Submitted by आनंद पेंढारकर on 4 May, 2013 - 09:28
एक जुनी कविता......
तू म्हणायचीस
टाक फाडून
माझ्या उल्लेखाचं पान
तुझ्या डायरीतलं.....
आणि काल कधी नव्हे ते
तुझं म्हणणं मी मनावर घेतलं.......
पण आज.....
आज माझ्या डायरीत
एकही पान नाही उरलेलं
कारण प्रत्येक पानाच्या
प्रत्येक ओळीत
नाव तुझंच होतं
ठळकपणे कोरलेलं.....
नाव तुझंच होतं
ठळकपणे कोरलेलं.....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
गाडी सुरु केली आणि लगेच बंद
गाडी सुरु केली आणि लगेच बंद पडली असे वाटले. मस्त आहे कविता ...
जुनी आहे हे आधीच सांगीतलेत हे
जुनी आहे हे आधीच सांगीतलेत हे एक बरे केलेत
अनेक महान कवींच्या सुरुवातीच्या दिवसातल्या रचनाही बर्याचदा कमी दर्जेदार आढळतात त्यामुळे मग मला जास्त वाईट वाटले नाही
(फक्त सांगायची बाब हीच की आपल्याकडून मायबोलीकरांच्या अपेक्षा किती हाय आहेत ते !!)
असो
पुलेशु
~वैवकु
सुंदर ...
सुंदर ...
मस्तय. अगदी थोडक्यात पण जबरी.
मस्तय. अगदी थोडक्यात पण जबरी.