जेव्हा स्वतःला वाटते मी का बरे जगतो

Submitted by बेफ़िकीर on 6 May, 2013 - 07:14

जेव्हा स्वतःला वाटते मी का बरे जगतो
तेव्हा जगाला भासते की हा खरे जगतो

करतो मनोरंजन जगाचे आणि त्याचेही
प्रत्येकवेळी तो निराळे चेहरे जगतो

तू होउनी जगतो कधी मी होउनी जगतो
केव्हातरी अपुल्यातली मी अंतरे जगतो

माझ्या मनाच्या भूप्रदेशाची दया येते
नामानिराळा राहुनी नामांतरे जगतो

त्याच्या समाधीवर टिके टिच्चून आळंदी
जो आत केव्हापासुनी स्थित्यंतरे जगतो

प्रत्येकजण कोड्याप्रमाणे भासतो येथे
नसतात त्याचे प्रश्न ज्यांची उत्तरे जगतो

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू होउनी जगतो कधी मी होउनी जगतो
केव्हातरी अपुल्यातली मी अंतरे जगतो

त्याच्या समाधीवर टिके टिच्चून आळंदी
जो आत केव्हापासुनी स्थित्यंतरे जगतो

प्रत्येकजण कोड्याप्रमाणे भासतो येथे
नसतात त्याचे प्रश्न ज्यांची उत्तरे जगतो

>>>

छान!

भुप्रदेश, शेर आवडला पण तो शब्द नाही आवडला.

मतल्यात खूप मजा आली. आळंदीचाही फार छान झाला आहे. नामांतराच्या शेरात फारसे काही मिळाले नाही किंवा भावला नाही ..भिडला नाही ...असे म्हण्ता येईल

बाकी सर्व शेर आवडले

(जरासा आगाऊपणा: केव्हातरी हा शब्द जरा अगदीच अनिवार्य अगदीच चपखल नाही वाटला मला त्यात केव्हातरी हा शब्द बदलता येईल असे वाटले 'कधी कधी मी असेही करतो की आपल्यातली अंतरे जगतो' असे म्हणायचे असल्यासारखे पण तसे चट्कन माझ्यापर्यंत पोचत नसल्यासारखे जाणवले )

टीप :"चला... पर्यायी करायला चाण्स मिळाला !! "...असा गैरसमज संबंधितांनी करून घेवू नये अशी सख्त ताकीद देत आहोत .

प्रत्येकजण कोड्याप्रमाणे भासतो येथे
नसतात त्याचे प्रश्न ज्यांची उत्तरे जगतो

विशेष आवडला.
बाकी सर्वच चांगले. Happy

>>
तू होउनी जगतो कधी मी होउनी जगतो
केव्हातरी अपुल्यातली मी अंतरे जगतो

त्याच्या समाधीवर टिके टिच्चून आळंदी
जो आत केव्हापासुनी स्थित्यंतरे जगतो

प्रत्येकजण कोड्याप्रमाणे भासतो येथे
नसतात त्याचे प्रश्न ज्यांची उत्तरे जगतो
<<

वा! आवडली गझल. Happy

भन्नाट आवडली गझल

तू होउनी जगतो कधी मी होउनी जगतो
केव्हातरी अपुल्यातली मी अंतरे जगतो....हासिल-ए-गझल !

धन्यवाद!

त्याच्या समाधीवर टिके टिच्चून आळंदी
जो आत केव्हापासुनी स्थित्यंतरे जगतो ... छान आहे.

करतो मनोरंजन जगाचे आणि त्याचेही
प्रत्येकवेळी तो निराळे चेहरे जगतो ... चांगला, यावरून गजलुमियांचा एक शेर आठवला

आनंदले पाहून कोणी एवढे माझ्याकडे
हातातल्या पानांमधे जोकर मिळाल्यासारखे .. इति गजलुमियां
( तसा काहीच संबंध नाही तुमच्या शेराशी पण आठवला, आणि आपला एखादा शेर आठवला की लिहायची पध्दत असते )

आपला एखादा शेर आठवला की लिहायची पध्दत असते<<< १००% मान्य
मीही असेच करतो बगा अगदी

मियाजी येवूद्यात तुमची एखादी गझल आता बरेच दिवस झाले तुम्हाला वाचून .................. .:)

टुनटुन मी अजिबातच जाणकार नाहीये गझलेतली.<<<

किती ते खोटं बोलशील
मी पाहिलय तू कधीकधी गझलविषयक असे काही मौलिक प्रतिसाद देतेस की साक्षात देवसरानाही कित्येकदा चुप्प बसावे लागले आहे ...मी पाहिलय ना ....मला माहीत आहे .....
Wink

अरे देवा वैवकु??????????
कधी कुठे ते तरी सांगा !
आता प्रतिसाद देताना विचार करायला लागणारेय आधीच लोकं मला डुआय वगैरे समजतात Uhoh

आठव आठव रिया... समस्त मराठी गझलविश्वाला पडलेला गझलेच्या चिंताजनक सद्यस्थितीबाबतच्घा अत्यंत गंभीर प्रश्नजो तू देवसराना विचारला होतास ..............

>>>>>>>>>>>>>>""तुम्हाला मायबोलीचा पत्ता कुणी दिला हो ????"""<<<<<<<<<<<

Happy