपिसोडात बिना साखरेची तांदळाची खीर, रसगुल्ले इ. शुगर फ्री घालून करतात तो शुद्ध वेडेपणा आहे.
तांदूळ, खवा पनीर सगळ्यातून साखर वाढते.
मानुषी, आपल्या मा बो वर रमा (मा बो आयडी )नावाच्या खूप चांगल्या डॉक्टर आणि डाएटिशीयन आहेत. त्यानी १-२ वर्शांपुर्वी इथे आर्टीफिशीयल स्वीटनरवर खूप चांगली माहिती लिहिली होती. पण कुठे ते आठवत नाही. लिंक मिळाल्यावर देईन.

धन्यवाद साती,

फक्त एक दुरुस्ती मी डॉ. नाहि, फार्मसिस्ट आहे.

साती ह्यांनि उल्लेख केलाय ती पोस्ट इथे चिकटवतेय.

आता थोड आर्टिफिशिअल स्वीटनर्स बद्दलः
आपलि साधि साखर (table sugar) हि glucose and fructose ह्या दोन प्रकारच्या साखरेच्या रेणुंनि बनलेलि असते (disaccharide). हे दोन रेणु एकमेकांना ज्या chemical bond ने जोडलेले असतात तो एका विशिष्ट जागी असतो आणि शरीरातिल वितंचके (enzymes) तो bond तोडुन हे दोन रेणु मोकळे करतात जेणे करुन त्यांचे शोषण (absorption) व्हावे. Artificial sweetners (non nutritive sweetners) मध्ये हा chemical bond नेहमिपेक्षा वेगळ्या जागि असतो त्यामुळे शरीरातिल वितंचके तो तोडु शकत नाहित परिणामि ह्या रेणुंच शरीरात पोषण होत नाहि ते जसेच्या तसे बाहेर टाकण्यासाठी मोठ्या आतड्याकडे पाठवले जातात. उदाहरण म्हणुन फिरकिने उघडणार्या मोत्यांच्या बांगडिची कल्पना करा. ह्या बांगडीला काटकोनात एक स्कृ असतो जो तुम्हाला एका हाताने सहज उघडता/बंद करता येतो हाच स्कृ जर मी मोत्यांच्या आकारात आणि रंगात असायला हवा अस सांगुन बाकिच्या मोत्यांच्या मध्ये दडवण्याची व्यवस्था केलि आणि तुम्हाला तस न सांगता फक्त बांगडि उघडायला सांगितल तर तुम्हाला ते जमणार नाहि आणि बांगडि घालता येणार नाहि तसच काहिस.

आपल्या शरीरात अन्नसेवनाच्या अनुषंगाने तीन हॉर्मोन्स काम करतात, ghrelin, insulin and leptin. भुक लागलि किंवा एखाद्या आवडत्या पदार्थाचि आठवण आलि कि पोटातुन जे आवाज येतात तेंव्हा ghrelin आपल्या जठरात सोडला जातो. ghrelin सोडला जात असतानाच आता अन्न मिळणार आहे ह्या कल्पनेने insulin पण थोड्या प्रमाणात स्वादुपिंडातुन सोडला जातो जस जस आपण अन्न खावु तस तस insulin च रक्तातल प्रमाण वाढायला लागत, ते एका विशिस्।ट पातळिपर्यंत पोहोचल कि leptin secretion stimulate होत. ज्यामुळे पोट भरल आहे (शरीराच काम सुरळित पणे चालण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात ग्लुकोज रक्तात मिसळल आहे) (हि ग्लुकोज ची पातळि मेंटेन करणे हे इन्सुलिन च मुख्य काम) हा संदेश मेंदुला दिला जातो.

आर्टिफिशिअल स्वीटनर्स च सेवन केल असता हि चेन तुटते म्हणजे इन्सुलिन आणि परिणामी लेप्टिन च सिक्रिशन होत नाहि. विशेषत: नुसतिच कॉफि किंवा डायट सोडा प्यायला तर. हे जर सातत्याने होत राहिल तर पुढे साखर जरी खाल्लि तरी इन्सुलिन नंतर लेप्टिन सिक्रिशन होत नाहि परिणामि खुप खाल्ल जात कारण ती तृप्ति (satiation) मिळत नाहि.

हे स्वाटनर्स मुख्यत: डायबेटिक्/प्रिडायबेटिक लोकांसाठी विकसित करण्यात आले. ह्या विकारात वरिल हॉर्मोन श्रुंखला हि आधिच तुटलेलि/ विस्कळित झालेलि असते. हे लोक कॅलरीज पेक्षा कार्ब्स ला सेन्सेटिव्ह असतात. अगदि थोड्या प्रमाणात कार्ब्स शरीरात गेले तरी अश्या लोकांच्या शरीर्आत खुप ज्यास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रिट केल्या जाते ज्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणुन ह्यांच्या शरीरात इन्सुलिन हळुहळु आणि स्टेडि रेट ने स्त्रवण आवश्यक असत ते करण्यात हे आर्टिफिशल स्वीटनर्स मदत करतात.
णोर्मल लोकांमध्ये हे शरीर स्वतः करत डायबेटिक लोकांमध्ये मात्र हे शरीराला करता येत नाहि म्हणुन बाहेरुन मदत करावी लागते. एक टिस्पुन साखरेमध्ये ३० कॅलरीज आणि ३० ग्रॅ. कार्ब्स असतात एक टिस्पुन साखरे ऐवजी असे स्वीटनर्स वापरुन रक्तातलि इन्सुलिन ची पातळि स्टेबल करता येउ शकते.

