जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें….

Submitted by विशाल कुलकर्णी on 28 April, 2013 - 08:10

"किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा,
आवारगी में हमने जमाने की सैर की !

काबे में जा के भूल गया राह दैर की,
ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की !
"

बारावीत असेन बहुदा तेव्हा. नुकतंच उर्दुचं वेड लागलं होतं. सोलापूरातल्या सिद्धेश्वर मंदीरापाशी असलेल्या पीरबाबाच्या दर्ग्यात बंदगी अदा करणार्‍या मौलवीसाहेबांकडून जमेल तसे उर्दु शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न चालू होता. तशाच एकदा कुठल्या तरी डाळ - तांदुळ बांधुन आलेल्या पुडीच्या कागदावर वरील ओळी वाचनात आल्या आणि मी थोडा आश्चर्यातच पडलो. ज्या कुणी शायराने हे लिहीलं होतं, "कमाल की उमदा चिज लिखी थी, फिरभी दुसरा शेर मुझे हैरत में डाल रहा था "

'काबे में जा के भूल गया राह दैर की' इथपर्यंत ठिक होतं, पण 'ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की !' या ओळी मला गोंधळात पाडत होत्या. मी थेट मौलवीसाहेबांना गाठलं.

'चचाजान, मै समझ नही पा रहा हूं, इतना उमदा कलाम लिखने वाला शख्स आखीरमें इस तरहा, क्युं शिकायत कर रहा है? काबा जाकर मंदीर की गिरिजाघर की राह भूल जाना मै समझ सकता हूं लेकीन 'मंदीर या गिरजाघरमें जाकर किसीका ईमान खराब हो जाये' ये बात मुझसे हजम नही हो रही है.......

मौलवीसाहब हसले आणि हसून म्हणाले, " बेटेजी, जशी तुमची मराठी आहे ना, तशीच उर्दुही आहे. तुम्ही काढाल तितके अर्थ निघतात शब्दांतून. और यहां तो लिखनेवाला एक बहोतही उमदा शायर है ! या ओळींचा अर्थ शब्दशः घेवु नकोस रे. मंदीर किंवा गिरीजाघर हे इथे कविने मुर्तीपुजा किंवा कर्मकांडाचे प्रतीक म्हणून वापरले आहे, तर 'काबा' हे 'निराकार परमेशाचे' स्वरूप म्हणून वापरले आहे. आता इथे लिहीणारा मुस्लीम आहे त्यामुळे त्याने आपल्याला हवी तशी लिबर्टी घेतलीय एवढंच. त्याच्या जागी एखादा इतर धर्मीय शायर असता तर कदाचीत शब्द वेगळे असले असते. पण जर अर्थच काढायचा झाला तर सरसकट अर्थ असा आहे की जेव्हा निराकार स्वरूपातील ईश्वराच्या पायावर लीन झालो तेव्हा मला कर्मकांडातला, अवडंबरातला फोलपणा कळून चुकला. बरं झालं , नाहीतर भलतीकडेच भरकटत गेलो असतो."

'वाह, है कौन ये शायर? कोण, आहे तरी कोण हा शायर?'

"बेटेजान, ये बात तो आजतक कोई दिलपें हाथ रखकें बता नही पाया, क्योंकी कुछ लोग मानते है के ये एक 'शायर'का कलाम है , जहां कुछ लोग ये भी मानते है की ये एक 'शायरा'की नज्म है! क्या सच है और क्या झुठ, ये तो अल्लाहतालाही जाने, लेकीन जहां तक मै जानता हूं और मानता हुं, इस शायराका असलीयतमें कोई वजुद नही है! लेकीन शायर मियाने जिस तरहसे इस किरदार को शख्सीयत दी है की शायरी के दीवाने इस किरदार को भी सच मानते है!

वे आजभी मानते है की ...,
"हां... उमराव जान असलमें हुआ करती थी! और ये उन्हीकी नज्मके कुछ शेर है! 'उमराव जान'के गझलोमें 'अदा' उनका तखल्लुस हुआ करता था, मगर जहा तक मै जानता हुं 'उमराव जान' 'मिर्जा मोहम्मद हादी रुस्वा' साहबका सबसे खुबसूरत और ताकतवर शाहकार है और मेरा खयाल है ये लाईनेभी मिर्झा हादी रुस्वासाहबकी ही लिखी हुयी है! ये अलग बात है की उमरावके चाहने वाले आज भी इसे 'उमराव जान'की नज्मही मानते है!"

