राष्ट्रपती - इंग्रजी संज्ञांचे भारतियीकरण

Submitted by खटासि खट on 19 April, 2013 - 02:18

"राष्ट्रपिता" या संबोधनामुळे अंमळ हळवेपण आल्याचे कांही ठिकाणी दिसून आले. या निमित्ताने राष्ट्रपती या संबोधनाबद्दल ज्ञानात भर पडावी असे वाटतेय. मूळ शब्द शोधण्यासाठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागत असल्याने तसे केले. त्या शब्दास अध्यक्ष असे म्हणत असावेत अशी एक शंका मनात येऊन गेली. जर प्रेसिडेण्ट = ....पती हे बरोबर असेल तर घराघरातून अध्यक्षमहाराज, जेवायला चला असा हाकारा ऐकू यायला काहीच हरकत नाही. इकडून तिकडून पेक्षा आमचे अध्यक्ष आज दुचाकीवरून मार्गस्थ झाले हे म्हणायला आणि ऐकायलाही सुटसुटीत वाटते. असो.

मुद्दा असा, प्रेसिडेण्ट म्हणजे .......पती हे भाषांतर कुणी केले असावे ? सरकार दरबारी त्यास मान्यता कशी मिळाली यावर चर्चा व्हावी हा प्रस्ताव ठेवला आहे. आपल्याकडे अस्तित्वात नसलेल्या बाबींना इंग्रजी प्रतिशब्द नसताना अनेक इंग्रजी शब्दांचे अट्टाहासाने केलेले भाषांतर आजही कालसुसंगत ठरावे का ? चेंडू हा शब्द अस्तित्वात असल्याने त्या शब्दाच्या वापराबाबत शंका नाही पण क्रिकेट हा खेळच परकीय असताना विकेट या संपूर्ण नव्या प्रकारासाठी यष्टी सारखे शब्द योजणे, रूजवणे हा अट्टाहास देखील योग्यच आहे का ?

( या विषयावर आधीच चर्चा झालेली असल्यास ती शोधण्याचा प्रयत्न केला. मामी यांचा एक धागा या ग्रुपमधे आहे. पण विषय निराळा वाटल्याने प्रस्ताव ठेविला ऐसे )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री. अण्णा हजारे हे हिंदी भाषणात पंतप्रधान असा शब्द वापरतात. हिंदीमधे दुर्दैवाने प्रधानमंत्री हा शब्द आहे. प्राईम मिनिस्टर या शब्दाला प्रधानमंत्री मराठीतही म्हणायला हरकत नसावी.

महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंतप्रधान हे पद होते का ? कदाचित त्यामुळं मराठीत हा शब्द रूढ केला गेला असावा. दोन्ही अर्थ योग्यच आहेत. प्रधानमंत्री हा शब्द मराठीत का चालणार नाही ? किंवा मग पंतप्रधान हा शब्द हिंदीत असावा. दोन्ही वेगवेगळे असले तरी भाषा बदलताना त्याचं भान असू द्यावं.

एक अवांतर गोष्ट आठवली. लोणावला रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकीवर एक तक्ता दिसला ज्यात cancellation ला मराठी प्रतिशब्द "रद्दीकरण" असा आढळला.

इंग्रजीकडेच कशाला धांव घ्यायला हवी ? आपल्याच 'गणपती, 'नृपती', 'प्रजापती' यांत अधिक अर्थपूर्ण व औचित्यपूर्ण व्युत्पत्ति नाही का मिळत ' राष्ट्रपती' शब्दाची !!

'गणपती, 'नृपती', 'प्रजापती' >>>

या शब्दांत ( त्या काळच्या मान्यतेप्रमाणे) स्वामित्वाची भावना आहे. राजेशाहीमधे राजाला प्रजापती म्हणतात आणि त्या अर्थाने हा शब्द चपखल वाटतोय. पण लोकांच्या शाहीमधे राष्ट्रपती लोकांचे प्रतिनिधित्व करतात कि राष्ट्राचा स्वामी असतात ?

<< या शब्दांत ( त्या काळच्या मान्यतेप्रमाणे) स्वामित्वाची भावना आहे. >> मला वाटतं 'पती' लावलेल्या संज्ञा स्वामित्वापेक्षां ' काळजी घेणारा प्रमुख' अशा अर्थाने असाव्यात. 'गण' हे बव्हंशी लोकशाही पद्धतिने चालत [असं वाचल्याचं आठवतं] त्यामुळें 'गणपती' स्वामित्व दाखवणारा शब्द नसावा , असं आपलं मला वाटलं. पण तसं नसेलही.

कुरापती म्हणजे काय??>> कुरापत चे अनेक वचन ; कुरापत म्हणजे खोडी (खोडी म्हणजे खोड चे अनेक वचन नाही, तर कुणाची तरी काढलेली खोडी )

वाक्यात उपयोग खालील प्रमाणे... (खरे तर हा गाण्यात उपयोग आहे),

खोडी माझी काढाल तर, खोडी माझी काढाल तर, अश्शी मारीन फाईssट, घटकेमध्ये विरुन जाईल सारी तुमची ऐट...सारी तुमची ऐट... Happy

कुरापती म्हणजे काय?? >>>>>

सस्मिताक्का

राष्ट्रपती, गणपती, नृपती यांचे एकवचन अनुक्रमे राष्ट्रपत इ. होत नसेल असं वाटतं. कुरापती मधे जे अपेक्षित आहे ते सुरापती मधे सापडेल. Happy
( रिचर्ड निक्सन भारताचे राष्ट्राध्यक्ष ही कुरापत होती Wink )

एव्हढा कसला पतीचा कीस काढणं चाललंय ? पती म्हटलं कि बायकोची समजूत असते कि आपण सोडून तमाम बायकांना जो नजरेच्या कटाक्षाच्या खिरापती वाटतो तो प्राणी. आता यात खरं किती खोटं किती हे तोच जाणे.

दलपती, सेनापती मधे प्रमुख हा अर्थ अपेक्षित आहे का ?
तसं असेल तर हा चर्चाप्रस्ताव आटोपला.
<<
यक्झॅक्टली.
सेनापती हा सेनेचा केवळ प्रमुख असतो. मालक नव्हे. मालक राजा असतो. दलाची पण परिस्थिती तीच. हे इतकं सिंपल डिंपल असतांना विंग्रजीतून मर्‍हाटीकडे प्रवास केल्याने कन्फूजन वाढलेले चर्चाप्रस्तावात दिसलं. भाऊंनी इस्कटून सांगायलंय की वर्ती.
*
गिरिकंद,
ते 'रद्दीकरण' लै भारी. हहपुवा. विनोदी ट्रान्स्लेशन्स असा एक धागा काढून टाका.