डायरी !

Submitted by आनंद पेंढारकर on 4 May, 2013 - 09:28

एक जुनी कविता......

तू म्हणायचीस
टाक फाडून
माझ्या उल्लेखाचं पान
तुझ्या डायरीतलं.....
आणि काल कधी नव्हे ते
तुझं म्हणणं मी मनावर घेतलं.......

पण आज.....
आज माझ्या डायरीत
एकही पान नाही उरलेलं
कारण प्रत्येक पानाच्या
प्रत्येक ओळीत
नाव तुझंच होतं
ठळकपणे कोरलेलं.....
नाव तुझंच होतं
ठळकपणे कोरलेलं.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

जुनी आहे हे आधीच सांगीतलेत हे एक बरे केलेत

अनेक महान कवींच्या सुरुवातीच्या दिवसातल्या रचनाही बर्‍याचदा कमी दर्जेदार आढळतात त्यामुळे मग मला जास्त वाईट वाटले नाही

(फक्त सांगायची बाब हीच की आपल्याकडून मायबोलीकरांच्या अपेक्षा किती हाय आहेत ते !!)

असो
पुलेशु

~वैवकु
Happy