मी चाट पडलो. मी स्वतः "उमराव जान' २-३ वेळा पाहीला होता. त्यातली गाणी पुन्हा-पुन्हा वेड्यासारखी ऐकली होती. खरेतर मी देखील तोपर्यंत असेच समजत होतो की 'उमराव जान' हे पात्र सत्यकथेवरच आधारीत आहे. 'उमराव जान' खरोखर अस्तित्वात होती की ते केवळ हादीसाहेबांच्या कल्पनेतील एक पात्र होते....
खरं खोटं मिर्जा हादीसाहेबच जाणोत, पण एवढी अर्थपुर्ण शायरी करणारा शायर / शायरा किती ग्रेट असेल ?

असो...., आज हे सगळं अचानक आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी फेसबुकवर क्रांतिताईने 'उमराव जान' मधलं एक गाणं शेअर केलं होतं.

जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती है हमे
ये जमी चाँद से बेहतर नजर आती हैं हमे

सूर्ख फूलों से महक उठाती हैं दिल की राहे
दिन ढले यूँ तेरी आवाज बुलाती हैं हमे

याद तेरी कभी दस्तक,कभी सरगोशी से
रात के पिछले पहर रोज जगाती हैं हमे

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यों है
अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे

'शहरयार' साहेबांच्या लेखणीतून उतरलेले जादुई शब्द, त्याला खय्यामसाहेबांचा वेड लावणारा स्वरसाज. अजुन काय हवं हो रसिकाला? शायर म्हणतो की जिंदगी, हे आयुष्य जेव्हा जेव्हा मला तुझ्या सहवासाचा लाभ मिळवून देतं, म्हणजेच जेव्हा जेव्हा मी तुझ्या सहवासात असतो तेव्हा ही धरती मला चंद्रापेक्षाही सुखकर वाटायला लागते...

या ओळी वाचल्या की मला राहून राहून 'मोमीन्'साहेबांची आठवण यायला लागते, ते म्हणतात...

"तुम मेरे पास होते हो गोया जब.., कोई दूसरा नहीं होता "

तसं तर 'उमराव'ची सगळी गाणी अफाटच होती. मुळातच 'शहरयार आणि खय्याम' या दोन अल्लाहच्या माणसांनी या चित्रपटाच्या संगीताला खुप वरच्या स्थानावर नेवून ठेवलं होतं, त्यात रेखाचं मादक सौंदर्य, अप्रतीम अदाकारी आणि आशाबाईंचे खुळावून टाकणारे स्वर ! 'उमराव जान'च्या संगीताने सगळे विक्रम तोडले नसते तरच नवल.

पण हे गाणं गायलं होतं मखमली आवाजाच्या "तलत अझीज"ने आणि 'तलत अझीज' कुठेही निराश करत नाही हे गाणे ऐकताना...!

'सोने पें सुहागा' म्हणजे हे गाणं ऐकताना, खासकरून पाहताना, ' दो घडी वो जो पास आ बैठे' पहतानाचा अनुभव अजिबात येत नाही. उलट रेखाचं मोहात पाडणारं लावण्य डोळे भरून पाहात राहावं की देखण्या फारुख शेखच्या बोलक्या चेहर्‍यावरचे झरझर बदलत जाणारे भाव टिपत राहावं हेच कळत नाही.

बस्स... मै अपनी बकबक बंद करता हूं और आपको कर देता हूं खय्याम साहब और शहरयारसाहब के हवाले ! जिनको गाना सुनना है वो मौसिकीकार, शायर और गझलगायक की इस खुबसुरत पेशकशका लुत्फ उठाये और जो लोक 'शहरयार'साहबकी शायरीकें इस तिलिस्मसें बाहर निकलनेमें कामयाब हो जाये वो 'मोहतरमा रेखा और मिया फारुख के हंसीन रोमान्स पें निसार हो जाये !

