पुनश्च पुस्तके

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काय दुसरे विषय नाहीत का?
आहेत की, भरपूर आहेत. पण मला सातत्याने लिहावसं वाटतं पुस्तकांबद्दल. वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहायची हौस तर आहेच पण न आवडलेल्या, वाचायची राहून गेलेल्या पुस्तकांबद्दल सुद्धा लिहायचं असतं.

तर आज काही (अजून )न वाचलेल्या पुस्तकांविषयी -
उन्हाळ्यात दर आठवड्याला अन एरवी दर तीन आठवड्यांनी दोन स्थानिक वाचनालयात आलटून पालटून जातो आम्ही. कधी कधी मग इकडची पुस्तके तिकडे परत केली जातात. कधी कधी एकीकडली पुस्तके लवकर परत केली जातात अन दुसरीकडे भरमसाठ दंड भरावा लागतो. प्रामुख्याने मुलांची पुस्तकं आणली अन वाचली जातात. तिथे बसून पुस्तकं वाचून दाखवावी लागतातच.

एका वाचनालयात संध्याकाळी 'स्टोरी अवर' असतो. तात्कालिक एखादा विषय घेऊन त्यावरची दोन -तीन पुस्तकं शाळकरी मुलं छोट्यांना वाचून दाखवतात. एखाद -दोन गाणी असतात. कधी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाद्वारे गोष्टी सांगतात. हे वाचनालय थोडे दूर आहे, पण मोठे आहे अन तिथे संध्याकाळी स्टोरी अवर असतो त्यामुळे तिथे जाणं होतं.

घराजवळचे जरा लहान आहे पण जवळ आहे म्हणून तिथे जात असतो. तिथली मुलांच्या विभागातली संध्याकाळची ग्रंथपालिका आता चांगली परिचयाची आहे. पुस्तकं देता घेताना त्याविषयी बोलणं होतं. मुलांना कधी स्टिकर, कधी पुस्तकात खूण ठेवायची कार्डं, कधी रंगवायला कागद असं काही बाही देत असते ती.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तिने लेकीला विचारलं 'Are you ready for kindergarten ?' ले़कीने लगेच तिला शाळेबद्दल, बसने जाण्या-येण्याबद्दल, शाळेच्या गणवेषाबद्दल, धाकटा अजूनही डेकेअरमधेच जात असल्याबद्दल सगळं काही सांगितलं. मग तिने मला एक यादी दिली - म्हणाली "बघ यातली तुझी काही राहिली आहेत का? ही एवढी पुस्तकं वाचलेली, माहितीची असली तर तुझ्या लेकीला काही त्रास होणार नाही किंडरगार्टनमधे. "

मी अगदी तोर्‍यात ती १०० पुस्तकांची यादी घेतली अन घरी आले. ' हॅ,१०० काय तिला आतापर्यंत त्यापेक्षा कितीतरी जास्त पुस्तकं वाचून दाखवली असतील मी. घरीच १०० च्या वर पुस्तकं असतील मुलांची !' असं मनाशी घोकत होते.

बरं झालं तिच्या पुढ्यात ती लिस्ट मी वाचली नाही. असा पचका झाला असता ना! त्या १०० पैकी जेमतेम एक चतुर्थांश पुस्तकं आम्ही वाचलेली निघाली. मग आता अगदी कटाक्षाने दरवेळी त्या यादीतली दोन-तीन पुस्तकं आणतोय अन हळूहळू ती पूर्ण करतोय.

मधे एकदा त्या मोठ्या लायब्ररीत गेले तेंव्हा तिथल्या ग्रंथपालिकेने माझ्या हातातली यादी पाहून ती मागून घेतली. मग टेबलाच्या खणातून एक यादी काढून ती अन माझी दोन्ही याद्या बाजू बाजूला धरून वाचून पाहिल्या. मला म्हणाली 'This is excellent list, much better and more comprehensive than ours. Do you mind if I make a copy.' म्हटलं माझी काय हरकत असणार? ही अमक्या लायब्ररी मधल्या डॉटीची आहे, तिला विचारा. हिने लगेच फोन लावला. डॉटीने 'हो' तर म्हटलंच पण यादी इमेल करायचं आश्वासन पण दिलं. तरी या ग्रंथपालिकेने माझ्या यादीची एक प्रत काढून ठेवली.

आता परत गेले तर 'डॉटीस चॉइस' म्हणून ती यादी पण तिथे लावलेली असते.

