अपरिचित, पण अफलातून - ‘कांब्रे लेणी’

Submitted by Discoverसह्याद्री on 1 May, 2013 - 11:31

सह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा! कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा!

...एका वीकएण्डला बाईक अन् कॅमेरा घेऊन पुण्याच्या पश्चिमेला ‘आंदर’मावळात उंडारत होतो. ‘कांब्रे’ गावाजवळ उभ्या कातळकड्यातल्या काही गुहांनी आमचं लक्ष वेधून घेतलं होतं. घरी आल्यावर सरकारी गॅझेटिअर, संदर्भ पुस्तकं अन् ब्लॉग्ज ढुंडाळले. पण या गुहांचा उल्लेख सापडला नाही. (महत्त्वाचा अपडेट::: भटकंतीच्या वेळी अन् लेख प्रसिद्ध करताना आधीच्या संशोधनाबद्दल कल्पना नव्हती. अर्थात, आम्ही “New to the World” असं काही तरी शोधलं, असा दावा कधीच नाहीये.. आधी केल्या गेलेल्या संशोधनाची माहिती या लेखाच्या शेवटी अपडेट केली आहे. ती अवश्य वाचा.) या गुहा नैसर्गिक की मानवनिर्मित, या कुतुहलापोटी मी अन् माझा मित्र अभिजीत देसले परत एकदा पोहोचलो कांब्रे गावात. गावामागच्या डोंगररांगेतली कातळभिंत लक्षवेधक होती.
01_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG
त्यावरून कोसळणा-या धबधब्यांच्या जागा टाळून, कोरलेल्या गुहा स्पष्ट दिसत होत्या. धबधब्यांच्या ‘ढोल-ताश्या’मुळे उमटलेल्या रौद्र खुणा बघता, बरसणा-या जलधारांमध्ये इकडे लेण्यांकडे फिरकणं केवळ अशक्य! गावक-यांनी सल्ला दिला, "आरं पोरांन्नू, कुठं तरास घ्येता जीवाला. वाटेत आहे ह्यो थोरला खडक. त्यो नाही रं जमायचा तुम्हास्नी. काल रातच्या पाऊसानं वल्ला झाला असेल खडक. आता बगा, वाट दावायला पन नाही यायचं कुनी.." मग वाट नीट विचारून, लेण्यांपाशी पोहोचायचा प्रयत्न करायचं ठरवलं.
02_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG
रानात शिरलो, अन् लक्षावधी टप्पोरी करवंदं, जांभळं अन् कै-यांनी आमचं शाही स्वागत केलं.. अहाहा!!! रानमेव्याचा आस्वाद घेताना खरंतर विसरूनंच गेलो, की आपण लेणी शोधायला आलोय. मग उन्हानं अन् हवेतल्या आर्द्रतेमुळे घाम-घाम होवू लागला, तसं पावलं उचलावी लागली.
03_KambreCaves_DiscoverSahyadri.jpg

गावातून निघाल्यापासून दाट झाडीतून वाट काढत वीसेक मिनिटं चढल्यावर, मुख्य लेणी आता उजवीकडे माथ्यावर आली.
04_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG05_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG06_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG07_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG
पण तिथे पोहोचण्याची वाट कशी असेल, याचा अंदाज येईना. वाट अडवली होती ३०-४० फुटी रॉकपॅचनं. रॉकपॅच चढताना दृष्टीभय नसलं, तरी सुरुवातीला आधारासाठी ‘होल्ड्स’ नाहीतंच. हाताच्या बळावर स्वतःला ओढून, पुढं आधार मिळवण्याकरता केलेले सारे 'अंगविक्षेप' साफ फसले. पायातल्या ‘शूज’वरचा विश्वास उडला. हृदयाची धडधड वाढली. शेवटी नैसर्गिक, पण विश्वासार्ह पकड देणा-या अनवाणी पायांनिशी प्रयत्न सुरू. एकदम गुळगुळीत ‘पींच-होल्ड’वर शरीर तोलत डोंबार-कसरत करत अखेरीस रॉकपॅचच्या माथ्यावर पोहोचलो. एकंदर अनुभव खरोखरंच थरारक!
08_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG09_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG

उजवीकडे गेल्यावर आधी एक तपकिरी रंगाच्या पाण्यानं भरलेलं उघडं टाकं, अन् पुढं कातळामध्ये खोलवर खोदत नेलेली २ मोठ्ठाली कोरडी टाकी दिसली.
10_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG11_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG12_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG13_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG14_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG15_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG
आम्ही उभे होतो ती सपाटी आणि मुख्य लेणी यांच्यादरम्यान कोसळला होता एक सरळसोट, बाहेर डोकावणारा, १५० फूट उंच कातळकडा. मुख्य लेणी गाठण्यासाठी एखाद्या निसरड्या-अरुंद-आडव्या पावठीवरून हा कडा पार करायची गरजंच नाही. कारण, इथे आहे एक अनपेक्षीत, अनोखं आश्चर्य – चक्क त्या कड्याच्या पोटातून कोरलेला १५ फूट लांबीचा बोगदा!
16_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG17_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG18_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG19_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG20_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG
बोगद्यातून किंचित वाकून जात, आम्ही सहजंच पोहोचलो थेट मुख्य लेण्यांच्या दालनात. लेणी खोदवणा-या अभियंत्याच्या कौशल्यानं आम्ही खुळावलोच!!! मुख्य लेण्यांत आतल्या बाजूस एक निवासी गुहा अन् त्याच्या दोहों बाजूस मोठ्ठाली खोलवर कोरलेली कोरडी टाकी होती. दर्शनी भागातल्या अंगणावर ‘सारीपाट’ खेळाचा आराखडा होता, तर बाजूचं धान्य दळण्याचं उखळ वैशिष्ट्यपूर्ण होतं. पिण्याचं पाणी आजमितीला उपलब्ध नाही. लेण्यांची कड्याकडची बाहेरील बाजू नंतरच्या काळात विटांचं बांधकाम करून बंद केलेलं दिसतं.
21_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG22_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG23_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG24_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG25_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG
विचारात पडलो, की कांब्रे गावच्या या लेण्यांचं प्रयोजन काय असावं. लेण्यामध्ये एखादा शिलालेख, कुठली शिल्पं अथवा स्तूप असं काहीच आढळलं नाही, त्यामुळे लेणी खोदण्याच्या काळाबद्दल अनुमान काढणं अवघड आहे. इथून जवळंच ‘कुसूरघाट’ नावाची कोकणातलं कर्जत अन् घाटावरचं तळेगाव जोडणारी पुरातन व्यापारी वाट होती. या मार्गावर विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी ही लेणी कोरलेली असू शकतील. वाट तितकी महत्त्वाची नाही, म्हणून लेणीसुद्धा दुर्लक्षित राहिली असावीत.
गुहेबाहेर एक अफलातून निसर्गदृश्य सामोरं आलं. सह्याद्रीच्या माथ्यापाशी मॉन्सूनच्या ढगांनी ढुशा द्यायला सुरुवात केली होती. ठोकळवाडी धरण, मागं आडव्या पसरलेल्या कुंडेश्वर रांगेवरच्या पवनचक्क्या, इतकंच काय आश्चर्य म्हणजे दूरवर भीमाशंकरच्या पल्याडचा सिद्धगडसुद्धा स्पष्ट दिसत होता. प्रसन्न करणारं दृश्य!!
26_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG

कांब्रे गावात उतरताना मन विलक्षण प्रसन्न झालं होतं. फारसं कोणालाच परिचित नसलेल्या दुर्लक्षित लेण्याच्या वेध घेणं, तिथे अफलातून कोरीव बोगदा अन् लेणी सामोरा येणं, हा सुखद धक्काच होता. खरंच - आपल्या सह्याद्रीनं दुर्ग-लेणी-घाट-जंगलं-मंदिरं अशी कितीतरी रत्नं जपली आहेत. गरज आहे, फक्त तुमच्या-आमच्यासारख्या रसिकांनी ती रत्नं शोधून काढायची अन् त्यांना अग्गदी मनापासनं दाद द्यायची!!!
27_KambreCaves_DiscoverSahyadri.JPGविशेष टीप: कांब्रे लेण्यांचा रॉकपॅच ‘किंचित अवघड’ श्रेणीचा आहे. दोराशिवाय रॉकपॅच चढणं अशक्य नसलं, तरी अगदी सोप्पंही नाही. त्यामुळे लेण्यांना फक्त अनुभवी ट्रेकर्सनीच भेट द्यावी.

 स्थळ: http://wikimapia.org/20116432/Kambre-Caves
 जावे कसे: जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरून कान्हे फाटा – टाकवे – वडेश्वर - कांब्रे असा २५ कि.मी. रस्ता
 परिसर: आंध्रा-ठोकळवाडी जलाशय, बोरवलीचे अंजनीमाता मंदिर, टाकवे-वडेश्वरचे धबधबे, कांब्रे गावचा अफलातून धबधबा, कुसूर-खांडी गावांपाशी कोकण दर्शन
 खाद्य, प्रवास, पाणी, इंधन: सर्व व्यवस्था स्वतः करावी.
 सुयोग्य काळ: पावसाळा टाळून कधीही.

- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)
- छायाचित्रे: अभिजीत देसले, साईप्रकाश बेलसरे

परिसर:
28_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG29_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG30_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG31_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG32_KambreCaves_DiscoverSahyadri.jpg33_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG34_KambreCaves_DiscoverSahyadri.jpg35_KambreCaves_DiscoverSahyadri.JPG

----------------------------------------------------------------------------------------------------

लेख प्रसिद्ध केल्यानंतरचे Updates::::::

लेख काही तज्ज्ञ अभ्यासकांपर्यंत पोहोचला, तो असा....
वरदा -> लेण्यांमधल्या तज्ज्ञ डॉ. मंजिरी भालेराव -> या लेण्यांवर ज्यांनी २००३ मध्ये काम केलंय ते डॉ. श्रीकांत प्रधान -> सायली पलांडे – दातार यांच्यापर्यंत! त्यांच्याकडून मिळालेली माहिती::::

>> Dr. Shriikant Pradhaan
या लेणी अपरिचित नाहीत....काम्ब्रे लेणी आणि जवळच असलेल्या उक्सण येथील लेणी; या दोन लेणींवर २००३ मध्ये ISPQS तिरुपतीला आम्ही शोध निबंध सदर केला आहे. तसेच या लेणींवर दैनिक 'सामना'रविवार दिनाक २४ ओगस्ट २००३ मध्ये लेखही प्रसिद्ध झाला आहे.
(ISPQS - Indian Society for Prehistoric and Quaternary Studies ही भारतातील एक आर्किऑलॉजिस्ट्सनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. त्यांचं दरवर्षीचं सेमिनार हे भारतातलं आर्किऑलॉजिस्ट्सचं सग्ळ्यात मोठं सेमिनार असतं)
हा त्या सामना तील लेखाचा फोटो

>> सायली पलांडे – दातार
यांनी जानेवारी २०१३ ला अधिक संशोधन करून, वरच्या बाजूस अजून लेण्यांना भेट दिली, ज्यात त्यांना जुनी सुतार कामाची हत्यारं सापडली. वाचा त्यांच्याच शब्दात:
"We had carried out thorough documentation of these caves in Jan 2013. Tumhi jya mothya lenit gelat tyachya warati ajun ek lenyachi maal ahe ... arthat rope shivaya jata yenar nahi.. mothya lenyachya davya bajula hi ek chaukoni inaccessible lena ahe... tyat amhala kahi lakadi vastu milalelya ahet... mukhyata juni sutaranchi hatyaare ahet... khupach interesting hote te... waril leninchi rachna (talavinyas) hi khalil lenyanpeksha thodi wegli ahe....tasech agadi warati mathyawar panyachi taki ahet... pudhchya weles janar asal tar bagha nakki..."

----------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन Happy

पण, डॉ. प्रधानांच्या संशोधनाची माहिती नसताना ही लेणी धुंडाळण्याचा सणसणीत आनंद अन् अनुभव नक्कीच मिळालाय>> हा आनंदच खरा!! त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही >>> +१

तिथे फारसं कुणी जात नाही म्हणूनच तिथे स्वच्छता दिसतेय. पण कुणीतरी आधीच जाऊन आलं आहे हे तिथे भिंतींवर असलेल्या खडू किंवा तत्सम पांढर्‍या रंगातील अक्षरांमुळे वाटतच होतं.

वा, अशा अनोळखी जागा शोधणारी तुमच्यासारखी मंडळी अगदी म्हणजे अगदी विरळाच - तुमच्या धाडसाचे मनापासून कौतुक व अभिनंदन.

<<< या लेण्यांबद्दल डॉ. प्रधानांनी २००३ मध्ये संशोधन आणि सादरीकरण/ प्रकाशन केलंय.

माझे मत,
ज्यांच्या मार्फत हि माहिती आमच्या पर्यन्त पोहचते तो त्याचा संशोधक !!!