वर म्हंटल्याप्रमाणे नॉर्मल लोकांसाठी ह्या स्वीटनर्स चा अपाय उपायापेक्षा ज्यास्त असतो. तुम्हि एक टिस्पुन साखर न खाल्ल्याने ३० कॅलरीज वाचवाल पण त्यामुळे लेप्टिन न स्त्रवल्यामुळे नंतर कितितरी ज्यास्त खाल (binge eating). शिवाय ह्यातल्या काहि स्वीटनर्स च सातत्याने सेवन आणि कँसर अस कोरिलेशन काहि रिसर्चर्स नी दाखवल आहे त्यावर अजुन ज्यास्त अभ्यास होण्याची गरज आहे पण विनाकारण आणि प्रमाणाबाहेर सेवन करण्यासाठी हे पदार्थ नाहि एवढा बोध त्यातुन सहज घेतला जाउ शकतो. ज्यांना पर्याय नाहि (माझ्यासारखे लोक) त्यांच ठिक आहे पण ज्यांना आहे त्यांनि ह्याचा जरूर विचार करावा.

मी वरील पोस्ट साधारण ३/३.५ वर्षांपुर्वी लिहली होती, तेन्व्हा मी आहारशास्त्राची विद्यार्थीनि नव्हते, आता हे म्हणुन मला आहारशास्त्रातील शोधनिबंध नियमीत वाचता येवु शकतात. तिथुन मिळालेल्या माहितीच्या आधारे खालिल पुरवणी वरच्या पोस्ट साठी.

Acceptable Daily Intake Values (ADI) for non nutritive sweetners:

Saccharine: 2.5 mg/Kg of body weight
Aspartem: 50 mg/Kg of body weight
Acesulfame-K: 15mg/Kg of body weight
Sucralose: 15mg/Kg of body weight

* ADI values for apartem and Acesulfame-K are FDA approved and ADI values for saccharine and Sucralose are approved by United Nations Joint FAO/WHO Expert Committee on Food Additives (JECFA).

वा रमा. खुप छान समजावलं.
स्टीव्हीया बद्दल काही अद्यावत माहिती मिळू शकेल का ?

साती, रमा,
उत्तम व योग्य माहिती. अभिनंदन (रमा यांची पोस्ट आठवून उल्लेखिल्याबद्दल साती यांचे) व अनुमोदन, धन्यवाद! (अन अभिनंदनही, रमा यांचे, शास्त्रीय किचकट माहिती सोपी करून लिहिल्याबद्दल.)

धन्यवाद इब्लिस आणि दिनेशदा.

दिनेशदा, स्टेविआ मधुमेहासाठी हव आहे का? हि लिंक वाचा.

http://www.diabetes.org/living-with-diabetes/treatment-and-care/ask-the-...

धनश्री, स्प्लेंडा हे ब्रँड नेम पण रासायनिक दॄष्ट्या ते sucralose आहे (वरती उल्लेख केलाय त्याचा) ते भारतात नक्कि मिळत असणार पण स्प्लेंडा हा ब्रँड भारतात विकला जातो का त्याबद्दल मला कल्पना नाहि.

धन्यवाद रमा.
प्रतिदिन Sucralose: 15mg/Kg of body weight इतकी स्पेंडा चालू शकते असं मानायचं का??

मी खूप गोडखाऊ आहे. तेव्हा जाडी कमी करण्यासाठी स्पेंडाला स्विच करायचा विचार करते आहे. Happy

धनश्री सातीची पोस्ट वाच. तुला कळॅल शुगर फ्री वापरून गोड खाल्लं तर काय होतं ते.
ईट्स आबाउट अदर फॅट्स दॅट यु वोन्ट अवॉईड एनीवे.

साती आणि रमा................विशेष धन्यवाद!
काय होतं की ज्याला आधीच खूप गोड आवडतं त्याला जर डायबेटिस डिटेक्ट झाला तर त्यांचं आधी मॉरलच खचत असावं. त्यात आता जर कुणी या शगरफ्रीही घेऊ नका त्या हार्मफुल आहेत असं सांगितलं तर ते हर्ट होण्याची शक्यता. म्हणून तुम्ही तुमच्या डॉ. ना विचारा असं सुचवलं तरी डॉ. वरील सर्व मुद्दे .....शुगरफ्री घेण्यातले.....क्लिअर करतील की नाही माहिती नाही.
हे जे शुगर फ्री घेतात ते डॉ.च्या सांगण्यावरूनच. पण ते ज्या प्रमाणात घेतात ते मला लिमिटच्याही पलिकडले वाटले. असो........खूप छान समजावून सांगितलेत रमा आणि साती.
पाहू ............हे सगळं मला या माझ्या नातेवाइकांशी बोलता येतं का! कारण मला त्यांचे ते गोळ्या घेणं (संख्या) बघून काळजी वाटायला लागली.