तर ही ती यादी - ( एकदम १०० पुस्तकांची नावं लिहायला जमणार नाही-जमेल तशी टाकते )
(ठळक टाइपातली पुस्तकं फक्त वाचली होती सुरूवातीला )
Babies
१ Ten, Nine Eight - Molly Bang
Goodnight Moon - Margaret Wise Brown
३ The Very Hungry Caterpillar - Eric Carle
४ Freight Train - Donald Crews

५ Lunch - Denise Fleming
६ Where's Spot - Eric W Hill
Brown Bear, Brown Bear - Eric Carle
८ Chicka Chicka Boom Boom - Bill Martin Jr, John Archambault

९ Who's counting- Nancy Tafuri
१० How Do I Put It On - Shiego Watanabe.

Toddlers
११ On the Day I Was Born -Debbi Chocolate
१२ Good Dog, Carl - Aelxandra Day
१३ Feathers For Lunch -Lois Ehlert
१४ Go Away, Big Green Monster - Ed Emberly
१५ Ask Mr Bear - Marjori Flack
१६ Is Your Mama a Llama - Deborah Guarino
१७ Hush! : A Thai Lullaby - Minfog Ho
१८ Rosie's Walk - Pat Hutchins
१९ Harold and the Purple Crayon -Crocket Johnson
२० Jump, Frog, Jump! - Robert Kalan
२१ The Teddy Bear's Picnic - Jimmy Kennedy
२२ Whose Mouse Are You - Robert Kraus
२३ The Carrot Seeद - Ruth Krauss
२४ Over In The Meadow - John Langstaff
२५ Dim Sum for Every One! - Grace Lin
२६ Little Blue and Little Yellow - Leo Lionni ( स्विम्मी चे लेखक )
२७ Guess How Much I Love You - Sam McBratney
२८ Whose Hat? - Margaret Miller
२९ Shades of Black - Sandra Pickney
३० The Little Engine That Could - Piper Watty
३१ Good Night Gorila - Peggy Rathman
३२
वाचून वाचून खिळखिळं झालंय हे पुस्तक
३३ We're going On a Bear Hunt - Michael Rosen
३४ Cars and Trucks and Things That Go - Richard OsScarry
३५ Lizard's Story - George Shanan
३६ It looked Like Spilt Milk - Charles Shaw
३७ Farmer Duck - Martin Waddell
३८ Mouse Paint - Ellen Walsh
३९ "Hi, Pizzaa Man!", Virginnia Walter
४० Noisy Nora, Rosemary Wells
४१ The Lady with the Alligator Purse - Nadine Wescott
४२ Buzz- Janet Wong
४३ The Napping House - Audrey Wood.

PreSchool
४४ Happy Birthday, Moon - Frank Asch
४५ Animals Should Definitely Not Wear Clothing - Judi Barrett
४६ Madeline - Ludwig Bemelmans
४७ The Mitten - Jan Brett
४८ Stone Soup -Marcia Brown
४९ The Story Of Babar, the Little Elephant - Jean de Brunoff
५० Mr. Grumpy's Outing - John Burlingham
५१ Mike Milligan and His Steam Shovel - Virginia Lee Burton
५२ Mama Zooms -Jane Cowen-Fletcher
५३ The Empty Pot - Demi
५४ Pancakes For Breakfast - Tomie DePaola
५५ Abuela - Arthur Dorros
५६ Are You My Mother - P D Eastman
५७ Corduroy - Don Freeman
५८ Millions of Cat- Wanda Gag
५९ The Three Billy Goats Gruff - Paul Galdone
६० The Girl Who Loved Wild Horses - Paul Goble
६१ All the Colors of the Earth - Sheila Hamanaka
६२ Lilly's Purple Plastic Purse - Kevin Henkes
६३ Bread and Jam For Frances - Russess Hoban
६४ Amazing Grace - Mary Hoffman
६५ Angelina Ballerina - Katherinए Holabird
६६ The Wolf's Chicken Stew - Keiko Kasza
६७ The Snowy Day - Ezra Jack Keats
६८ The Caterpillar and the Polliwog - Eric Kimmel
६९ I Took My Frog To The Library - Eric Kimmel
७० Tacky The Penguin - Helen Lester
७१ I Love You Like Crazy Cakes - Rose Lewis
७२ On Market Street - Anita Lobel
७३ Frog and Toad Are Friends - Arnold Lobel
७४ Frog Goes To Dinner - Mercer Mayer
७५ Make Way for Ducklings- Robert McCloskey
७६ Raven - Gerald McDermott
७७ Goin' Someplace Special- Pat McKissack
७८ Pigs Aplenty, Pigs Galore! David McPhail
७९ Martha Speaks - Susan Meddaugh
८० The Day Jimmy's Boa Ate The Wash -Trinka Noble
८१ If You Give A Mouse A Cookie - Laura Numeroff
८२ The Ant and The Elephant - Bill Peet
८३ The Tale of Peter Rabbit - Beatrix Potter
८४ Martin's Big Words : The Life of Martin Luther King Jr - Doreen
८५ Rappaort
८६ Curious George -H A Rey
८७ The Relatives Came- Cynthia Rylant
८८ Grandfather's Journey - Allen Say
८९ Where the Wild Thing Are - Maurice Sendak
९० The Cat In The Hat - Dr Seusss

९१ Caps for Sale - Esphyr Siobodkina
९२ Imogene's Antlers - David Small
९३ Snapshots from the Wedding - Gary Soto
९४ Sylvester and the Magic Pebble- william Steig
९५ There Was An Old Lady Who Swallowed A Fly
९६ Alexander and The Terrible, Horrible, No Good Very Bad Day - Judit Viorst

९७ Lyly, Lyle Crocodile - Beranard Waber
९८ Seven Blind Mice - Ed Young
९९ Harry, the Dirty Dog - Gene Zion

विषय: 
प्रकार: 

My son read a lot of Magic Tree House books in second grade- they are not the same style as Wimpy Kid, but he liked them anyways. Geronimo Stilton books were good too- you may have to point out the puns and word play for him a little bit.

Flat Stanley, Big Nate are some of his 'funny' books.
Latest favorites are Doctor Proctor's Fart Powder series . he keeps reading and giggling away. These might be a little too advanced for a second grader though.

मॅजिक ट्री हाउस वाचलेत थोडे. आवडलेले सु द्धा. पण सध्या विंपी स्टाईल काहीतरी हवं म्हणून आटापीटा चाललाय. Geronimo Stilton आणि Flat Stanley, Big Nate - आणून बघते आता.

Doctor Proctor's Fart Powder - नावावरूनच हीट होईल असं वाटतय!

Doctor Proctor's Fart Powder - नावावरूनच हीट होईल असं वाटतय! >>> Lol नक्कीच! फ्लेवर ऑफ द सीझन आहे ना सध्या! Proud

गीक मॉम साईट वर वाचून या पुस्तकाची ऑडिओ व्हर्शन केंव्हाची घेउन ठेवली होती.
अलिकडे एक दोन लांब ड्राइव्ह करताना पुस्तक ऐकलं एकदाचं .
कनेक्टिकटमधे रहाणारी क्लॉडिया अन जेम्स किंकेड भावंडं घरातून पळून जाऊन न्यू यॉर्कमधल्या म्युझीयम मधे रहातात. तिथे कदाचित मायकेल अँजेलो ने घडवलेले एक शिल्प नव्यानेच प्रदर्शित होत असते, . त्या शिल्पामुळे म्युझीयम मधे लोकांची अतोनात गर्दी होत असते.

सर्वांची नजर चुकवून दोन्ही मुलं आठवडाभर कशि रहातात? सर जेम्स अन लेडी क्लॉडिया त्या शिल्पाचा खरा शिल्पकार कोण हे कसे शोधतात . मिसेस फ्रँकवायलरचा स्कुलबसमधे पत्ते खेळून पैसे जिंकणारा जेम्स अन प्रत्येक गोष्टीचं अगदी निगुतीने प्लॅनिग करणारी क्लॉडिया या मुलांशी अन त्या शिल्पाशी काय संबंध ?

आता त्याच लेखिकेचं अजून एक पुस्तक आणलंय लायब्ररि मधून

From the Mixed-Up Files of Mrs. Basil E. Frankweiler

या तिमाहीत एकातरी नॉन फिक्शन पुस्तकावर प्रॉजेक्ट करायचा होता बारक्याला. तो केंव्हापासून पिरियॉडिक टेबल विषय धरुन बसला होता. आई बाबा दोघांना त्या टेबलची अतोनात भिती - अजूनही आहे Happy

पण आमच्या लायब्ररीत सहज म्हणून शोधले तर हे पुस्तक सापडले . दोन दिवसात वाचून संपवले बार्क्याने. तो फिक्षन सुद्धा इतक्या लवकर वाचत नाही. वाचताना खुदुखुदु हसत होता. शाळेला सुटी लागली की परत एकदा हे पुस्तक आणून त्यातले सगळे प्रयोग करुन पहायचा प्लॅन आहे.

मुलांना समजेल अशा भाषेत पिरियॉडिक टेबल चा इतिहास, वेगवेगळ्या एलिमेंट फॅमिलीचे गुणधर्म, त्यांच्या शोधाचा इतिहास असे सर्व दिले आहे.

अशीच अमुची केमिस्ट्री टेक्स्टबूके असती तर आम्हीही हुशार झालो असतो Happy

Fizz, bubble & flash! : element explorations & atom adventures for hands-on science fun! / Anita Brandolini ; illustrations by Michael Kline.

माझी ४ वर्षाची मो विलियम्स ची फॅन आहे आणि १० वर्षाची सध्या
Exploring J.R.R. Tolkien's The hobbit / Corey Olsen. वाचतेय.
हॅरी पॉटरच्या जगातना तिला बाहेर काढायचे माझे प्रयत्न चालु आहेत अजुन सगळी मॅजिकची पुस्तकेच वाचते Uhoh

फ्रॉम द मिक्सड अप फाइल्स ऑफ मिसेस बेसिल ई फ्रँक्वायलर या पुस्तकाच्या लेखिकेचं अजून एक पुस्तक अलिकडेच वाचलं

The View from Saturday

सहावीचं वर्ष सुरु व्हायच्या उन्हाळी सुटीत , न्यू यॉर्क राज्यातल्या इथन ची आजी अन नाद्या चे आजोबा यांचं फ्लोरिडा मधे लग्न होतं. त्या लग्नात अपघाताने त्या दोघा मुलांचा क्लासमेट नोआ बेस्ट मॅन बनतो . हे तिघे अन त्या वर्षी शाळेत नव्याने आलेला , डार्क स्किन असणारा, ब्रिटिश अ‍ॅक्सेंंट नी बोलणारा, अमेरिकेन मिडल स्कूल फॅशन रुल्स शी अपरिचित असणारा ज्युलियन . या सर्वांना मिसेस ऑलिन्स्कि का निवडते, ते स्पर्धेची तयारी कशी करतात. आधी सहावीच्या इतर टीम्स ना हरवून, नंतर सातवीच्या टीम ला हरवून ते स्टेट चॅम्पियनशिप पर्यंत कसे पोचतात . तिथे त्या स्पर्धेच्या एका उत्तराकरता ज्युलियन कसा ठाम रहातो .

यात शाळेतले इतर आजी, माजी शिक्षक , इतर विद्यार्थी, काहींचे पालक यांचा हातभार किंवा मोडता घालणे, त्याला ही टीम कशी तोंड देते . त्याची गोष्ट.

घरी आवडलंय पुस्तक

मटिल्डा वाचलं...खूपच आवडलं मुलाला...अजून एक-दोन Roald dahl ची पुस्तकं वाचली पण ती फारशी नाही आवडली म्हणतो.

३ री त जाणार आता. अजून कोणी काय-काय सुचवाल या वयाला?

चार्ली - चॉकलेट फॅक्टरी, चार्ली ग्लास एलेव्हेटर, बी एफ जी, पेलिकन- जिराफ, एसिओट्रॉट ही आमच्याकडे आवडलेली Roald dahl ची पुस्तकं.

जिरोनिमो स्टिल्टन वाचलीत का ? बरीच मोठी सिरिज आहेत. थिआ स्टिल्टन ची पण काही पुस्तकं आहेत .

हल्ली मुलाला (३.५ वर्षे) अमिलिआ बडीलीआ (उच्चार माहित नाही) वाचून दाखवतो. त्याला कितपत समजत का मी हसलो की तो हसतो ते समजेल लवकरच. काही जोक नक्की समजतात. तो जे विचारतो ते समजावून सांगतो, काही वेळा मलाच हसू आवरत नाही आणि मग दोघे हसत बसतो. वर दिसलं नाही कुणी लिहिलेलं, पण मुलांना आवडेल ही सिरीज. अमिलीआ शब्दश: अर्थ घेते आणि गोंधळ करते अशी थीम आहे.