भट्कंती साठी एक नविन पर्याय सुचवल्या बद्दल धन्यवाद...

discover सह्याद्री आणि वरदा झकास .ही लेणी बौध्द भिक्षुकांचे (हीनयान)पावसाळयात आराम करण्याचे विहार असावेत . आपण कर्जत - सांडशी -ढाक भैरि सुळक्याजवळून उजवीकडे वळल्यावर एक ओढा ओलांडून कोंडेश्वर मंदिरापाशी येतो .इथे जांभिवली गावात तळेगावची एसटी येते .हा टरेक मी केला आहे . इकडून कांब्रेकडे जाता येईल का ? रॉकपैच अवघड आहे तर थोडेफार जवळ जाऊन यायचा माझा विचार आहे . फोटो सुरेख आहेत ,लॉँग शॉटस् छान .ही जागा आणि करवंदाच्या जाळया बोलवत आहेत .

पण ही आराम करण्याची ठिकाणं एवढ्या अवघड ठिकाणी का बांधली / खोदली जात? तपश्चर्येसाठी असेल तर ठिक आहे की कुणी डिस्टर्ब करायला नको.

अजून एक कमाल वाटते की अश्या सरळसोट कातळावरुन जाऊन मधेच कुठेतरी दगड कोरुन रहाण्याजोगी दालनं बनवणे किती कठीण आहे! एकदम मोठ्या प्रमाणात दगड फोडायला सुरुंग वगैरे लावले जात असतील का? लावले असतील तरी नंतर एकदम ताशीव खोल्या तयार करणं, भुयार खणणं हे कसं काय केलं असेल?

श्री
वर्षू नील
आगाऊ
इंद्रधनुष्य
पुरंदरे शशांक
पवन
Srd
अश्विनी के

एक अतिशय अनवट साधं ठिकाण असूनही तुम्हाला ते भावलं, म्हणून छान तर वाटलंच.. पण मायबोलीवर दर्दी भटके आहेत, याचीही पुनश्च एकदा खात्री पटली.. खूप धन्यवाद Happy

@Srd:

- बौध्द लेण्यात असतात, असे स्तूप/ शिलालेख वगैरे काहीच नाहीये तिथे.. म्हणून या लेण्याना ‘बौध्द लेणी’ म्हणणं शक्य नाही.
- काम्ब्रे लेणी ज्या डोंगररांगेत कोरली आहेत, त्याच्या दक्षिणेच्या खो-यात कोंडेश्वर मंदिर/ जांभिवली आहेत. १ दिवसाच्या डोंगरयात्रेनंतर कोंडेश्वरपासून काम्ब्रे पाशी पोहोचता येईल. त्यापेक्षा गाडीमार्ग एकदम सोप्पा!
- रॉकपैच अवघड आहे! अशक्य नाही. Happy

@अश्विनी के

- स्थानिक लोक क्वचित लेण्यात जात असावेत. म्हणून भिंतीवर नावं लिहिणं आलंच..
- लेणी कोरायचं प्रयोजन – व्यापारी मार्गावर विश्राम, धर्मप्रचार, ध्यानधारणा असू शकतात. काम्ब्रे लेण्यांच्या बाबतीत मात्र ‘लेण्या कश्यासाठी’ हे गूढच वाटतं...
- लेणी खोदायला - सुरुंग वापरणं शक्य नाही, ते फारंच अलीकडच्या काळातले. छिन्नी-हातोडा असलंच काही वापरत असावेत. माथ्यापासून सुरूवात करून हळूहळू कोरत/ खोदत उतरत जायचं, असा मोठ्ठा अन् निवांत प्रोजेक्ट.
- तुमचं म्हणणं बरोबर आहे – लेणी कश्यासाठी, कशी कोरली असतील. ‘Is there a business value/ business sense?’, हे गूढंच आहे.. विशेषत: आज - २१ च्या शतकात!!!

लेख प्रसिद्ध केल्यानंतरचे Updates::::::

लेख काही तज्ज्ञ अभ्यासकांपर्यंत पोहोचला, तो असा....

वरदा -> लेण्यांमधल्या तज्ज्ञ डॉ. मंजिरी भालेराव -> या लेण्यांवर ज्यांनी २००३ मध्ये काम केलंय ते डॉ. श्रीकांत प्रधान -> सायली पलांडे – दातार यांच्यापर्यंत!

सायली पलांडे – दातार यांनी जानेवारी २०१३ ला अधिक संशोधन करून, वरच्या बाजूस अजून लेण्यांना भेट दिली, ज्यात त्यांना जुनी सुतार कामाची हत्यारं सापडली. वाचा त्यांच्याच शब्दात:
"We had carried out thorough documentation of these caves in Jan 2013. Tumhi jya mothya lenit gelat tyachya warati ajun ek lenyachi maal ahe ... arthat rope shivaya jata yenar nahi.. mothya lenyachya davya bajula hi ek chaukoni inaccessible lena ahe... tyat amhala kahi lakadi vastu milalelya ahet... mukhyata juni sutaranchi hatyaare ahet... khupach interesting hote te... waril leninchi rachna (talavinyas) hi khalil lenyanpeksha thodi wegli ahe....tasech agadi warati mathyawar panyachi taki ahet... pudhchya weles janar asal tar bagha nakki..."

