मोह

Submitted by समीर चव्हाण on 15 May, 2013 - 02:28

रात्र होता आस बांधत स्वप्नतारा चमकतो ना
गंधवाही कल्पनांचा सोनचाफा उमलतो ना

एक वेडा रात्रभर का चाळतो पाने वहीची
अर्थ त्याच्या आवडीचा मग पहाटे गवसतो ना

घर कसे ओसाड वाटे, फार त्याची याद दाटे
चेहरा त्याचा मला अपरोक्ष त्याच्या रडवतो ना

मी किती ठरवून बघतो, हृदयही काढून बघतो
मोह होतो आंधळा की वाट कोणी उजळतो ना

प्रहर आहे जायचा अन ऐकते कोठे मुळी मन
राहिला मक्ता `समिर' जो कागदावर उतरतो ना

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ek vedaa raatrabhar ka...

>> wwaahh... Affaat aavadlaay ha sher...

'Cheharaa aparoksh' ha sudha...

Avantar: paroksh means drushtiaad, aparoksh means najaresamor asa vachalyacha aathavtay.. cbdg..

सगळ्यांचे आभार.

मुक्तेश्वरजी, आपण म्हणताय ते पटतेय.

धन्यवाद, आनंदयात्री.
आपण म्हणताय ते बरोबर आहे.
शब्दकोशीय अर्थ नजरेसमोर.
दृष्टीआड चुकीचा मात्र रूढ अर्थ आहे. खाप्रेंच्या शब्दकोशात संदर्भ मिळतो.
शेर लिहिल्यानंतर हे लक्षात आले.
शेर पोहोचला ही सुखद गोष्ट आहे.

धन्यवाद.

मी किती ठरवून बघतो, हृदयही काढून बघतो
मोह होतो आंधळा की वाट कोणी उजळतो ना

वा, हा विशेष आवडला