रात्र पाऊस पाऊस

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

अश्या कोंदटल्या राती
टपकत्या मेघांसवे
मन मोकळे करावे
घ्यावी वाटून आसवे

ओला बधीर गारवा
घ्यावा वेढून जरासा
गोठाव्यात संवेदना
थोडा मिळावा दिलासा

झिरपत्या पाण्यासंगे
मातीमध्ये मिसळावे
सल खोल उरातले
कधी कुणा ना कळावे

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://roopavali.blogspot.com)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

व्वाह!!!!

झिरपत्या पाण्यासंगे
मातीमध्ये मिसळावे
सल खोल उरातले
कधी कुणा ना कळावे<<<< टू गूड!

अमित, मुक्तेश्वर .... धन्यवाद! Happy

शशांक... काही हरकत नाही. त्यानिमित्ताने मला तुमची ही कविता वाचण्याची संधी मिळाली.

वा: छान!!
मला ही कविता वाचुन गारवा अल्बम मधील गाणे आठवले--
'पाऊस दाटलेला, माझ्या मनातला हा
दारास भास आता, हळुवार पावलांचा.....,पाऊस दाटलेला...'

Pages