फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"...निकाल

Submitted by उदयन.. on 4 May, 2013 - 00:38

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मे" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे " खेळ मांडला "

"ए आई, मी बाहेर जाऊ का खेळायला. आत्ता तर अभ्यास पण नाही. मस्त सुट्टी लागलीय ना?"
"अरे, नको रे आता बाहेर ऊन आहे. संध्याकाळी जा बाहेर खेळायला, तो पर्यंत घरातच काहितरी खेळा"
"चला रे, आपण नवा व्यापार, सागरगोट्या, भातुकली खेळुया."

शाळा संपली, परीक्षेचा निकाल लागला आणि मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. आता फक्त दे धम्माल. मे महिन्याची सुट्टी आणि खेळ याच्याशी आपल्या सर्वांच्या

काही ना काही आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांनाच पुन्हा एकदा उजाळा द्यायचा आहे "खेळ मांडला..." या फोटो थीमद्वारे. Happy

यात खेळांचे प्रचि अपेक्षित आहे. उदा. चोरपोलिस, नवा व्यापार, सागरगोटे, बुद्धीबळ, सापशिडी, भातुकली, आट्यापाट्या, विटीदांडू, काचाकवड्या, कॅरम, शेजार्‍यांचा डोळा चुकवून कैर्‍या, आंबे, करवंदे लंपास करतानाचे फोटो. इतकेच काय तर अगदी मंगळागौरीच्या, गणपती/गौरी सणांच्या दिवशीच्या खेळांचे फोटो सुद्धा चालतील.

जुने विस्मरणात गेलेल्या खेळांचे फोटो असतील तर अधिक चांगले.

चला तर मग ह्या नविन थीमद्वारे तुमच्यातील लहान मुलांना पुन्हा एकदा खेळण्यास प्रवृत्त करा. Happy

निकाल :-

प्रथम क्रमांक :- आशुचँप - पहिल्या पावसातली होडी

ashuchamp 1st.JPG

द्वितीय क्रमांक :- रंगासेठ - घोडा गाडी

ranga seth 2nd.JPG

तृतीय क्रमांक :- इन्ना ..

innaa 3rd.JPG

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी".

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी भातूकलीचा खेळ आमच्याकडे क्वचीत जत्रेत वगैरे यायचे नाहीतर खेळायला फुकट गेलेल्या डब्या, त्यांची झाकण नाहीतर मातीची स्वतः केलेली भांडी असे प्रकार करावे लागत. तेंव्हा तांब्या-पितळेची भांडी तर फारच महाग वाटायची अजूनही वाटतातच. माझी मोठी मुलगी श्रावणी वर्षाची झाली तेंव्हा तिच्या आजीने तिच्यासाठी अष्टविनायकच्या यात्रेतून येताना काही तांब्या-पितळेची भांडी आणली. माझ्या आईने सावंत वाडीवरून काही लाकडी खेळणी आणली होती. २ वर्षे ती तिच्याबरोबर भरपूर खेळली. नंतर तिला नविन खेळण्यांची माहीती झाली तशी ही भांडी बंद पडली. आता सध्या मॉल मधल्या बारबीच्या वेगवेगळ्या प्रकारांची तिला ओढ लागली आहे.
ही काही जूनी खेळणी आज ह्या धाग्याच्या निमित्ताने पोतडीतून बाहेर पडली आणि बिचार्‍यांनी स्वच्छ होऊन आनंदाचा मोकळा श्वास सोडला.

हा रेड्यासोबत पाण्यात सफारीचा खेळ कसा वाटला?

भांडी कसली क्यूट आहेत! बंब आणि चिनीमातीची लोणच्याची बरणी फारच आवडली. फोटोसाठी चिंचेनी घासून लखालख केलेली वाटतात. भांड्यांचा रॅकपण खेळण्यातला आहे? खूपच गोड!

जागूचा भातुकलीचा फोटो कसला गोड आहे. तो बंब किती छान बनवलाय. सुनिधीला सध्या सावंतवाडीची खेळणी खेळायला दिलीत. माझ्याकडे माझ्या आज्जीच्या भातुकलीमधलं एक छोटं पातेलं आलंय. त्यामधे एका कपाचा चहा व्यवस्थित होतो म्हणून मुद्दाम आणलंय मी. कोठीतून काढायला हवं ते पातेलं.

दुसरा फोटो बघून काही स्मृती उफाळल्या Proud

माझ्याकडे माझ्या आज्जीच्या भातुकलीमधलं एक छोटं पातेलं आलंय >>
बापरे, इतक्या जुन्या वस्तु जपल्या आहेस. सहीच है!!

व्वा! पहिला फोटो आधि दिसलाच नव्हता, कस्ला क्युट आलाय! Happy
दुसरा अपेक्षित होता नम्बरमधे.
इन्नाचा फोटोही मस्त!
विजेत्यान्चे अन सहभागी सर्व स्पर्धकान्चे हार्दीक अभिनन्दन

विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.

रंगासेठ यांच्या फोटॉचा नंबर येणार हे आधीच माहित होतं ना? Happy

आशुचॅम्पचा फोटो फार क्युट आहे.

इन्नाचा फोटो पण आवडला होताच.

जजेसचे मनोगत देखील अवश्य अपडेट करा.

सध्या जजेस बिइझी असल्याने................ मनोगत स्वतःच टाकतील त्याच प्रमाणे उत्तेजनार्थ फोटो देखील स्वतःच टाकतील......

अरे आमचे कुठे आभार मानतात.....उलट आम्हीच तुमचे आभार मानतो ...तुमचे अप्रतिम फोटो इथे दिल्याबद्दल

अरे वा...प्रथम क्रमांक....
पुन्हा एकदा जोरदार सुखद धक्का....

जजेसना खूप खूप धन्यवाद

सध्या जजेस बिइझी असल्याने................ मनोगत स्वतःच टाकतील त्याच प्रमाणे उत्तेजनार्थ फोटो देखील स्वतःच टाकतील......>>>>>>> जजेस विसरले काय Happy

Pages