Yes, I can!!!!!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

निषाद ला ताय क्वॉन डो नामक कोरियन मार्शल आर्ट्स च्या ATA (American Tae-kwon-do Association) च्या नुकत्याच झालेल्या 'फॉल नॅशनल्समधे' 'स्पारिंग' आणि 'फॉर्म' ह्या दोन गटात पहिलं बक्षिस मिळालं. (ह्या दोनच गटात त्याने भाग घेतला होता.) अमेरिकेतल्या सगळ्या राज्यातली ATA मेंबर असलेली मुलं ह्यात भाग घेण्यासाठी येतात. आणि निषादचं स्पारिंग म्हणजे माझा जीव खालीवर होतो. ह्यावेळी त्याच्या दुप्पट आकाराच्या मुलाशी त्याने स्पार केलं आणि पहिलं पारितोषिक मिळवताच मी फक्त बालकनीतून खाली उडी मारायची बाकी राहीले होते. दर वेळी वर्गाच्या सुरुवातीला "येस आय कॅन!!" म्हणणार्‍या माझ्या पिल्लाने ऐनवेळी स्वतःला ह्या स्पर्धेसाठी रजिस्टर करून 'मी खरंच करु शकतो' हे पटवून दिलं.
formaayboli-2.jpgformaayboli.jpg

विषय: 
प्रकार: 

owww Happy U Must be Sooo Proud !!
कसले मस्त वाटले असेल ना !! अभिनन्दन अन शाब्बासकी सांग निषाद ला!! Happy

हे छानच!! अभिनंदन दोघांचे.
किती वर्षांचा आहे तो?

सही!! अभिनंदन!!

अभिनंदन, निषादच आणि तुझही... किप इट अप..

wow!! अभिनंदन!
(मृ, दुसरा फोटो खाली टाक ना, शेजारी नको.)

भले! शाब्बास!!
keep it up..

धन्यवाद! धन्यवाद!!
त्याला सांगीतलं की खूप आनंद होईल.
डिसेंबर मधे १३ चा होईल.
..............
लाडु हाणावे, चकल्या हाणाव्या, कानोला उदरी भरावा I
ओला टॉवेल गावला नाही तर तिलापिया तळून खावा II Proud

सहीच! अभिनंदन ग निषादचे आणि तुमचे दोघांचे पण.
कीप इट अप.

वा! वा! अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. मुलांना असल्या activities मधे घालताना आईवडिलांचं किती रक्त आटतं याची हळूहळू कल्पना येतेय Happy

मृण्मयी, तुझे आणि तुझ्या लेकाचे अभिनंदन गं!!
लाडू, चकल्या, कानोले पार्टी म्हणून पाठवून दे! Wink

मृ, तुझे आणि निषादचे अभिनंदन Happy मस्तच !!!

सहीच! निषादचे अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन!! Happy

थँक्यु !! लोकहो, you have made his day!!!
स्वारी खुपच खुश होणार हे मेसेजेस वाचून दाखवल्यावर!

simply superb.. निषादचे आणि त्याच्या आईबाबांचे हार्दिक अभिनंदन... आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याला खूप सार्‍या शुभेच्छा..

मृ,

सहीच...लेकाचं आणि तुझंही अभिनंदन..

अरे व्वा ! सहीच.... निषादचं अभिनंदन...

btw, 'निषाद' या शब्दाचा काय अर्थ आहे?

अभिनंदनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

निषाद : स्वर 'नि'. एक आणखी अर्थ 'शिकारी' Happy

शोनू, अगदी बरोबर! आपली पण टाइम कमिटमेंट असते. (त्याच्या नादाने मी पण शिकायला लागले.) जोवर तो स्वतः हे एन्जॉय करतोय तोवर आम्ही 'टॅक्सी सर्व्हिसेस' देणार! Happy

..............
लाडु हाणावे, चकल्या हाणाव्या, कानोला उदरी भरावा I
ओला टॉवेल गावला नाही तर तिलापिया तळून खावा II Proud

वॉव, सहीच. अभिनंदन निषाद चं आणि तुमचंही. त्याला प्रोत्साहन देऊन करायला भाग पाडल्याबद्दल.

अरे वा!! निषादचं हार्दिक अभिनंदन!!

>>त्याच्या नादाने मी पण शिकायला लागले.)
आणि तुलाही लवकरच पदक मिळो ह्या शुभेच्छा Lol

अभिनंदन निषाद आणि मृ तुझे पण...
- अनिलभाई

अभिनंदन मृण्मयी!

पुढच्या वेळी आणखी जोरदार स्पर्धकांना हरवावे अशा शुभेच्छा! (फक्त स्पर्धा तळमजल्यावरच घ्या असे सांग त्यांना Proud )

जबरी रे .... अभिनंदन निषादचं!

परागकण

निषाद म्हणातोय "Thank you very much!"

फारेंडा, स्पर्धा तळमजल्यावरच होत्या. पण बघणार्‍यांना तिथे प्रवेश नव्हता. आम्ही बाल्कन्यांत बसून बघितलं.

समीर, मी पुढल्या वर्षी भाग घेईन म्हणते. चांगली दणादणा प्रॅक्टिस करून.. Proud

निषादचे व तुमचेहि अभिनंदन. निषादच्या बाबांचा कसा उल्लेख नाही?

त्याच्या नादाने मी पण शिकायला लागले.
हे सांगितलेत हे बरे केलेत. आता तुमच्याबद्दल लिहीताना लोक जरा जपूनच लिहीतील!

निषाद आणी त्याच्या आई बाबांच अभिनंदन!

Pages