Submitted by कावळा on 20 May, 2013 - 03:26
कावळा
पृच्छतो माझा मला गोतावळा
कोणत्या रानातला मी कावळा
खूण आहे गाठ आहे बांधली
ढील द्या कोणास कोणा आवळा
साठल्या अंगामधे नाना कळा
अन जमेना वेश करणे बावळा
शोक माझा कृष्णवर्णाचा बघुन
हासला वीटेवरीचा सावळा
नासीकेसम्मूख हल्ली चालतो
रोज भलभलत्या दिशेला का वळा
-कावळा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरी आहे पण दोनवेळा काव काव
बरी आहे
पण दोनवेळा काव काव केली !
हल्ली प्रोफेसर कम कर्दनकाळ कम
हल्ली प्रोफेसर कम कर्दनकाळ कम _____ कम ______ दिसत नाहीत
उदय राव गझल कशी वाटली ते वदा
उदय राव गझल कशी वाटली ते वदा पहीले
कर्दनकाळाची आठव्ण जरुर ठेवा !
आपल्याला कविताच कळत नाही गझल
आपल्याला कविताच कळत नाही गझल काय ...कळणार....?
.
तरीही वाचायला छान आहे....
मस्तच की हो कावळे दादा सावळा
मस्तच की हो कावळे दादा
सावळा खासच आवडला
दुसर्या शेरात "आहे" २ दा आले त्यातले एकावेळचे नक्कीच कमी करता येईल बघा !
'नासीकेसम्मुख'मधे १ मात्रा गड्बडली की काय
तखल्लुसाचा अतीशय तल्लख वापर : "का वळा ? " ... मस्तच !!
आपल्याला कविताच कळत नाही गझल
आपल्याला कविताच कळत नाही गझल काय ...कळणार....?
.
तरीही वाचायला छान आहे....
सेम हिअर!