रिमोट

Submitted by निलेश बामणे on 17 May, 2013 - 03:54

रिमोट
आज कित्येक वर्षानंतर जेंव्हा मी
माझ्यातील मलाच शोधण्याचा प्रयत्न करतो,
तेंव्हा माझ्या लक्षात येत माझ्यातील मी हारवलाय
माझ्यातील मी खरच हारवलाय की हारलाय
स्वतःच स्वतः भोवती निर्माण केलेल्या शत्रूंशी लढता लढता......
कसा होतो मी नाजुक पण धीट,
हसरा ,अल्लड , विनोदी आणि आज कसा आहे ?
भित्रा, चिंताग्रस्त, वैतागलेला, रागावलेला
आणि त्रासलेला स्वतःलाच नव्हे तर जगालाही ....
आज गोठ्या खेळायच म्हटल तर माझा नेम लागत नाही,
बॅट हातात धरताही येत नाही.
पतंग कशी उडवायची तोही आता आठवत नाही.

रिमोट
आज कित्येक वर्षानंतर जेंव्हा मी
माझ्यातील मलाच शोधण्याचा प्रयत्न करतो,
तेंव्हा माझ्या लक्षात येत माझ्यातील मी हारवलाय
माझ्यातील मी खरच हारवलाय की हारलाय
स्वतःच स्वतः भोवती निर्माण केलेल्या शत्रूंशी लढता लढता......
कसा होतो मी नाजुक पण धीट,
हसरा ,अल्लड , विनोदी आणि आज कसा आहे ?
भित्रा, चिंताग्रस्त, वैतागलेला, रागावलेला
आणि त्रासलेला स्वतःलाच नव्हे तर जगालाही ....
आज गोठ्या खेळायच म्हटल तर माझा नेम लागत नाही,
बॅट हातात धरताही येत नाही.
पतंग कशी उडवायची तोही आता आठवत नाही.
पत्ते ते तर कित्येक वर्षे हाती घेतलेच नाहीत.
पावसात मनमुराद भिजल्याचही हल्ली आठवत नाही...
गेल्या कित्येक वर्षापासून मनमुराद हसलो नाही,
बागडलो नाही, धावलो नाही की नाचलो नाही
कारण एकच स्वतःच स्वतःला घातलेली बंधने....
किती धाडसी होतो मी लहानपणी
मी लहानपणी केलेल्या मारामार्याी आठवून आजही
ह्सतो स्वतःवर आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो
त्या मारामार्याण करणारा तो मिच होतो का ?
मी लहानपणी वाघ होतो मग माझी शेळी कोणी केली ?
पहिलीला शाळेत असताना सूटा-बुटात जायचो
तेंव्हा इतरांकडे जे नव्ह्त ते सारच माझ्याकडे जास्त होत.
तेंव्हा कित्येकांना माझा हेवा वाटायचा
तेंव्हा त्या वयातही मी छाती फुगवून चालायचो...
पण ! पुढे कित्येक वर्षे शाळेत अनवाणी चालल्यावर
कदाचित माझ्यातील वाघाची शेळी झाली असावी....
हुशार असतानाही वर्गात मागच्या बाकावर बसायचो,
हुशार असूनही हुशारी दडवायचो
अभ्यास न करताही परिक्षेत पास व्हायचो
चित्रकार होण्याच स्वप्न पाहायचो
पण ! माझ्याच जिवनात रंग भरायला विसरायचो.
रंगाचा आणि माझ्या जिवनाचा ताल-मेल कधी बसलाच नाही....
माझा जन्म का झाला असावा ?
हे मला आणि जगालाही न उलगडलेल कोड ,
इतर लोक जन्माला येऊन जे करतात
त्यातील आंम्ही बरच काही केलच नाही
म्हणून असेल कदाचित....
ज्ञान मिळविण्याची माझी प्रचंड इच्छा होती.
पण ! तेथे लक्ष्मी आडवी आली
आणि जेंव्हा आंम्ही लक्ष्मीच्या मागे लागलो
तेंव्हा सरस्वतीकडे पाट फिरवावी लागली.
सरस्वती आणि लक्ष्मी यांच्यासोबत
आंम्ही खो – खो खेळत राहिलो.
तो खेळ आजही सुरू आहे....
प्रेमात पडायालाही एक वय असत
अस आज आंम्हाला वाटत
पण ! आंम्ही वयाच्या दहाव्याच वर्षीच प्रेमात पडलो
त्यानंतर प्रेमात पडण आमच्या निशिबी आल ते कायमचच
अगदी निवडणूकीत सतत परभव स्विकारणार्याि त्या राजकारण्यांसाराख
ते प्रमात पडण आजही सूरू आहे.
प्रेमात कोणी तरी आंम्हाला धोका दिला
अस जगाला वाटत असल तरी
खरे दगेबाज आंम्हीच होतो.
त्यांचा आमच्यावरील प्रेम लक्षात येऊनही
आम्ही ते आमच्या लक्षात न आल्याच नाटक
बेमालुमपणे वटवत राहिलो.
अगदि आजही वटवतोय .....
वयाच्या पंदराव्या वर्षी मी माझी पहिली कविता लिहली
काय लिहल होत ते ही आता आठवत नाही
पण ! ते कवी व्हाव म्ह्णून नक्कीिच नाही
तर ! तिला लिहलेल्या प्रेमपत्रात तिच्यावर आपण स्वतः
लिहलेली कविता असावी म्ह्णून......
आज व्हॅलेन्टाईन डेला माझा किंचित विरोध असला
तरी तेंव्हा तिच्या सोबत व्हॅलेन्टाईन डे चे ग्रिटींग विकत घेऊन
तिला न देता तिच्या समोरच फाडालय विनाकारण....कित्येकदा...
त्यांच्यापैकी एकीवर तरी माझ खर प्रेम होत का ?
की माझ फक्तक माझ्यावर आणि माझ्या ध्येयावर प्रेम होत.
त्या माझ्यावर कालही प्रेम करत होत्या आजही करतात
आणि भविष्यातही करत राहतील.
पण ! माझ्या ज्या स्वप्नांसाठी त्यांनी
त्यांच्या स्वप्नांचा त्याग केला
ती स्वप्ने मी पूर्ण केली का?
हा प्रश्न स्वतःला विचारून
मी स्वतःवरच हसतोय...वेड्यागत....
माझा जन्म त्यागासाठी झालाय
हे आता मी मान्य केलय म्हणूनच
आता मला त्याग करण्याची सवयच जडलेय
परिणामांचा फायद्या तोट्याचा विचार न करता
एखाद्या साधूसारखी...
त्यामुळे कित्येक जण मला विनोदाने म्हणतात
तू साधू का होत नाहीस ?
साधू मी झालोही असतो
पण...निसर्गातील सौंदर्य नजरेत भरून घेण्याची
माझी हौस अजूनही फिटली नाही.
माणसात राहून माणंसांसाठी काही तरी
खास करण्याची नशा अजून उतरलीच नाही.
माझ्या सभोवतालची लोक मला आता
त्यांच्यातीलच एक समजत नाहीत
कारण ते जेथे विचार करण थांबवतात
तेथून माझ विचार करण सूरू होत
आणि त्या विचार करण्यातूनच जन्म होतो
माझ्या एखाद्या नवीन कथेचा अथवा लेखाचा...
माझ्या सभोवतालच्या लोकांकडे पाहिल्यावर
कित्येकदा मला हसाव की रडाव तेच कळत नाही
कारण आज ते सारच स्वतःच्या सोयीनुसार बदलू पाहता आहेत
अगदी धर्म, संस्कृती,संस्कार आनि नैतिकतेचे नियमही....
परिक्षेला जाताना मी कधीच ना देवाच्या
ना इतर कोणाच्या पाया पडलो.
रस्त्याने चालताना दिसणार्या सर्व देवांना मी
हात जोडून नमस्कार करतो
पण ! देऊळात सहसा जात नाही
बर्याोचदा कोणाच्यातरी आग्रहाखातरच देऊळात गेलोय..
घरातील देव पुजा आमच्या खात्यात
कधी आलीच नाही...नशीब आमच....
माझ्या आयुष्यात जे घडलय ,
जे घडतय अथवा जे घडणार आहे त्यासाठी मी
देवाला कधी गृहीत धरणारच नाही
कारण तस न धरणारेच देवाच कार्य करीत असता... निस्वार्थपणे
माझ्या जिवनाची दिशा ठरलेय मी नाही ठरवली...
इतरांपेक्षा ती नक्कीठच निराळी आहे किंचित विचित्रही....
एखादा भावनाप्रधान चित्रपट पाहताना
मला माझे अश्रू आवरता येत नाहीत
हे मी भावूक असल्याच लक्षण
पण ! माझे ते अश्रू मी कोणाला दिसुच देत नाही
माझा आवाज वाघाच्या डरकाळीसारखा
माझे डोळे जणू आगीचे गोळे.
बर्याडच जणांना वाटत मला हृद्यच नाही
असल तरी ते नक्कीच पाषाणाच असणार ....
काही लोकाना मी साधा-भोळाही वाटतो
म्हणून ते माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात
आणि स्वतःचीच फसवणूक करूण घेतात.
माझ्या जीभेवर सरस्वती वास करत असावी..
कारण माझ्या वाणीच्या प्रेमात कित्येकजण पडतात.
मी मात्र कोणाच्या वाणीला भुलत नाही
माझ्या समोरच्याची वाणी हे
माझ्यासाठी त्याच प्रतिबिंब असत..
कोणासाठीही मी माझ्या विचारांशी तडजोड करीत नाही
सार्यांीनाच वाटत मी त्यांच ऐकतो
पण !त्यातील मला ह्वं तेवढच मी मेंदूत साठवतो....
माझ्या मेंदूची चावी कधीच कोणाला सापडणार नाही
कारण माझ्या निर्मात्याने ती स्वतःक्डेच ठेवून घेतलेय
मला काय करायचय हे मी कधीच ठरवल नाही
ते अपोआपच ठरत गेल म्हणून मी लेखक कसा झालो ?
हे कोड आजही कित्येकांना उलगडत नाही...अगदी मलाही...
कोणीतरी मला सह्ज विचारल होत तुला मोठेपणी कोण व्हायचय ?
अगदी नकळ्त माझ्या तोंडून सहज निघून गेल मला लेखक व्हायचय..
त्यामुळे माझ्या जीभेवर तीळ तर नाही ना ?
अशी शंका माझ्या मनात निर्माण होते...
इतरांपेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळ आहे
हे मला सतत जाणवत असत पण काय ते मात्र कळ्त नाही
ते जर कळल असत तर माझा शोध संपला असता.
अगीदी माझ्या जन्मदात्या आईवडिलांनाही वाटत
तस जीवन मी जगू शक्त नाही
तस जगायच मी ठरवल तरी ते शक्यव होणार नाही
कारण माझा रिमोट त्या निर्मात्याच्याच हातात आहे......
कवी- निलेश बामणे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users