गेला विठ्ठल

Submitted by वैवकु on 16 April, 2013 - 06:38

नेला विठ्ठल ......गेला विठ्ठल

सावळकाळा हेला विठ्ठल
दारूभरला पेला विठ्ठल
जोड्याभवती शेला विठ्ठल
सांगा ...कोणी केला विठ्ठल?

आई गेली...
मेला विठ्ठल !!!

आई गेली......मेला विठ्ठल !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

अप्रतिम लिहिलय वैवकु !!

-------------------------------------------------------------

ना आला , ...ना गेला केव्हा
सदोदित भरुनि उरलेला विठ्ठल !!

वेगळ्याच ढंगातली अभिव्यक्ती.
आई आणि विठ्ठल यांच्यावर नितांत प्रेम असणाराच असं लिहू शकतो.

Sad

गलबलून गेलोय

अंघोळ अन् वेणीफणी खाणेपिणे मग औषधे
विठ्ठल स्वतः करणार बघ आई तिथे सगळे तुझे

गेलीस जग सोडून हे तू चांगले केलेस बघ
नव्हते मलाही सोसवत आई असे जगणे तुझे

धन्यवादही म्हणवत नाहीयेत क्षमस्व !!!

अरेरे !

सावरा वैभव...
कवितेतली आर्तता जाणवतीये...
भारतीताईंनी म्हटलंय ते केवढं खरं आहे..>>
आयुष्यावर
निळीसावळी सावली धरणारं आकाश वारतं .!