http://youtu.be/P487UBiMKeo

अवांतर : २००६ मध्ये जे.पी. दत्ताने 'उमराव जान'चा रिमेक केला तेव्हा त्याने रेखाच्या सौंदर्याला पर्याय म्हणून ऐशचा वापर केला, काही प्रमाणात तो ठिक होता. (५ ते ७%), पण फारुख शेखच्या (नवाब सुलतानमियाच्या) भुमिकेसाठी अभिषेक बच्चन (?) तिथेच सिनेमाची अर्धी वाट लागली असावी Wink

विशाल....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई, आभार्स ! पण हे रसग्रहण नाहीये माझ्या मते.
तो केवळ त्या गाण्याच्या निमित्ताने जाग्या झालेल्या माझ्या आठवणींचा, नकळत उघडलेला एक कप्पा आहे Happy

येस राईट विशालदा

पटकन मला योग्य शब्द सुचला नाही Sad
याला सुंदर गाण्याची एक सुंदर आठवण अस म्हणता येईल

या ओळी वाचल्या की मला राहून राहून 'मोमीन्'साहेबांची आठवण यायला लागते, ते म्हणतात...

"तुम मेरे पास होते हो गोया जब.., कोई दूसरा नहीं होता "

केवळ ह्या एका शेर वर आपला दिवान द्यायला तयार होता गालीब, असे वाचण्यात आले होते.

केवळ ह्या एका शेर वर आपला दिवान द्यायला तयार होता गालीब, असे वाचण्यात आले होते.>>>

अगदी, अगदी विप्रा ! खुप मोठी माणसं होती ती. कलावंत आणि कलोपासक ! त्रिवार प्रणाम....
धन्यवाद भारतीताई !

धन्यवाद अम्याभौ....
गेले कित्येक दिवस विचार करत होतोय जरा भयकथा, गुढकथा, कविता यांच्यातून बाहेर पडून काहीतरी वेगळं लिहिण्याचा. प्रयत्न तर सुरू केलाय. बघू कितपत यश येतेय ते ! Happy

ही माझी अत्यंत आवडती गजल्/नज्म (जे काही असेल ते) आहे.त्यामुळे शीर्षक बघितल्याबरोबर लगेच वाचायला घेतलं.. लेख आवडला.

'सोने पें सुहागा' म्हणजे हे गाणं ऐकताना, खासकरून पाहताना, ' दो घडी वो जो पास आ बैठे' पहतानाचा अनुभव अजिबात येत नाही. उलट रेखाचं मोहात पाडणारं लावण्य डोळे भरून पाहात राहावं की देखण्या फारुख शेखच्या बोलक्या चेहर्‍यावरचे झरझर बदलत जाणारे भाव टिपत राहावं हेच कळत नाही.
>>> +१

विशाल, मस्त लिहिलं आहेस. "उमराव जान" हे नाव काढलं की एकापाठोपाठ एक सुंदर सुंदर गाणी आठवणींच्या पटलावर उलगडत जातात :). रेखाच्या उमरावाजानची छबी अस्सल म्हणूनच रहावी यासाठी ऐश्वर्याची उमरावजान पाहिलीच नाही.

पण हे गाणं गायलं होतं मखमली आवाजाच्या "तलत अझीज"ने आणि 'तलत अझीज' कुठेही निराश करत नाही हे गाणे ऐकताना...!

काय गायलंय त्याने. तेव्हा तो गझलेमधला स्टार होता मोठा.. त्याचे लताबरोबरचे 'फिर छिडी रात बात फुलोंकी' हेही माझे अतिशय आवडते आहे. खरेच मखमली आवाज.....

त्याच्यावरचा स्वतंत्र लेख वाचायला खुप आवडेल.

रेखाच्या उमरावाजानची छबी अस्सल म्हणूनच रहावी यासाठी ऐश्वर्याची उमरावजान पाहिलीच नाही.
त्या नादालाच लागलो नाही मी पण.

मी पण.... Happy कुठल्याही बाबतीत तुलना होऊच शकत नाही.

साधना, सद्ध्या तलत मेहमुदवर काम चालु आहे Wink तो लेख पुर्ण झाल्यावर ’तलत अझीज’ला हात घालेन. नक्की...
धन्यवाद Happy

>>
काबे में जा के भूल गया राह दैर की,
ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की !
<<
क्या बात! Happy

मेरा कुफ्र हासिल-ए-जुहद है, मेरा जुहद हासिल-ए-कुफ्र है
मेरी बंदगी है वो बंदगी, जो रहीने दैर-ओ-हरम नहीं!
(शकील बदायूनी)

>>
किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा,
आवारगी मै हमने जमाने की सैर की
<<

आवारगी में - असं हवं आहे बहुधा.

