पॉट वरील कलाकुसर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 April, 2013 - 07:48

मागील पॉट डिझाईनींगच्या प्रतिसादांत काही क्लू मिळाले. त्यावरून थोडे डोक चालवून केलेला हा दुसरा पॉट. आमच्या रिलेटिव्हज मध्ये एका मुलाचा वाढदिवस होता. त्याला हा पॉट भेटवस्तू म्हणून दिला.

साहित्यः
पॉट
ब्लॅक ऑइलपेंट
ब्रश
पिस्त्याची साले, आक्रोडची साले, खजूराच्या बिया, खड्यांच्या टिकल्या
फेवीक्विक
अ‍ॅक्रॅलिक कलर

कृती:

पहिला पुर्ण पॉटला ऑइलपेंट लावून घेतले. ते सुकल्यावर वरच्या कडेला समान भागात ८ खुणा करुन घेतल्या. ह्या साले व्यवस्थित अंतरावर लावावी ह्यासाठी.

पहिला आक्रोडची साले वरच्या खुणेनुसार लावून घेतली. पण पुर्ण गोल नाही लावली. मागची न दिसणारी बाजू तशीच ठेवली. साधारण ४ आक्रोडची साले लावली. त्या सालांच्या मधोमध वरच्या बाजूला पिस्त्याची खालील प्रमाणे डिझाईन करुन घेतली.

खजुराच्या बिया लावू की नको ह्या मनस्थितीत होते म्हणून आधी ह्याला रंग लावून घेतला. असेही छान वाटत होते.

नंतर आक्रोडच्या सालांच्या बरोब्बर मध्ये खजूराच्या बिया चिकटवल्या व खड्यांच्या टिकल्यां खालीलप्रमाणे चिकटवून पॉट तयार केला.

आता हा डिझाईन केलेला पॉट भेटवस्तू म्हणून द्यायचा होता म्हणून पाठच्या मोकळ्या जागेत नाव टाकून दिले.

नुसताच देण्यापेक्षा त्यात एक ग्लास घालून त्यात मनिप्लांट टाकून दिला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅट होममधलं एक पॉट पाहून मला ही आयडिया सुचली.आधी सगळीकडून फुलं काढणार होते, पण नंतर कंटाळा आला म्हणून एकाच बाजूला चित्रं काढली. घरी होता म्हणून काळा रंग दिला. मधल्या फुलाच्या ठिकाणचा पृष्ठभाग हलकेच खरवडून काढला आणि बाजूचीदोन तशीच राहू दिली (तो मातीच्या भांड्याचा मूळ रंग आहे)

Pages