जागू -राधा स्पेशल...

Submitted by पुरंदरे शशांक on 19 April, 2013 - 10:44

जागू -राधा स्पेशल...

माय लेकी पी सी वर ..... पी सी वर
गप्पा रंगल्या नि ग वर .... नि ग वर
(गप्पा रंगल्या मा बो वर .... मा बो वर)

झाडे पाने फुले पहा .... फुले पहा
राधा जरा शांत रहा .... शांत रहा

एवढे पोस्ट करते मी .... करते मी
चळवळ जरा कर कमी .... कर कमी

मधेच लाऊ नको बोट ...... नको बोट
बघ पडली तिन्दा पोस्ट .... तिन्दा पोस्ट

की बोर्ड लवकर सोड सोड ..... सोड सोड
राधा हसली गोड गोड .... गोड गोड....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है शशांक Happy माय-लेकी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या एकदम.. जागू, गोडशी चाल लावून शिकव गं तिला ही कविता Happy

४ वर्षांनी धागा वर आला आणि मला राधा लॅपटॉपवर टाईप करतानाची आठवली एकदम. थांकु सामी पुन्हा तिच्या चिमुकल्या जगात नेल्या बद्दल.

अरे वा.... मस्तच..
आधी कसं काय वाचलं नव्हतं....?
कवी आणि दोन्ही कविता विषय यांना जवळून ओळखतो ही खूप मजा वाटतेय...

बरं झालं वर आली कविता .. मस्तच आहे .विस्मरणात गेली होती. आत्ता परत तालात वाचली.

छानच कविता आहे.... माझ्या राधासाठी गोष्टी शोधत शोधत इकडे आले. असं वाटलं, माझ्यावरच केलीय कविता. खूप हसले वाचताना आणि राधा कन्फ्युज्ड....

Pages