फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"...निकाल

Submitted by उदयन.. on 4 May, 2013 - 00:38

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मे" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे " खेळ मांडला "

"ए आई, मी बाहेर जाऊ का खेळायला. आत्ता तर अभ्यास पण नाही. मस्त सुट्टी लागलीय ना?"
"अरे, नको रे आता बाहेर ऊन आहे. संध्याकाळी जा बाहेर खेळायला, तो पर्यंत घरातच काहितरी खेळा"
"चला रे, आपण नवा व्यापार, सागरगोट्या, भातुकली खेळुया."

शाळा संपली, परीक्षेचा निकाल लागला आणि मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. आता फक्त दे धम्माल. मे महिन्याची सुट्टी आणि खेळ याच्याशी आपल्या सर्वांच्या

काही ना काही आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांनाच पुन्हा एकदा उजाळा द्यायचा आहे "खेळ मांडला..." या फोटो थीमद्वारे. Happy

यात खेळांचे प्रचि अपेक्षित आहे. उदा. चोरपोलिस, नवा व्यापार, सागरगोटे, बुद्धीबळ, सापशिडी, भातुकली, आट्यापाट्या, विटीदांडू, काचाकवड्या, कॅरम, शेजार्‍यांचा डोळा चुकवून कैर्‍या, आंबे, करवंदे लंपास करतानाचे फोटो. इतकेच काय तर अगदी मंगळागौरीच्या, गणपती/गौरी सणांच्या दिवशीच्या खेळांचे फोटो सुद्धा चालतील.

जुने विस्मरणात गेलेल्या खेळांचे फोटो असतील तर अधिक चांगले.

चला तर मग ह्या नविन थीमद्वारे तुमच्यातील लहान मुलांना पुन्हा एकदा खेळण्यास प्रवृत्त करा. Happy

निकाल :-

प्रथम क्रमांक :- आशुचँप - पहिल्या पावसातली होडी

ashuchamp 1st.JPG

द्वितीय क्रमांक :- रंगासेठ - घोडा गाडी

ranga seth 2nd.JPG

तृतीय क्रमांक :- इन्ना ..

innaa 3rd.JPG

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी".

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लिंबूटिंबू / आशुचँप Happy पहिला फोटो टोप-संभापूर (कोल्हापूर) वॉटरपार्क मधील आहे आणि दुसरा काशीद बीच वरचा.

ही माझ्या मामाची मुलं भारी मस्तीखोर
पण जाम क्युट आहेत Happy
DSCN0282.JPG

पण मस्ती कधी- कधी खुप त्रासदायक ठरते की आम्हाला असं कराव लागत Proud

DSC00729_0.JPG

लेकीने मांडलेली भातुकली Happy

bhatukli.jpg

हा खेळ किती जणांना माहितीये? नाव, गाव, फळ,फुल असेच नाव आहे याचे.
४-५ जणात मजा येते खेळायला. एका अक्षरावरून सुरूवात होणारे नाव, गाव, रंग, पक्षी, प्राणी लिहित जायचे. ज्याचे सगळ्यात पहिले लिहून होईल त्याने स्टॉप म्हणायचे. मग समान नावं आली तर ५ मार्क आणि वेगळं नाव लिहिलं असेल तर १० मार्क. असा हा बैठा खेळ खूप वर्षांनी खेळलो परवा.

rsz_1img_1463.jpg

टीग्गरबिल्ला अस काहीतरी म्हणतात त्याला आमच्याकडे … लहानपणी जाम खेळलोय …. मज्जा असायची …. हा फोटोवरून घेतलेला फोटो म्हणून जर ब्लर आलाय ……

मलाही फोटोच मिळत नाहीत.

पूर्वी मे महिन्याची सुट्टी पडली की गल्लोगली मुलांचा दंगा असायचा. क्रिकेट, बॅड्मिंटन पासुन लगोरी, आबादुबी (प्लास्टीकचा बॉल एकमेकांना मारणे) असे अतरंगी खेळ असायचे. मोठ्यांनी दम दिला की कुठे तरी निवांत कोपर्‍यात कॅरम, पत्ते, व्यापार असे खेळ रंगायचे.
आता तर गल्ल्या, मैदाने गायब झालीत. चिल्लीपिल्ली पण क्लासेस, समर कॅम्प, कार्टून्स मध्ये गुंतलीत. नाही म्हणायला कॉम्प्युटरवरचे खेळ आहेतच, पण सगळ्यांनाच ते जमत नाहीत, आवडत नाहीत.
एक खेळ मात्र लहान-थोरांना टाईमपासाचे साधन आहे. अगदी ऑफिसात पण कंटाळा आला की खेळता येतो. Happy

त. टी. : हे प्र.चि. स्पर्धेसाठी नाही.

मलाही फोटोच मिळत नाहीत. <<<<< अनुमोदन>> +१.
आणि आता घरी काढले असते पणं अपलोडिन्ग करणे वै बोम्ब.
घरी नेट नाहिये.

कन्या वय वर्षे १ असताना हा तिचा रोजचाचं खेळ देव पळवणे आणि खेळत बसणे, माझी अत्यातर लहानपणी देवचोरायची आणि शेजारच्यांच्या चुलीत नेऊन टाकायची

Dev palavne.JPG

केदार, पहिला फोटो एकदम खास. स्पर्धेच्या विषयात सर्वात फिट्ट बसतोय - ज्याने हा सर्व खेळ मांडलाय त्याचेच खेळणे केलय की तिने! कसला निरागसपणा आहे ! बालपण असेच असते.

माधव, अनुमोदन Happy
विनार्च, छान.
जिप्सी/इन्द्रा, पान्ढरे चौकोन छानेत! Proud
झकोबा, गेला आख्खा महिना काय करीत होतास? तरी बर तुझ्याकडे लहान मुले आहेत Angry

गोव्यातली मौजमजा.....ही धमाल किमान एकदा तरी अनुभवणे आवश्यक आहे....

आणि ही तर प्रत्येकाने अनुभवली असेलच..पहिल्या पावसातली पाण्यातल्या होड्या सोडण्याची

Pages