पॉट वरील कलाकुसर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 April, 2013 - 07:48

मागील पॉट डिझाईनींगच्या प्रतिसादांत काही क्लू मिळाले. त्यावरून थोडे डोक चालवून केलेला हा दुसरा पॉट. आमच्या रिलेटिव्हज मध्ये एका मुलाचा वाढदिवस होता. त्याला हा पॉट भेटवस्तू म्हणून दिला.

साहित्यः
पॉट
ब्लॅक ऑइलपेंट
ब्रश
पिस्त्याची साले, आक्रोडची साले, खजूराच्या बिया, खड्यांच्या टिकल्या
फेवीक्विक
अ‍ॅक्रॅलिक कलर

कृती:

पहिला पुर्ण पॉटला ऑइलपेंट लावून घेतले. ते सुकल्यावर वरच्या कडेला समान भागात ८ खुणा करुन घेतल्या. ह्या साले व्यवस्थित अंतरावर लावावी ह्यासाठी.

पहिला आक्रोडची साले वरच्या खुणेनुसार लावून घेतली. पण पुर्ण गोल नाही लावली. मागची न दिसणारी बाजू तशीच ठेवली. साधारण ४ आक्रोडची साले लावली. त्या सालांच्या मधोमध वरच्या बाजूला पिस्त्याची खालील प्रमाणे डिझाईन करुन घेतली.

खजुराच्या बिया लावू की नको ह्या मनस्थितीत होते म्हणून आधी ह्याला रंग लावून घेतला. असेही छान वाटत होते.

नंतर आक्रोडच्या सालांच्या बरोब्बर मध्ये खजूराच्या बिया चिकटवल्या व खड्यांच्या टिकल्यां खालीलप्रमाणे चिकटवून पॉट तयार केला.

आता हा डिझाईन केलेला पॉट भेटवस्तू म्हणून द्यायचा होता म्हणून पाठच्या मोकळ्या जागेत नाव टाकून दिले.

नुसताच देण्यापेक्षा त्यात एक ग्लास घालून त्यात मनिप्लांट टाकून दिला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव........... सो क्यूट्...लगेच त्यात एक मनीप्लंट............ सो नाईस!!!!!!!!

जागु निसर्गाला जागली.:फिदी:

जागु खूपच छान.:स्मित:

तुझी कला तुझ्या बाळांमध्ये पण उतरु दे. खूप मस्त गिफ्ट आहे.

mast Happy

वर्षू, विनार्च, जयवी, रचनाशिल्प, डॅफोडिल्स, मानुषी, स्वाती धन्यवाद.
टुनटुन माझ्या मोठ्या श्रावणीलाही आवड आहे. ती मला हे करायला नेहमी प्रोत्साहीत करत असते.

मस्त!
पॉट छान दिसतोय पण ते नाव घातल्याने शोभा कमी झाली थोडी. >> +१
पुर्ण पॉटवर डिझाईन करुन नाव तळाला टाकले असते तर छान झाले असते.

सिंडरेला, प्रिया पुढच्यावेळी लक्षात ठेवेन. पण तो भाग पाठी आहे. जेव्हा वस्तू ठेवतो तेंव्हा दिसत नाही.
चैत्राली, नंदीनी धन्स.

मस्तच गं जागू...आणि लगेचच मनीप्लँट सुद्धा लावलंस...कित्ती गोड.. आणि त्याबरोबरच ४थ्या फोटो राधाचं खेळ्ण्यातलं बदक पण गोड दिसतंय!! Happy

चांगला दिसतोय.

एक सहज सुचवते, काळा रंग घेण्यापेक्षा दुसरा रंग ट्राय करा. व दोन शेड मध्ये रंगवू शकता.
किंवा दोन्-तीन रंगाचेच पॅटर्न बनवून मग त्यावर डीझाईन करून पहा.

मला काळा रंग ह्या डिझाईनमध्ये जरा मार खातोय असे वाटतेय.

दोन छटा मध्ये वलयी पॅटर्न छान दिसेल हंड्याच्या आकारानुसार....

शांकली, चनस, झकासराव, सुचित्रा, अवल, सृष्टी, शोभा धन्यवाद.

झंपी दोन शेडची आयडीया चांगली आहे. पुढच्यावेळी. धन्स.

खुप क्रिएटिव जागू!
जागु म्हणजे कला <<जागू म्हणजे उत्साहाचा झरा. रात्री १/२ वजे पर्यन्त मा. बो. वर असते.
हा पॉट घरी बनवलास का?

हो ग. घरीच बनवला. अग मला हल्ली फार क्वचीत दिवसा वेळ मिळतो. ऑफिस अजुन चालू नाही झाले ना Lol आणि माबोवर येण्याची उत्सुकता असतेच म्हणून छोट्या राधाला झोपवून माबोवर यावे लागते. ती ११.३०-१२ पर्यंत झोपते.

खुपच कौतुक वाटते तुझे. देवाने दिलेल्या गुणांचे चीज करतेस. त्याने मला प्रोत्साहन मिळते. जागू, मला सगळे फोटो दिसत नहिये. का?
Sad

Pages