Submitted by सुशांत खुरसाले on 26 April, 2013 - 00:47
दिशा तुझ्या सख्या जणू न लाट राधिका तुला...
कसा ठरेल वर्ज्य रे प्रवाह नाविका तुला..?
लयास जायचे जगास अजुन फार फार रे....
न आज ओरडे कुणी- 'धरा तुला ,विका तुला!'
तिने तुलाच सोडले ? नव्हे कितीक सोडले..
कुठे न सापडायची सती न् सात्विका तुला!
वदेल का पुराण रोखठोक हे कधीतरी....
'तुझेच कर्म लावतेय माणसा भिका तुला!'
मृदंग बडवलेस तू घसा नि कोरडा तुझा..
कसा न भेटला अजून देव भाविका तुला.?
'सुशांत' श्वास घेतले, उदास जन्म जाळला
कधी न लाभली परंतु ध्येयमालिका तुला..!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मृदंग >> असे हवे फार छान
मृदंग >> असे हवे
फार छान वाटले ही गझल वाचून मला खूप आवडले सर्व शेर
छान्...आवडली!
छान्...आवडली!
धन्यवाद वैभव आणि
धन्यवाद वैभव आणि आर.के.जी!
बदल केला आहे....
मस्त...
मस्त...
४था खूप आवडला...
४था खूप आवडला...
धन्स शिवम.!!
धन्स शिवम.!!
दिशा तुझ्या सख्या जणू न लाट
दिशा तुझ्या सख्या जणू न लाट राधिका तुला...
कसा ठरेल वर्ज्य रे प्रवाह नाविका तुला..?>>>
मतला सुंदर.
लाटेला -राधिका खूप भावले.
लयास जायचे जगास अजुन फार फार रे....
न आज ओरडे कुणी- 'धरा तुला ,विका तुला!'>>
हा ही छान!
छान गझल!
छान गझल!
वदेल का पुराण रोखठोक हे
वदेल का पुराण रोखठोक हे कधीतरी....
'तुझेच कर्म लावतेय माणसा भिका तुला!'<<< चांगला शेर
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!
अरे सौर्या, तुला पाहिलंच
अरे सौर्या, तुला पाहिलंच नाही...तहे दिलसे शुक्रिया..
शाम आणि बेफिजीं धन्यवाद!
छान गझल
छान गझल
वा...वा.... पुन्हा वाचली.
वा...वा....
पुन्हा वाचली. .
पुराणाचा शेर भावला...
धन्यवाद रसिकहो.!!
धन्यवाद रसिकहो.!!
तिलकधारी आला आहे. भरीचे शब्द
तिलकधारी आला आहे.
भरीचे शब्द आणि अक्षरे पाहून खिन्न झाला आहे.
तिलकधारी निघत आहे.
काहीसा अपेक्षाभंग
काहीसा अपेक्षाभंग झाला.
शुभेच्छा.
सुरेख. आवडली.
सुरेख. आवडली.