व्हेरिएशन ऑन अ थीम - ग्रॅड स्टूडंट रेसिपीने दोडका + सुकट

Submitted by मेधा on 10 May, 2013 - 12:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मध्यम आकाराचे कोवळे दोडके , साल काढून १ सेंटीमीटर चे क्यूब्स केलेले
एक मोठा कांदा बारीक चिरून
एक रोमा / प्लम टॉमेटो बारिक चिरून
दोन पाकळी लसूण + अर्धा इंच आले बारीक चिरून
दोन टी स्पून मालवणी मसाला
एक छोटी वाटी सुकट , २-३ वेळा स्वच्छ धूऊन , कोमट पाण्यात बुडवून ठेवणे १०-१५ मिनिटे
हिरवी मिरची, मोहरी , जिरे हळद, तिखट, तेल, मीठ

क्रमवार पाककृती: 

इकडे शिकत असताना कांदा , आले लसूण, टॉमेटो परतायचे त्यात हाताशी असेल तो मसाला घालायचा अन हाताशी असतील त्या भाज्या जमतील तशा चिरुन त्यात घालायच्या अशी एक कॉमन ' ग्रॅड स्टूडंट' रेसिपी असायची. कांदा , आले लसूण, टॉमेटो काय क्रमाने अन किती पेशंसने परतलेत, मसाला कुठला यानुसार पदार्थाची चव दर वेळेस वेगळी लागायची . पण स्वैपाकातली गती किती , वेळ किती , सामानसुमान किती , इंटरेस्ट किती ,या सर्व बाबी विचारात घेता , होम कूक्ड हेच त्या भाजीचं व्यवच्छेदक लक्षण असायचं. अजूनही बरेचदा त्या रेस्पीने एक दोन प्रकार होतात.

गेल्या महिन्यात मार्केट मधे चांगले मिळाले म्हणुन लागोपाठ दोन आठवडे दोडके आणले गेले. एकदा मुगाची डाळ + दगडू तेली मसाला घालून भाजी केली . परत तोच प्रकार नको म्हणून हे उपद्व्याप करुन पाहिले.

मोहरी , जिरं, हिरवी मिरचीची फोडणी करुन त्यावर कांदा परतून घ्यावा.
कांदा परतला की त्यात आले लसूण घालून परतावे.
आले लसणीचा कच्चट वास गेला की टॉमेटो घालावेत व २-३ मिनिटे परतून घ्यावे.
चिमूटभर हळद, १ चमचा तिखट, मालवणी मसाला घालून परतावे + दोडके घालावे व २-३ मिनिटे परतून घ्यावे.
स्वच्छ धुतलेली सुकट घालून चांगले मिसळून घ्यावे व गॅस मंद करुन झाकण ठेवून शिजू द्यावे. सुकट घातली असल्याने, त्या अंदाजाने मीठ घालावे.

वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
दोन जण
अधिक टिपा: 

ताजी, छोटी करंदी घालून पण मस्त लागेल ही भाजी.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> रॅड स्टूडंट' रेसिपी
Proud

मी 'भरले दोडके' करते. शिरा काढून छोटे तुकडे करून त्याला एका बाजूने चीर देते. मग त्यात तिखट,मीठ,गोडा आणि गरम मसाला घातलेलं दाण्याचं कूट भरते. फोडणीत कांदा आणि लसूण घालून त्यावर या फोडी. (टोमॅटो नाही यात आणि आलंही.) मूड असेल तर चिंचगूळ.

माशे घालायचे मला म्हैती न्हैत. Proud

मेधा सुकटीचा खमंग वास आला ग.

फक्त एक सुचवते माशांचे प्रकार असतील तेंव्हा राई-जिर्‍याची फोडणी नाही घालत आमच्याकडे. त्यामुळे भा़जी केल्यासारखी वाटते. शेवटी प्रत्येकाची आवड असते.

फक्त एक सुचवते माशांचे प्रकार असतील तेंव्हा राई-जिर्‍याची फोडणी नाही घालत आमच्याकडे. त्यामुळे भा़जी केल्यासारखी वाटते. शेवटी प्रत्येकाची आवड असते.>>>+१

जागू,
माहेरी माशांचे प्रकार अन भाज्यांचे प्रकार हे पूर्णपणे वेगळे असायचे.
सासरी मात्र ज्याच्यात्याच्यात कोलंबी, सोडे, सुकट घालतात Happy अंबाडी + मटण , दुधी भोपळा / कोहळा + खिमा असे प्रकार पण असतात.

त्यांच्या सर्व फोडण्यांमधे मोहरी + जिरं मस्ट असतंय.
आता एकदा मोहरी, जिरं न घालता करुन पाहीन