पण फारुख शेखच्या (नवाब सुलतानमियाच्या) भुमिकेसाठी अभिषेक बच्चन (?) तिथेच सिनेमाची अर्धी वाट लागली असावी << त्या नवीन उमराव जानमधे निळ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस लावलेला सुनिल शेट्टी पाहिल्यावर जे काय वाटलं होतं ते शब्दांत सांगणं अशक्य आहे!!! Happy

लेख खूपच छान. उमराव जान पुस्तक वाचलं होतं तेव्हापासून मी पण ही सत्यकथा आहे हे मानून चालत होते. आज ज्ञानात भर पडली. Happy

<<मेरा कुफ्र हासिल-ए-जुहद है, मेरा जुहद हासिल-ए-कुफ्र है
मेरी बंदगी है वो बंदगी, जो रहीने दैर-ओ-हरम नहीं!>>>

कसली आठवण करून दिलीत स्वातीताई शकीलमियांची ही पुर्ण गझलच अफाट आहे..

मुझे रास आये ख़ुदा करे यही इश्तिबाह की साअतें
उन्हें ऐतबार-ए-वफ़ा तो है मुझे ऐतबार-ए-सितम नहीं

बाकी 'आवारगी में' ची टायपो लक्षात आणुन दिल्याबद्दल आभार !
नंदिनी Happy

सुंदर लेख. एवढ्या एका लेखामुळे मी 'उमराव जान' ही व्यक्तिरेखा गुगलून काढली. बरिच माहिती मिळाली. ही व्यक्तिरेखा सत्य आहे वा काल्पनिक असे दोन्ही मतप्रवाह आहेत. आणि दोन्ही मतप्रवाहातल्या लोकांकडे आपल्या म्हणण्याला पाठिंबा देउ शकणारे पुरावेही आहेत.

माझ्या माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद विशाल!

धन्यवाद मानसी !
म्हणुन तर मी म्हटलेय ना, खरे-खोटे देव जाणे, आपल्याला कर्तव्य त्या शायरीशी, तिच्या अभिव्यक्तीशी Happy

विशाल, अश्या तर कितीतरी उमराव जान त्या जमान्यात जन्माला आल्या असतील Happy फक्त प्रत्येकीची कथा तिच्यापुरतीच सीमीत राहिली असेल आणि ही कथा त्या सगळ्याजणींचं प्रतिनिधित्व करत असेल.

"बुला रहा है कोई चिल्मनोंकी उस तरफ".... ह्या ओळीत पुन्हा जाणून बुजून होणार्‍या ताटातुटीची व्यथा पुरेपुर उतरली आहे.

एक्झॅटली आशु...
मला वाटतं हादीसाहेबांनीसुद्धा हे पात्र रचताना सुद्धा प्रातिनिधीक स्वरुपातच मांडले असावे. Happy

भारतात गझलांची सुनामी आली तेव्हा तलत अझीझचा उदय झाला. एक तर तो नीट प्रमोट झाला नाही आणि त्याच्या अन्प्रोफेशनल वागण्याने त्याला फारसे यश मिलाले नाही. त्यामुळे कोणतीही गझल त्याच्या नावाने ओळखली जात नाही. माझ्यापुरते तलत अजीज आवडता नसूनही ही गझल मात्र मी शेकडो वेळा रिपीट करून ऐकली आहे कारण खय्यमच्या संगीतात गायकाचा आवाज वेगळेच रूप घेउन येतो . आशा भोसलेंचा आवाजही इतरांकडांपेक्षा खय्यमकडे वेगळाच येतो...

माझ्यापुरते तलत अजीज आवडता नसूनही ही गझल मात्र मी शेकडो वेळा रिपीट करून ऐकली आहे कारण खय्यमच्या संगीतात गायकाचा आवाज वेगळेच रूप घेउन येतो .>>>
अगदी, अगदी .. यु सेड इट! सहमत Happy