जिरोनिमो आणि थिआ स्टिल्टन आमच्याही घरी फेवरीट झाली आहेत. लेकाला त्या सिरीजमधली सगळी पुस्तकं वाचायची आहेत ( ४-५ वाचून झालीत फक्त). पण ब्रिटीश कॉन्सिलच्या लायब्ररीत या सिरीजमधलं एकही पुस्तक नाहीये. शाळेच्या लायब्ररीत आहेत थोडी पण या वर्षी शाळेतून एकही पुस्तक घरी मिळालं नाहीये. शाळेत पण लायब्ररीत गेल्यावर ही पुस्तकं देत नाहीत वाचायला (कारण याच्या वर्गातल्या ९९% मुलांना अजूनही स्वतः गोष्टीची पुस्तकं वाचता येत नाहीत. Sad )

सध्या माझा ७ वर्षांचा मुलगा मॅजिक ट्री हाऊस सिरिजच्या (मेरी पोप ऑझबॉर्न) पुस्तकांचा जबरदस्त फॅन झालाय. ह्या सुट्टीत आतापर्यंत त्या सिरिजमधली ४०+ पुस्तकं वाचली असतील. एक पुस्तक हातात घेतलं की ते संपल्याशिवाय खाली ठेवत नाही (हे पाहूनच मला फार छान वाटतं :)). मला त्याने सांगितल्याप्रमाणे जॅक आणि अ‍ॅनी ही २ मुलं आणि त्यांची अ‍ॅडव्हेंचर्स ह्या पुस्तकांमध्ये आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/Magic_Tree_House_series

जिरोनिमो स्टिल्टन तिसरीच्या मुलाला बोर होइल. ते पहिली-दुसरीतच वाचून संपतात की. रायगडचा लेक हॅरी पॉटर वाचून चुकलाय ना?

पुस्तकं वाचता येत नाहीत म्हणून पुस्तकं देत नाहीत? उलट द्यायला हवीत की.

सिंडरेला | 6 August, 2015 - 12:09 नवीन
जिरोनिमो स्टिल्टन तिसरीच्या मुलाला बोर होइल. ते पहिली-दुसरीतच वाचून संपतात की. रायगडचा लेक हॅरी पॉटर वाचून चुकलाय ना?

>> अरे नाही, माझी मुलगी आता पाचवीत जाइल पण थी स्टिल्टन अजुन वाचते, तशी सर्व वाचुन झालित पण नविन आले की वाचते अजुनही. तिची पण पॉटर सिरीज झाली वाचुन पण कार्टुन वाचायला मुल कधी कन्टाळत नाहित.

जिरानिमो ऑलमोस्ट सगळी झालीत आता...परत-परत लायब्ररीतून आणून वाचतच रहातो पण!

हॅरी पॉटर पहिली तीन गेल्या वर्षी वाचून झाली पण पुढली नाही वाचायच्येत म्ह्णतो...!

अल्पना, ऑनलाईन ऑर्डर करता येतील का पुस्तकं? मामीला विचार कुठून घेतली ते ; तिच्याकडे बरीच आहेत जिरानिमो स्टिल्टन!

मी लँडमार्क मधे पाहिली होती बरीच स्टिल्टन पुस्तके मुंबैत .

बार्क्याला सध्या बिग नेटचं भूत सवार आहे.

नॉन फिक्शन मधे एलिमेंट्स अन मॉलिक्युल्स वाचतोय

http://www.amazon.com/Elements-Visual-Exploration-Every-Universe/dp/1579...

http://www.amazon.com/Molecules-Architecture-Everything-Theodore-Gray/dp...

हे पण एक वाचून झालंय तरि अधून मधून उघडून बघत असतो
http://www.amazon.com/Underground-David-Macaulay/dp/0395340659/ref=sr_1_...

जिरानिमो क्रॉसवर्डमध्ये आहेत अल्पना. फ्लिपकार्टवर पण आहेत (बहुतेक). ऑनलाईन मागवणार असशील तर फ्लिपकार्टबरोबरच अ‍ॅमॅझॉनच्या किंमतीही चेक कर. बरेचदा अ‍ॅमॅझॉनवर किंमती कमी असतात.

इथून हवी असतील तर मी देखिल पाठवू शकेन. सांग नक्की.

मेधा, आता लँडमार्क बंद झालं. Sad किती सुरेख आणि भलं मोठ्ठं दुकान होतं. त्या दुकानातून आम्ही कितीतरी स्मार्टगेम्सचे गेम्स विकत घेतले. मस्त मस्त आहेत ते.

Pages