मागणे .

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 April, 2013 - 01:13

दयायचेच असेल तर
तुझे वेड मला दे
ज्ञानदेव चैतन्याची
जिथे पाऊले पडली
त्या वाटेची माती
या माथ्याला लागु दे
नाथ नामदेवांनी
जसे तुला जाणले
त्या युक्तीचे प्रेमाचे
दान फक्त मला दे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक,सुशांत <<<<<<<मांडणीत जरा लक्ष द्यायला पाहिजे ....:-)
उल्हास <<"तुझे वेड मला दे" कोणाकडे हे मागणं मागितलंय ते लक्षात आलं नाही.>>> खरच? प्रभू शब्द टाकायला हवा होता का?
भारतीताई , कविता खरोखर पूर्ण झाली !

धन्यवाद सर्वांना !

खरच? प्रभू शब्द टाकायला हवा होता का? >>> ती ओळ प्रभूला उद्देशून म्ह्टली आहे असे एकदा जाणवले.
परंतु "तुझे वेड मला दे" असे म्हणताना त्याला कसले वेड आहे ? का आहे ? हे स्पष्ट न झाल्याने मी तो प्रश्न विचारला होता. असो ..... हा कदाचित माझ्या आकलनशक्तीचा दोष असू शकेल.

उल्हासजी, बाकी जाउ द्या पण तुमच्या का आहे ? या प्रश्नात प्रचंड अर्थ आणि मनन आहे .देवाचे वेड आहे .पण का आहे ?स्वत:ला प्रश्न विचारला अन दमछाक झाली . उत्तर सापडले नाही पण सापडेल यात शंका नाही .धन्यवाद