घर आहे की आहे बरे चंबळ इथे !

Submitted by A M I T on 18 April, 2013 - 02:48

घर आहे की आहे बरे चंबळ इथे !
रोज होतो माझा अमानुष छळ इथे

मज म्हणाली, झाडू हाती घेऊनी
कॉटखालून बाहेर ये चल इथे

लाटण्याचा धाक दावूनी म्हणे
पीठ तू पोळ्यांकरता मळ इथे

समजते ती स्वत:ला दमयंती जरी
कोणास आहे रस बनण्यास नल इथे?

कळाले ती घाबरते झुरळास जेव्हा
देवा, मज का केले नाहीस झुरळ इथे?

बायको नसता घरी, मात्र चंगळ इथे
मीच ठरतो त्याक्षणी बिरबल इथे

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजते ती स्वत:ला दमयंती जरी
कोणास आहे रस बनण्यास नल इथे?

कळाले ती घाबरते झुरळास जेव्हा
देवा, मज का केले नाहीस झुरळ इथे?<<< वा वा! तुम्ही हझलकिंग होऊ शकाल. Happy

तिलकधारी आला आहे.

हझलकिंग! खरे तर तिलकधारी हा आद्य हझलसम्राट, हल्लीच गंभीर काव्य रचू लागला. वृत्तात लिही रे बाबा. त्याची मजा और असते.

तिलकधारी निघत आहे.

___ मोड ऑन

याचा स्क्रिन शॉट घेण्यात येत आहे.......... तुझ्या लग्नात पोस्टर बनवुन वहिनींना रुखवत मधे ठेवण्यास देणार आहोत Wink

____ मोड ऑफ

Happy

:हाहा::हहगलो: