कावळा

Submitted by कावळा on 20 May, 2013 - 03:26

कावळा

पृच्छतो माझा मला गोतावळा
कोणत्या रानातला मी कावळा

खूण आहे गाठ आहे बांधली
ढील द्या कोणास कोणा आवळा

साठल्या अंगामधे नाना कळा
अन जमेना वेश करणे बावळा

शोक माझा कृष्णवर्णाचा बघुन
हासला वीटेवरीचा सावळा

नासीकेसम्मूख हल्ली चालतो
रोज भलभलत्या दिशेला का वळा

-कावळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच की हो कावळे दादा Happy

सावळा खासच आवडला

दुसर्‍या शेरात "आहे" २ दा आले त्यातले एकावेळचे नक्कीच कमी करता येईल बघा !

'नासीकेसम्मुख'मधे १ मात्रा गड्बडली की काय Uhoh

तखल्लुसाचा अतीशय तल्लख वापर : "का वळा ? " ... मस्तच !! Happy