जबरदस्त अनुभव ! अफलातून कामगिरी राव...
तो रॉकपॅच कसला खतराय ! Happy
वरदा, त्या दुव्यांबद्दल (लेखाच्या) मनःपूर्वक आभार !

त्रिवार मुजरा सरकार Happy

हो, डिस्कव्हर सह्याद्री - सायली पलांडे-दातार (पाळंदे नाही Happy ) ही इंडॉलॉजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातली विद्यार्थिनी सध्या थोडं काम करत आहे या लेण्यांवर

१.@सायली
पाळंदे दातार माहितात भर घातल्याबद्दल धन्यवाद .सापडलेल्या वस्तु कोठे
पाहाण्यास मिळतील ? २.@discover सह्याद्री उत्सुकता वाढली आहे .कान्हे अथवा
तळेगाव /कामशेत वरून कोणती बस जाते ? खाजगी वाहनानेच जावे लागेल ?

@वरदा: केलं नाव दुरुस्त... Happy Happy

@विशाल कुलकर्णी: खूप धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल! Happy

@Srd: उत्सुकता वाढलीये म्हणताय - वाह!!
तळेगाववरून कुसूर/ खांडी/ सावळा अश्या एस.टी. बसनं कान्हे फाटा - टाकवे – वडेश्वर मार्गे काम्ब्रेला पोहोचता येईल. अर्थात, स्वतःचं वाहन असेल, तर वेळेची बचत होईल..

जगात एक एक लोक्स कित्ती ग्रेट् असतात हे पाहून मन हेलावून जातं अगदी
विठ्ठल असाच सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना
पुढील सर्वच्या सर्व प्रकल्पांसाठी अनेकानेक शुभेच्छा

या धाग्यासाठी अनेकानेक अभार
~वैवकु

लेण्यांबद्दलची (भारतातील) माहिती मी वाचलीय ती १) Temples of north India आणि २)Temples of south India या नैशनल बुक टऱस्टच्या दोन पुसतकांतून .सर्व लेण्यांची सुरुवात बिहार(=विहार)मध्ये 'बाराबार' लेण्यांपासून झाली म्हणतात .फिरणाऱ्या भिक्कूंना आराम करायला जागा मिळावी एवढाच प्रथम उद्देश होता .चक्र ,पिंपळपान ,झाड ,कलश ही चिन्हे नंतर कोरण्यात येऊ लागली .मूर्ती दुसऱ्या शतकापासून आल्या .जैन आणि ब्राह्मण लेण्या नंतर आल्या .वेरुळ लेण्यांचा उजवीकडून डावीकडे हाच क्रम आहे . जेवढी जुनी तेवढी साधी .

खूप खूप अभिनंदन, डिस! नविन ठिकाण तर समजलेच पण तुझ्यामुळे डॉ. प्रधानांचा लेखही वाचायला मिळाला. वरदा यांना धन्यवाद.

वैवकु आणि हेम: तुमच्या सह्याद्रीच्या offbeat ठिकाणाची माहिती आवडली, हे वाचून मस्त वाटलं.. धन्यवाद!!! Happy

खरंच, सह्याद्रीनं पोटात काय काय दडवलंय, कोणास ठावूक!!!

हे वाचा::::

तुंग किल्ल्यावर सापडले १४७ फूट खोल प्राचीन भुयार आणि कातळखोल्या.. प्रमोद सोपानराव बोराडे यांची शोधमोहीम:::
व्हिडीओ: http://www.youtube.com/watch?v=bAPT0U5KQ3w&feature=youtu.be
प्र.चि. http://www.mypimprichinchwad.com/component/content/article/11-news-slide...

अतिशय सुरेख !
सुंदर छायाचित्रे !
आणि या ठिकाणाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

Puratan kalatil guha Engrajani khup abhyaspurvak pahilaya ani tyanchya nondi thevlya aahet. Tya jari aaplya sarkari daftaramadhe naslya tari tya junya pustakamade nodi aslelya adhaltat. Engraj he ashya gostinbabat khup choukas hote. tyamule tyachyakade photos hi miltat.

Agashiv leniche photos 18she shatkat engrajani kadhun pustakrupi chapale hote.

Pages