... कसा ठरेल वर्ज्य रे प्रवाह नाविका तुला..?

Submitted by सुशांत खुरसाले on 26 April, 2013 - 00:47

दिशा तुझ्या सख्या जणू न लाट राधिका तुला...
कसा ठरेल वर्ज्य रे प्रवाह नाविका तुला..?

लयास जायचे जगास अजुन फार फार रे....
न आज ओरडे कुणी- 'धरा तुला ,विका तुला!'

तिने तुलाच सोडले ? नव्हे कितीक सोडले..
कुठे न सापडायची सती न् सात्विका तुला!

वदेल का पुराण रोखठोक हे कधीतरी....
'तुझेच कर्म लावतेय माणसा भिका तुला!'

मृदंग बडवलेस तू घसा नि कोरडा तुझा..
कसा न भेटला अजून देव भाविका तुला.?

'सुशांत' श्वास घेतले, उदास जन्म जाळला
कधी न लाभली परंतु ध्येयमालिका तुला..!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिशा तुझ्या सख्या जणू न लाट राधिका तुला...
कसा ठरेल वर्ज्य रे प्रवाह नाविका तुला..?>>>
मतला सुंदर.
लाटेला -राधिका खूप भावले.

लयास जायचे जगास अजुन फार फार रे....
न आज ओरडे कुणी- 'धरा तुला ,विका तुला!'>>
हा ही छान!